OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

वृध्दांसाठी रचना आणि वातावरण

वृध्दअपंगांसाठी अडथळा विरहित वातावरण

रचना आणि वातावरण

जीवन कधीही स्थीर नसते. प्रत्येक पायरीवर ते नेहमी कृती आणि प्रयोग यांचे संमिश्रण असते, असे झाले नाही तर, ते आपली गतीमानता गमावते. बहुतांश कृतींची निर्मिती आंतर्मनातुन होते, आणि त्याचप्रमाणे ती कधी प्रेरणेच्या , तर कधी आत्मपरिक्षणाच्या स्वरुपात असते. परंतु अनुभवाचा संबंध अशा वातावरणाशी देखील असतो, ज्या वातावरणामध्ये व्यक्ती राहतात. वातावरणाचा अर्थ सभोवतालचा परिसर एवढा सिमीत नसुन, त्यात वातावरण आणि स्थिती या दोहोंचा देखील समावेश असतो. सहज शारिरीक व्यवस्थापना सोबत तणावविरहित सामाजिक परिस्थि्ती कोणत्याही व्यक्तीच्या स्वास्थ्यामध्ये आश्चर्यजनक बदल आणू शकते, हे विशेषत: वृध्दावस्थेसाठी जास्त प्रमाणात लागू होते, जेव्हा व्यक्ती अनेक चिंतांनी ग्रस्त असते.यासाठी संभव असलेल्या, कार्यशील आणि विश्वासार्ह भौतिक वातावरणाला महत्व दिले जाते.

वर्तमान काळामध्ये प्रत्येक वास्तुची निर्मिती सर्वसामान्य आणि निरोगी, तसेच सक्रिय व्यक्तीला लक्षात घेऊन केले जाते. सहजपणे या वास्तविकतेकडे दुर्लक्ष केले जाते, की प्रत्येक व्यक्तीचे वय कालपरत्वे वाढत असते. वय वाढण्यासोबत शरीरात देखील या प्रकारचे बदल होत असतात, ज्यामुळे सार्वजनिक सथळांचा उपयोग करते वेळी अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणुनच इमारतीची निर्मिती करते वेळी, संरचनांची ब्ल्युप्रिंट काढते वेळी, त्यांचा अवाका, उपयोग आणि सुरक्षा या घटकांवर भर देणे अतिशय गरजेचे आहे. या घटकांच्या व्यतिरीक्त त्यांचे दिशानिर्देशन, कार्यशिलता इतर मुद्द्यांना देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. संकल्पना किंवा विचारांची निर्मिती करते वेळी वृध्दांच्या बद्दल जागृतता बाळगली गेली असल्यास हे सर्व शक्य होऊ शकते.असे वातावरण जिथे उत्पन्न होऊ शकणा-या संभाव्य अडचणींची तीव्रता लक्षात घेऊन डिजाईन्स तयार केले असेल, त्यामुळे वृध्द व्यक्तींच्या आरोग्यावर नक्केच सकारात्मक प्रभाव पडेल. त्यांची एकटेपणाची भावना संभाव्य स्वातंत्र्यामध्ये बदलू शकेल, ज्याच्या परिणामस्वरुप त्यांच्या आरोग्याला पोषण प्राप्त होईल आणि त्यांना आंतरिक संतोष मिळू शकेल.आम्ही हे सर्व येथे साकारण्यास सहज बनवले आहे. www.oldagesolutions.org येथे आम्ही संरचनात्मक वातावरणाच्या रचनेचे नियोजन करते वेळी लक्षात घेण्यास आवश्यक असणा-या घटकांची सूची तयार केली आहे, त्यामुळे तीला वयस्क लोकांसाठी जास्त सुसंगत आणि सुविधाजनक बनवले आहे.


  • प्रत्येक संरचनेच्या प्रवेशला आणि निर्गमनाला केवळ सहजपणे हाताळता येण्यास शक्य बनवले नसुन, त्याला रस्त्यावरुन सहजपणे दिसेल असे ठेवले आहे. सुविधाजनक पातळीवर रॅंप्स, जीने आणि एल्वेटर्सची तरतुद करण्यात आली आहे.
  • आदर्श स्वरुपामध्ये १:१२च्या उतारावर आणि ६ मीटर लांब व १२० सेमी रुंद आकाराच्या रॅंप्सना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे आणि वृध्द तसेच दुर्बळ व्यक्तींच्या मार्फत वॉकर्सना घेऊन जाणे किंवा त्यांना व्हीलचेअर्स वरुन देण्यात मदत करण्यासाठी हॅंडरेल लावले जाणे गरजेचे आहे.
  • विस्तृत आणि पक्के रस्ते आणि गल्ल्या वयस्क व्यक्तींसाठी अधीक मदत करणारे ठरतात, तसेच ज्या वयस्कांना दमा व इतर श्वसनाशी निगडित असलेल्या व्याधी आहेत, त्यांच्यासाठी तर ते वरदान ठरतात.
  • इमारतींची बांधणी अतिशय अनुकुल असणे महत्वाचे आहे. योग्य प्रकाश व्यवस्था, वायुवीजन, उचित शौचालय व्यवस्था आणि स्वच्छ परिसर , आरोग्यदायी, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणाची निर्मिती करतात.
  • ध्वनी शोषुन घेणारी सामुग्री उदा. पडदे, चादरी, गालिच्चे , वेलबुट्टी असलेले पडदे, कापड असलेले फर्निचर इ. योग्य प्रकारचे ध्वनी विषयक वातारण निर्माण करते.

केवळ सुखद आणि सुरक्षित वातावरणामुळेच वयस्क व्यक्तींना आत्मसमाधान आणि आरामाच्या सोबत शांति, समरसता, एकांत व सुविधा प्राप्त होऊ शकते, ज्यांचा अभाव त्यांना आधी जाणवत होता.

वयस्क व्यक्तींच्या जीवनाचे खरे स्वरुप काय असेल, याला समजुन घेण्यासाठी उत्तम प्रकारचे वातावरण निश्चितच महत्वाची भूमिका पार पाडते.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.