OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

वॉकर्स आणि छड्या

ऍडजस्टेबल १ पॉईंट बेस केन्स वीथ ऑफसेट शाफ्ट
या ऑफसेट वजनाने हलक्या समायोजनीय उंची असलेल्या छड्या ४’१०" से ६’५" उंची असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असतात, आणि तीच्या गुणधर्मांमध्ये आरामदायक, न घसरणारी आणि हाताच्या तळव्याचा थवका कमी करण्यासाठी फोम युक्त पकडीचा आंतर्भाव होतो. ऑफसेट कर्वड शाफ्टमुळे कमी गुरुत्वाकर्षण केंद्र उपलब्ध होते आणि जास्त संतुलन आणि स्थिरतेसाठी व्यक्तीचे वजन छडीच्या आधारावर केंद्रित होते. ड्रॉप डाऊन मेन्यु्मध्ये उपलब्ध असलेल्या विकल्पांचा प्रयोग चार-पॉईंट आधाराच्या तुमच्या आवडीच्या छडीला निवडण्यासाठी करा.क्रोम मध्ये उपलब्ध असलेली मानक छडीचा ५" रुंद आणि ७" लांब आधार असतो. लांब क्वाड केन ७" रुंदी *११" लांबीच्या आधारासोबत क्रोम किंवा काळ्या रंगात ही उपलब्ध आहे. छडीची उंची १" पासुन २९" ते ३८" च्या अंतरामध्ये समायोजित होऊ शकते. ही मजबूत एनोडाईज्ड ऍल्युमिनीयम ट्युबिंगने तयार केलेली असते.
 
समायोजनिय सहज देखरेख छड्या
स्वस्त वजनाने हलकी सिंगल प्लाईंट, एनोडाईज्ड छड्या स्थिर आणि सुरक्षित आधार देतो. ३०" से ३८" च्या मध्ये उंची ठरविण्यासाठी यात एक सोपे पुश बटण असते, त्यामुळे स्थिरता राखण्यासाठी मदत देण्यासाठी ही संतुलित देखील होते. दोन्ही प्राकरच्या छड्यांमध्ये न घसरणा-या रबरी पाय समाविष्ट असतात. सरळ लेग किंवा ऑफ सेट मॉडेलला निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन मेन्युमधुन विकल्प निवडु शकता.
 
छडी किंवा वॉकर आईस पिक्स क्लीट्स
संलग्न मल्टी प्रॉग्ड क्लीट्स मुळे बर्फाळ क्षेत्रांमध्ये घसरण्यापासुन वाचता येते. आईस पीक्स ने विश्वास निर्माण होतो आणि थंड वातावरणात सुध्दा व्यायाम करण्यास सहाय्य मिळते. मानक मॉडेलवर लावल्या गेलेल्या स्टिल टिपला जेव्हा वापरले जाते, तेव्हा यांना दुमडले जाऊ शकते.रिट्रेक्टेबल प्रकारचे टिप उपयोग केला जात नसताना रबराच्या मजबुत आधारामध्ये सुरक्षितपणे ठेवता येते.
 
फोल्डिंग वॉकर-एडल्ट किंवा ज्युनियर आकारात उपलब्ध आणि ३" चाके किंवा ५" चाके किंवा चाके नसलेल्या विकल्पांमध्ये उपलब्ध
दुहेरी फोल्ड असलेली व्यवस्था असल्यामुळे तुम्ही प्रत्येक बाजुला सहजपणे ने आण करण्यासाठी ४" खोली पर्यंत दुमडता येऊ शकते. याचे वजन केवळ ६ पाऊंड असते, म्हणुन याचा प्रतिपाळ आणि उपयोग सहजपणे करता येतो. यामध्ये परिरेखीत हाताची पकड, दुहेरी स्टिल क्रॉस ब्रेसिस आणि जास्त दृढतेसाठी १" संपिडित ऍल्युमिनीयम ट्युबिंग समाविष्ट आहे. हाताच्या पकडीवर १८" रुंद आणि आधारावर २४" रुंद*१७ " खोल खोली असते. दृढ ठोस ब्रास डिटेन्ट बटणांच्यासोबत समायोजनीय छीद्रांच्या मुळे मोडण्यापासुन वाचता येऊ शकते. ५’३" पासुन ६’३" उंचीच्या व्यक्तींसाठी ज्युनियर आकार ३२" ते ३९" पर्यंत समायोजित होऊ शकतो. यावर न घसरणा-या रबराचा लेग लावलेला असतो. याची भार क्षमता ३०० पाऊंड असते.
 
चार चाके असणारा स्वस्त रोलींग वॉकर
स्वस्त ४ चाकी वॉकरला परिवहनासाठी सहजपणे दुमडले जाऊ शकते त्याच प्रमाणे फ्रंट स्वाईवल चाकांच्या बरोबर ५" ड्युल रियर चाके लावलेली असतात, यात सर्वात हलक्या आणि मजबुत रोलींग वॉकर फ्रेमचा वापर केलेला असतो आणि वजनाने सक्रिय ब्रेक यंत्रणा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती ज्यांची पकड सीमित आहे आणि जे हॅंड ब्रेक्स लावू शकत नाहीत, त्याच्यासाठीहे अतिशय उपयोगी असते. संपूर्ण आकार २१" रुंद* २३" लांब आहेत्याच प्रमाणे ५’२" पासुन ६’२"पर्यंत ची उंची असलेल्या व्यक्तींसाठी हॅंडलची उंची ३१" पासुन ३६" पर्यंत समायोजित होऊ शकते. १४" रुंद * १०" खोल पिशवी देखील आंतर्भुत होते आणि ती पुढील बाजुवर लावलेली असते ज्याच्या सोबत पॅडयुक्त बॅकरेस्ट लावलेली असते. याची भार क्षमता २२५ पाऊंड आहे.
 
चार चाके असलेला कुठेही जाऊ शकणारा रोलिंग वॉकर
हा दिर्घकाळपर्यंत टिकून राहणारा वजनाने हलका ऍल्युमिनीयम फ्रेम आणि एर्गोनॉमिक हाताच्या पकडीसोबत सहज स्पर्शाने लॉकिंग लूप ब्रेक्सने बनलेला वॉकर आहे. मोठे ८" चाक (फ्रंट व्हील स्वाईवल) असल्यामुळे वेगवेगळ्या पृष्ठभागांवर आणि किना-यांवर चालणे लहान चाकांच्या तुलनेमध्ये जास्त सोपे करते. इतर मानक गुनधर्मांमध्ये पॅडयुक्त सीट आणि बॅक रेस्ट उपलब्ध आहे, ज्यामुळे जेव्हा ब्रेक्सची गरज असेल, तेव्हा बसण्याची सुविधा उपलब्ध होते.एक लपलेला पाऊच आणि सीटच्या खाली नाईलॉनच्या कॅनवासने तयार केलेली स्टोअरेज सुविधा, ज्यामध्ये एक मुख्य भाग बनलेला आहे आणि व्यक्तीगत वस्तुंना ठेवल्यास पाहु नये म्हणुन दुसरा असे दोन भाग बनलेले आहेत. हॅंडलची उंची ३३" ते ३९" एवढी समायोजित केली जाऊ शकते आणि एकुण रुंदी २६" आहे आणि भार क्षमता २५०पाऊंड आहे.
 
हेव्ही ड्युटी फोल्डिंग वॉकर
हेवी ड्युटी वॉकरने जास्त भार क्षमता आणि उच्च समायोजन प्राप्त होते, जे मोठ्या आणि जास्त वजन असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. हे वजनाने हलकी असलेली फ्रेम आहे, परीही ५०० पाउंड वजन वाहु शकते. ५’२" ते ६’८" उंचीच्या व्यक्तींसाठी ३२" ते ४१" एवढे समायोजन होऊ शकते. एकुण रुंदी २४" आहे.
 
टेरीक्लॉथ हॅंडल कव्हर्स
मुबलक प्रमाणात पॅड युक्त कव्हर कठोर वॉकर हॅंडल्सना सुविधाजनक बनवतात. मऊ टेरीक्लॉथ आर्द्रता दूर करते आणि सहजपणे जोडले जाते.
 
वॉकर /व्हीलचेयर मल्टी पॉकेटयुक्त बॅग
९ १/२"* १३" आकाराची दिर्घकाळपर्यंत चालणारी नीळी डेनिम बॅग
 
वॉकर बास्केट्स
प्लॅस्टिकचे आवरण असलेल्या तारांची ही बास्केट्स दोन आकारांमध्ये उपलब्ध आहेत आणि कुठल्याही वॉकर सोबत सहजपणे जोडता येतात. दोघांच्या मध्ये प्लॅस्टिकचा ट्रे लावलेला असतो, ज्यामुळे लहान वस्तु बाहेर पडत नाहीत. तंग बास्केट (चित्र) इतर मोठ्या बास्केट्सपेक्षा कमी जटिल आहे आणि वेल्क्रो फ्रेम सोबत वॉकर फ्रेममध्ये किंवा त्याच्या बाहेर जोडली जाऊ शकते. याचा आकार १६" रुंद* ६" खोल* ७" उंच असतो. त्याच्य बरोबत यामध्ये मोठ्या आकाराच्या वस्तु सहजपणे ठेवल्या जाऊ शकतात. याचा आकार १८" रुंद* ७" खोल * ७ " उंच असतो आणि सुरक्षित विनाईलच्या थराने बनलेल्या वायर हुक्स सोबत वॉकरच्या बाहेर जोडली जाते.
 
वॉकर कॅडी
लहानसहान वस्तुंना जवळ ठेवता येते. याच्या सोबत १२ आऊस चा स्पिल प्रूफ पेय मग येतो. पुढच्या किंवा बाजुला लावलेल्या सरळ क्रॉस बारच्या सोबत सहजपणे जोडले जाते. याचा आकार १२" * ३ १/२" * ७" आहे आणि ते डिशवॉशरसाठी सुरक्षित आहे.
 
वॉकर फीट रीड्युस ड्रॅग
या ग्लाईडर फीटला कुठल्याही मानक आकाराच्या वॉकर ऑवा रबर फीट कॅप्स सोबत जोडा पुढच्या फीटला लावा किंवा सर्व फीट्सवर लावा किंवा पुढच्या आणी मागच्या फीटला लावा , यामुळे ड्रॅग कमी करण्यास सहाय्यता मिळते आणि सहजपणे बहुतांश आंतरीक आणि बाह्य पार्श्वभूमी संबंधी स्थितींमध्ये चालता येऊ शकते. हे चमकदार रंगाचे असतात, त्यामुळे खोलीचे आकलन करण्यासाठी सहाय्यता मिळते.
 
वॉकर पाऊच क्विल्ड
बहु उपयोगी स्टायलीश पाऊच ज्याचा आकार १३ ३/४ * १५ ३/४ एवढा आहे आणि त्यासोबत त्याच्या पाकिटाची खोली १०" खोल आहे. याला मशिनमध्ये धुता येते. कापडाचे डिजाईन वेगळे होऊ शकते.
 
बेड केन
बिछान्यामध्ये जाण्या येण्यासाठी बेड केन एक स्थिर सहाय्यता उपलब्ध करुन देते. जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या मार्फत उभे राहण्याचे किंवा बसण्याचे कार्य केले जाते तेव्हा, त्याचे संतुलन राखण्यास हे उपकरण मदत करते. हे उत्पादन सचलतेची समस्या असणा-या किंवा संतुलन ठेवू न शकणा-या व्यक्तींच्या अतिशय उपयोगी पडते. बिछान्याच्या छडीचा आधार लाकडी असतो, जो सुलभ फिटिंग साठी दोन मॅट्रेसिस किंवा बॉक्स फिटिंगमध्ये बसतो. याच्या हॅंडलला मेट्रेसिसच्या लांबी आणि रुंदीच्या अनुसार समायोजित केले जाते आणि अतिरीक्त स्थिरतेसाठी आणि सुरक्षेसाठी सुरक्षा पट्ट्या बिछान्याच्या फ्रेमला जोडल्या जातात. याची पकड कुशनची असते. हॅंडलच्या उंचीला समायोजित किंवा रीवर्स केले जाऊ शकते. यात सुरक्षा पट्ट्यांचा आंतर्भाव असतो
 
अल्टिमेट बेड रेल वीथ बील्ट इन ट्रे
अल्टीमेट बेड रेल आणि ट्रे च्या सोबत बिछान्यात जाणे येणे सुलभ होते. रेल उपयोगकर्त्यांच्या मार्गामध्ये येत नाही आणि तीच्यामुळे बीछान्यातुन बाहेर पडण्यासाठी हॅंडल उपलब्ध होते. बेडच्या बाजुच्या दुहेरी स्थिती ट्रेला बिछान्याच्या दिशेने आणले जाऊ शकते किंवा बिछान्यापासुन दूर नेता येऊ शकते. बिछान्याच्या दोन्ही बाजुंना रीव्हर्सेबल लावता येते. क्लोज सेल फोम ग्रीप ला सहज साफ करता येते. यामध्ये पाऊडर कोट फिनी सोबत गुणवत्ता युक्त स्टिलचे भाग लावले गेले आहेत. यासाठी कुठल्याही असेंब्लीची आवश्यकता भासत नाही ही आपोआप बॉक्समधुन निघते आणि बिछान्यावर लावण्यासाठी तयार असते. रेल ला घर किंवा हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या कुठल्याही बिछान्यासोबत जोडता येते आणि यात सुरक्षा पट्टीचा देखील समावेश असतो.
 
स्टॅंडिंग सिटींग टर्नेबल फॉर मोबीलीटी इंपेयर्ड
पिवॉट डिस्कला फिरवल्यामुळे स्टॅंडिंग किंवा स्थानांतरण करणे सहज आणि सुरक्षित होते चालण्या फिरण्यासाठी त्रास होत असलेल्या व्यक्ती या उपकरणावर बसु शकतात आणि बेड किंवा खुर्ची उघडू शकतात. कारच्या सीटवर बसण्या किंवा उठण्यासाठी ही उपयोगी असते. याचे प्रोफाईल निम्न स्वरुपाचे असते. खालच्या भागावर सरकणारा पृष्ठभाग उपलब्ध असतो आणि वरच्या बाजुला लावलेली प्लॅस्टिक डिस्क फेब्रिक सेंटरवर स्लाईड होते, टर्निंग डिस्कमुळे बाधामुक्त, नियंत्रित गती प्राप्त होते आणि उपयोगकर्ता सुरक्षिततेचा प्रत्यय अनुभवतो.
 
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.