OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

घरकाम

द २ लीटर हॅंडल
द २ लीटर हॅंडल- तुमच्या बोटांना आर्थराईटिसचा त्रास आहे का किंवा तुम्ही हाताने आणि बोटाने पूर्वीसारखे उचलू शकत नाही? तुम्हाला सोड्याच्या किंवा पाण्याच्या मोठ्या २ लीटरच्या बाटल्या हाताळायला अडचण होते का? २ लीटर हॅंडल डिजाईन हे अदभुत आणि पेटंट युक्त डिजाईन आहे, हे प्रभावीपणे ओतण्यासाठी आणि दोन लीटरची सोड्याची किंवा पाण्याची बाटली नेण्यासाठी वापरता येते. हे मानक किंवा विचित्र आकाराच्या २ लीटरच्या बाटलीवर बसते.
 
किचन फींगर प्रोटेक्टर
वरीष्ठलोकांसाठी , दृष्टी क्षीण असणा-या लोकांसाठी आणि अशा व्यक्तींना ज्यांना बोटांच्या आणि हातांच्या समस्या आहेत, हे उपकरण उपयुक्त ठरते. फिंगर गार्ड बोटांवर चढवले जाते, ज्यामुळे धारधार चाकुकिंवा ब्लेडपासुन बचाव होतो. हे प्लॅस्टिकचे बनलेले आहे आणि याला धुता येते आणि याचा ब-याच काळापर्यंत उपयोग करता येतो. सुरक्षात्मक स्वरुपात लहान तुकडे करणे शक्य होते. हे प्रत्येक स्वयंपाक घरासाठी आवश्यक आहे.
 
स्लाईस नाईस ऍडजेस्टेबल नाईफ
हा व्यावसायिक गुणवत्ता असलेला १३ १/२ स्टेनलेस स्टिलचा कापणारा चाकू आहे, ज्यामध्ये दाते असलेले ब्लेड आणि फोर्क लावलेला असतो. तुम्ही सहजपणे जास्तीत जास्त पातळ ते १ १/४ रुंदीचे तुकडे कापता, जेवणाला सुरक्षित रित्या पकडण्यासाठी ११" इंच सुरक्षा फोर्क चा उपयोग करा. वरीष्ठ व्यक्ती, हातात कंप असलेल्या व्यक्ती, कमी दिसणा-या व्यक्ती यांच्यासाठीहे एक संपूर्ण स्वयंपाक उपकरण आहे. यामुळे प्रत्येक वस्तु उदा बटाटा, काकडी, कांदा, ब्रेड,मांस, टोमॅटो इ.ला दोषरहित स्वरुपात कापता येते. डायलला फिरवून स्लाईसर गाईडला आत किंवा बाहेर करता येते. याच्या हॅंडलचे डिजाईन एर्गोनोमिकली तयार केलेले आहे, आणि याच्या कडा दातेरी आहेत, हे डिशवॉशरसाठी देखील सुरक्षित आहे.
 
एर्गोनोमिक ऍंड सेफ बॉक्स ओपनर
हे धारधार , धातुच्या बॉक्सच्या सु-यांचा एक विकल्प आहे. यावरच्या धार नसलेल्या टोकामुळे हा बहु उपयोगी ओपनर एवढा धारधार असतो जो सीलबंद पॅकेजेस ना उघडू शकतो,परंतु तुम्हाला इजा होत नाही. याच्यामुळे सुरक्षित स्वरुपात खाण्याचे बॉक्स, टेपयुक्त बॉक्स, प्लॅस्टिक सुरक्षा सील, सीडी/डिवीडी त्याचप्रमाणे प्लॅस्टिक कव्हर, सुरक्षा सील आणि प्लॅस्टिकमध्ये बंद इतर कंटेनरना उघडता येते दिर्घकाळासा्ठी उपयोगात आणता येणारे ५.५" लांब आणि १" व्यासाचे एर्गोनोमिक हॅंडल
 
बॉक्स टॉपर वीथ बिल्ट अप हॅंडल
केवळ याला आत टाका आणि वरच्या बाजुला खेचा. यामुळे वरीष्ठ लोक आणि दुर्बळ हात असणा-या व्यक्ती सहजपणे डिटर्जेंट, अन्नधान्य, तांदूळ किंवा फ्रोजन अन्नपदार्थ काही सेकंदांमध्ये उघडू शकतात. हे दृढ प्लॅस्टिक च्या सोबत गादीयुक्त हॅंडलने तयार केलेले आहे.
 
६ इन १ मल्टि ओपनर
6 इन १ मल्टी ओपनर एक कल्पनात्मक ,सहाय्यक उपकरण आहे, ज्याच्या शिवाय कुठलेही स्वयंपाकघर अपूर्ण आहे. वरीष्ठ वय्क्ती, आर्थरायटिस ने बाधीत व्यक्ती, किंवा अशी कुठलीही व्यक्ती , जीचे हात अशक्त आहेत, सहजपणे याचा उपयोग करु शकते. यामुळे कुठलीही गोष्ट सहजपणे उघडता येते. एकीकडे हे स्वयंपाकघरामध्ये उपयोगी आहे आणि दुसरीकडे सहलीवर किंवा प्रवासामध्ये या उपयोग करता येतो. यामुळे सहा प्रकारच्या झाकणांना उघडणे शक्य असते. न घसरणा-या पकडीमुळे कठिणात कठिण सील उघडणे, धातुच्या बाटल्यांची झाकणे उघडणे, किंवा जारच्या किंवा बाटलीच्या दृढ झाकणांना सैल करण्यासाठीयाचा उपयोग होतो आणि कडेने सीलबंद असलेल्या बॅगा इ.ना उघडता येते आकार ५ १/२ इंच *२ ३/४ इंच * १ इंच आहे.
 
जार ओपनर, जार क्लोजर फॉसेट टर्नर
खास रचना केलेल्या या सहाय्यक उपकरणाच्या मार्फत झाकणे उघडणे किंवा तोटीला उघडण्यासाठी हाताच्या शक्तीला संकेंद्रित केले जाते. हे हाताच्या किंवा बोटांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी उपयोगी उपकरण आहे. याचे डिजाईन व्यावसायिक चिकित्सांना लक्षात ठेवून करण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला आपला उद्देश साध्य करता येतो आणि यामध्ये तुमच्या आवश्यकतांना विचारत घेतले गेले आहे. हे एग्रोनॉमिक असून वापरण्यास सहज स्वरुपाचे हे.
 
कंफर्ट ग्रीप गीफ्ट बॉक्स्ड किचन युटेंसिल्स फॉर हॅंड इंपेयरमेंट्स
सर्वश्रेष्ठ पकडिसाठी विनाईल फिंगर बम्प पकडीसोबत स्टेलनेस स्टिलची भांडी , पार्किन्सन्स आणि आर्थराईटिस सारख्या रोगांसाठी उपयुक्त आहेत. पार्सन्स स्वयंपाकघर साजसामानामध्ये शैली आणि सुविधेवर लक्ष देण्यात आले आहे. सांध्यांवर येणा-या जोराला टाळून ,संपूर्णपणे समानप्रमाणामध्ये , पूर्ण संतुलित भांडी अप्रत्यक्षरुपामध्ये अशा व्यक्तींसाठी उपयोगी आहेत, ज्यांची शक्ती क्षीण झाली आहे आणि हात तसेच बाहुमध्ये तेवढी सक्रियता उरलेली नाही, यामुळे ते अधिक सुरक्षीततेने, अधिक सहज आणि आरामदायक पकड बनविण्यात यशस्वी होतात. जेवणाच्या टेबलावर सम उन्नत सुविधा आत्मविश्वास आणि समर्थता टिकवण्यासा्ठी हे आवश्यक आहे.प्रत्येक सेटमध्ये १ चाकू, १ फोर्क, १ सूप चमचा आणि १ चहाचा चमचा समाविष्ट आहे.
 
ए डि एल कफ फॉर युज वीथ इटिंग युटेंसिल्स
ए डि एल कफ -एक अनुकूलनिय उपकरण ज्याचा उपयोग दररोजच्या जेवणाच्या भांड्यांच्या सोबत केला जातो, त्याचप्रमाणे वेलक्रो क्लोजर सोबत १" (२५ मिमि)रुंद व्हाईट नायलॉन वेबिंग सोबत तयार केले आहे. मनगटाच्या चांगल्या नियंत्रणा सोबत हाताची दुर्बळता किंवा पक्षघाताने पिडित व्यक्तींसाठी हि भांडी उत्तम आहेत.
 
क्लिप ऑन फोर्क/चमचा
विनाईल कव्हर युक्त हाताची पट्टी जी हाताच्या मागच्या भागात फिट होते, ज्यामुळे अन्नाला भांड्यात सुरक्षित पणे धरता येते. हातावर फिट करण्यासाठी पट्टीला मग दुमडले जाऊ शकते. ज्या व्यक्तींना लहान भांड्यांना पकडण्यास समस्या येते त्यांच्या साठी अन्नाला धरणारी ही उपकरणे अत्यंत उपयुक्त आहेत.
 
रॉकिंग टी नाईफ
हात आणि बाहुच्या समस्येने पिडित वरीष्ठ व्यक्तींसाठी आणि अन्य उपयोग कर्त्यांसाठी रॉकिंग टी चाकूला अन्नावर रॉक करुन कापण्याचे काम केले जाऊ शकते. हाताप्रमाणे फिट होण्यासाठी १ इंच (१/२ इंच लाकडी हॅंडलचा आकार तयार करण्यात आला आहे.याचा सैल पकड असलेल्या व्यक्तींमार्फत सहज उपयोग करता येतो. ४ १/२ इंचाच्या सुरक्षा किना-यामुळे अर्थात स्टेनलेस स्टिल ब्लेडवर चाकूला धार लावणा-या उपकरणाने धार लावता येते.
 
फुड बंपर
हे अशा लोकांसाठी आहे, जे परंपरागत टेबलवेयरचा उपयोग करु इच्छितात, परंतु त्यांना भांड्यामध्ये जेवण घालण्यास त्रास होतो. जेवण विखुरण्यापासुन अटकाव करते आणि त्याला सहतेने संयोजित करते. समन्ययाच्या अभावामुळे खाण्याच्या टेबलावर अन्न विखुरले जाणा-या व्यक्तींसाठी किंवा हाताच्या मांसपेशींवर सीमीत नियंत्रण असलेल्या व्यक्तींसाठी हे व्यवहार्य आहे. सॅनिट्री फूड बंपर जेवणाच्या गोलाकार प्लेटच्या सोबत जोडली जाते आणि त्याला आधार देते, ज्यामुळे त्यांच्यावर दाब देऊन अन्नाला फोर्क किंवा चमच्यामध्ये घेतले जाऊ शकते. क्लियर प्लस्टिक बंपर ८ १/२ इंचापासुन ११ इंचाच्या व्यासामध्ये बसवता येते.
 
क्लिप ऑन स्टिल फूड बंपर
क्लिप ऑन स्टिल फूड बंपर सोबत जर तुम्हाला जेवणाच्या भांड्यांना सांभाळायला अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या ताटलीमधुन सांडण्यापासुन वाचवू शकता. हे ९ ते ११ इंच व्यास असलेल्या ताटलीमध्ये सहज बसते.स्टेलनेस स्टील प्लेट गार्डमध्ये तीन स्प्रींग ऍक्शन क्लिप्स आहेत ज्या बंपरला ताटलीच्या सोबत समायोजित करता येते.
 
इनर लीप प्लेट
जेष्ठ व्यक्ती आणि सीमीत मांसपेशी नियंत्रण असणा-या व्यक्ती आणि अशा व्यक्ती ज्या केवळ एकाच हाताचा उपयोग करतात, त्यांच्यासाठी हे सर्वश्रेष्ठ आहे. संशोधकांनी या गोष्टीला शोधुन काढले आहे की, अल्जाईमेअर रोगाने ग्रस्त व्यक्ती केवळ तेव्हाच जेवतात, जेव्हा ते चमकदार रंगाच्या ताटलीत जेवतात आणि अन्नाला आणखिन चांगल्या पध्दतीने पाहू शकतात. खोल आंतरिक लिप मुळे जेवण ताटलीच्या बाहेर पडत नाही. उपयोग कर्त्यांच्या मार्फत भांड्याला ताटलीच्या कडेला लावता येते आणि अन्न वाढता येते. ताटलीचा व्यास ९" एवढा असतो.
 
राऊंड अप प्लेट
कुठल्याही मांसपेशीचे सीमीत नियंत्रण आणि समन्वय असणा-या व्यक्तीला हे उपकरण उपयोगी पडते. घेराच्या भोवती असलेल्या कडेमुळे अन्न बाहेर सांडत नाही. याचा आकार ८ इंच व्यासासोबत ३/४ इंच उंचीचा असतो.
 
थ्री सेक्शन फुड प्लेट
बोटे, हात आणि भुजेची दुर्बळता असणा-या व्यक्तींसाठी यामुळे जास्त आत्मनिर्भरता मिळते. यामध्ये जेवणासाठी तीन वेगवेगळे भाग आहेत, ज्यांच्या वर आलेल्या १ इंच खोल भींतींमुळे त्यांना स्पर्श करुन जेवणाला चमचा किंवा काट्यामध्ये घेता येते. यामध्ये कमी सांडण्यासोबत किंवा कमी मिश्रण होत अन्न योग्य त्या ठिकाणी म्हणजेच तोंडअत पोहोचते. आर्थराईटिस, भुजेचा सीमीत उपयोग करणा-या व्यक्ती इ.सा्ठी हे किफायतशीर आहे. याचा व्यास ९ इंच एवढा आहे.
 
मॅग्रीप ओपनर
मऊ आकारामुळे याने उपयोगकर्ता कुठल्याही आकाराच्या झाकणाला किंवा कॅपला उघडू शकतात, यामध्ये लहान बाटलीपासुन ते मोठ्या आकारापर्यंतच्या सर्व भांड्यांचा समावेश होतो. हे उपकरण हातांना सुदृढ मजबूती देते. मोठा आकार आणि बाहेरुन टेक्चरयुक्त असल्यामुळे दुर्बळ हाताच्या व्यक्तीसाठी हे सुदृढता प्राप्त करण्यास मदत करते. मोठा व्यास संपूर्ण हातात बसतो आणि यामुळे अतिरीक्त टर्निंग बळ मिळते. स्पष्ट रुपात दिसते कारण याचा रंग चमकदार नारिंगी असतो.
 
हॉट हॅंड हॅंड प्रोटेक्टर ऍंड जार ओपनर
गरम भांड्यांसाठी वापरा, दृढ झाकणांना उघडण्यासोबत , ओल्या आणि सरकणा-या ग्लासांवर पकड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. गरम थंड किंवा सरकत्या वस्तुंवर उदा. बाटल्या, ग्लास आणि पॅन इ.वर उत्तमरितीने पकड ठेवतो. दृढ भांडयांची झाकणे आणि बाटल्यांच्या कॅप्स उघडण्यासाठी ग्रीपरच्या स्वरुपात कार्य करते.; अशा व्यक्ती ज्यांच्या हातात तापामुळे कमी संवेदनशीलता असते, त्यांना भाजण्यापासुन वाचवण्यासाठी हे सुरक्षा देते.ग्रिपींग पृष्ठभागांवर लहान सक्शन कप्स लावले गेले आहेत. अंतिम पॉकेट्स अंगठे आणि बोटांसाठी सछिद्र टॅब्ससोबत याचा आकार ३ ७/८" * ७ १/२" एवढा असतो.
 
टिके ओ स्टोव्ह नॉब टर्नर
स्वयंपाकघर सुरक्षा आणि सहाय्यक उपकरण जे स्टोव्ह आणि इतर नॉब्स, तोट्या , वॉल्व्ह आणि बटनांना फिरवते. जेष्ठ व्यक्ती अथवा हाताच्या अशक्तता असलेल्या किंवा आर्थराईटिसने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हे टर्निंग उपकरण आहे. याला कामाच्या ठिकाणी किंवा घरात, कुठल्याही गोलाकार नसलेल्या कंट्रोल नॉब वर दाबले जाऊ शकते. जेव्हा टर्नरला नॉब वर दाबले जाते तेव्हा नॉबच्या पृष्ठभागाला स्पर्श करणा-या पिन्स आकुंचन पावतात आणि उरलेल्या पिन्स पकड मिळवण्यासाठी नॉबला घेरतात. याचा व्यास २ १/४" इंच एवढा असतो ,परंतु याच्या मार्फत मोठ्या अनियमित आकाराच्या नॉब्सना पकडता येत. सुविधाजनक रुपात उपयोग करण्यासाठी टि आकार ५ १/४" लांब हॅंडल चे डिजाईन एग्रोनॉमिकपणे तयार केले गेले आहे.
 
ओव्हन रॅक पुश पुल स्टिक
ओव्हन रॅक पुश पुल स्टिक अशा व्यक्ती ज्या व्हीलचेयर वर आहेत किंवा ज्यंची गतीशीलता मर्यादित रेंज पर्यंत आहे त्यांच्यासाठी हेउपकरण सहाय्यक ठरते. गरम ओव्हन रॅक्सना पुढे पाठी करण्यासाठी किंवा जेव्हा गतीशीलतेची रेंज वाढवायची असेल तेव्हा रीचनच्या स्वरुपात कार्य करते. याची लांबी १३" असते,
 
स्टोव्ह नॉब विस्तारीत रीच टर्नर
नॉब्स बंद करण्यासाठी व्हीलचेयरवर बसलेल्या व्यक्तींना किंवा वेगळ्या कारणांनी स्टोव्हवर ठेवलेल्या गरम भांड्यांपर्यंत पोहचू न शकणा-या व्यक्तींसाठी रीच टर्नरचे डिजाईन तयार करण्यात आले आहे. हलकी ऍल्युमिनीअमची काठी ज्यावर घासण्यासाठी बचाव होण्यासाठी एक्सपोजी कोटिंग लावली गेली आहे , सहजपणे टिस्ट इ. करण्यासाठी हे मोठ्या सुविधाजनक पकडीने युक्त आहे.
 
कॉंबिनेशन कटिंग बोर्ड वीथ शेफ नाईफ
फुड कटिंग बोर्ड ज्याच्यासोबत शेफ चाकू लावलेला आहे, त्यामुळे याने चॉपिंग करता येऊ शकते. साफ करण्यासाठी आणि धार लावण्यासाठी चाकूला वेगळे करता येते. बोर्डाचा आकार १६"* १२" आहे आणि हा ४ सक्शन कप फीट वर बसलेला आहे. तुकड्यांमध्ये विभागण्यासाठी सोलण्यासाठी अन्नाला न हलता सुविधाजनक रुपात ठेवण्यासाठी तीन स्टेलनेस स्टीलचे स्पाईक्स लावले आहेत. १/२" फुड गार्ड ने आहाराला पसरण्यात सहाय्यता मिळते.
 
पॉट आणि पॅन होल्डर
एका हाताने ढवळत पॉट किंवा पॅनला पडण्यापासुन वाचवते. विस्तृत सक्शन कपांच्या आशारामुळे याला अधिक स्थिरता प्राप्त होते आणि तंग आधार असलेल्या मॉडेल्सच्या तुलनेत तापापासुन सक्शन कपांना दूर ठेवते. सीमीत पातळीवर हातांचा उपयोग करणा-या व्यक्तींसाठी किंवा सीमीत हस्त दक्षता आणि हाताच्या शक्तीला गमावलेल्या लोकांसाठी हे सर्वश्रेष्ठ आहे. प्लॅस्टिकचा थर असलेले स्टिल १६"* ४ १/२ " .
 
अंडर कॅबिनेट डिलक्स हेवी ड्युटी जार ओपनर
दृढ भांड्यांना उघडण्यासाठी यामुळे दोन्ही हातांचा उपयोग केला जातो. याला कुठल्याही टेबल, काऊंटर कॅबिनेट , शेल्फ किंवा बार च्या खाली टांगता येते. यामुळे ५/८" ते ३.७५ व्यासाच्या कुठल्याही स्क्रु झाकणाला उघडता येते, हे बाधाविरहित असते आणि यासाठी कुठल्याही प्रकारच्या समायोजनाची गरज भासत नाही. हे जार ओपनर मार्फत सेल्फ एडेसिव्ह माऊंटिंग सामुग्री चा उपयोग करण्यामार्फत सहयोजित होते. त्याचप्रमाणे यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपकरणाची आवश्यकता नसते. चांगले वाटल्यास त्याला पेचांनी लावले जाऊ शकते. मजबुत निर्माणासोबत हेवी ड्युटी जार ओपनर
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.