OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

वृध्दांसाठी रचना आणि वातावरण

वृध्द अपंगांसाठी अडथळा विरहित वातावरण

वृध्द अपंगांसाठी अडथळा विरहित वातावरण

हेल्पएज इंडिया ही राष्ट्रिय पातळीवर लाभापासुन वंचित राहिलेल्या वृध्द लोकांसाठी कार्य करणारी स्वैच्छिक संस्था आहे. ही हेल्पएज इंटरनॅशनल ची एक संस्थापक सदस्य संस्था असून, ती वयोवृध्द व्यक्तींच्या समस्यांना सयुक्त राष्ट्र संघासमोर आणते, तसेच हेल्प दी एज्ड, यूके सोबत नीकटवर्ती संबंधीत आहे. आमच्या संरक्षकांमध्ये भारताचे पूर्व राष्ट्रपती श्री के.आर नारायणन आणि श्री आर.वेंकटरमण सामिल आहेत. नियमक प्रशासनामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होतो, जे लोक या पवित्र कार्यामध्ये सहभागी आहेत. हे पुस्तक हेल्पएज इंडियामार्फत वयस्क व्यक्तींची काळजी संबंधीच्या अनेक मुद्द्यांची माहिती आणि मार्गदर्शन देण्यासाठी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा एक भाग गणला जाते.

वैद्यकिय विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे,मनुष्याचे आयुष्य वाढले आहे. व्यक्ती ८० वर्षांपर्यंत जगु शकते. याचा असा अर्थ होतो की व्यक्तीविशेष सेवेतुन निवृत्त झाल्यावर किंवा ६० वर्षांच्या वयापर्यंत २० वर्षांपर्यंत वृध्दावस्थेच्या संदर्भातील सगळ्या समस्यांशी-शारिरीक अथवा मानसिक सामना करु शकते. जर कुठलीही व्यक्ती या काळादरम्यान स्वस्थ आणि स्वतंत्र जीवन जगण्यामध्ये यशस्वी झाल्यास, ती व्यक्ती सन्मानाने जीवनात पुढे मार्गक्रमण करीत राहते. यासाठी , विचारपूर्वक पुरवला गेलेला , निर्मित किंवा अनिर्मित बाधामुक्त परिसर , वयस्क व्यक्तींना या गोष्टीची अनुभूती मिळवून देण्यास मदत करतो की, ते त्यांच्या घरात आहेत, आणि त्यांना वृध्दाश्रमामध्ये एकटे ठेवले जाणार नाही.आम्ही अशा काही व्यवस्थांना सूचवत आहोत, ज्यांना निर्मित वातावरणामध्ये सहभागी करुन घेतले जाऊ शकते:


१. प्रवेश

तुम्ही कधी ना कधीतरी तात्पुरत्या किंवा कायमस्वरुपामध्ये तब्बेतीमध्ये बीघाड झाल्यास अशक्त होऊ शकता.

तुम्हाला व्हील चेयर किंवा वॉकरची गरज भासू शकते. त्यासाठी, घराचे प्रवेश द्वार अशा पध्दतीने बनवले गेले पाहिजेकी त्याचा उपयोग रॅंपच्या मदतीने केला जाऊ शकतो आणि ज्याची ग्रॅज्युअल उतरण १:१२ एवढी असेल.२. पाय-याशक्य असल्यास, तुम्हाला तळमजल्यावर रहाणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण सदस्यांना वरच्या मजल्यावर राहू द्यावे. जर त्यांना वरच्या मजल्यांवर रहावे लागले, तर त्यांनी जीन्यांचा उपयोग हळू आणि सावधानतेने करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमचे आरोग्य चांगले असेल, तर हा एक चांगला व्यायाम आहे. पाय-या चढते वेळी तुम्ह नेहमी हॅंडरेल्सचा वापर केला पाहिजे. पाय-या सरकण्यास प्रतिरोध करणा-या असाव्यात.पाय-यांच्या खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे, अशाप्रकारची नोजिंग दिली गेली पाहिजे, ज्यावर सरकण्याला प्रतिबंध केलेल्या पट्ट्या लावल्या जाव्यात, त्यामुळे तुमच्यापैकी अशा लोकांना त्यामुळे अडचण येणार नाही, जे लोक वॉकिंग स्टिक्सचा प्रयोग करतात, कारण या सुविधा मोकळ्या जागांमध्ये किंवा बाहेर आलेल्या नेजिंगमध्ये अडकू शकतात.यासोबत उघड्या राईजर्सपासुन बचाव करणे गरजेचे आहे. नियमित आणि लहान लहान अंतराळाने आरामासाठी लॅंडिंग व्यवस्था असली पाहिजे. पडण्यापासुन वाचण्यासाठी त्याठिकाणांवर चांगली प्रकाशव्यवस्था असली पाहिजे. प्रत्येक स्टेयर फ्लाईटवर पाय-या आणि राईजरच्या पहिल्या आणि शेवटच्या पायरीला दर्शवण्यासाठी करड्या रंगाच्या तुलनेमध्ये इतर रंगांनी चिन्हांकित केले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सहजपणे इथे तीथे जाऊ शकता.पहिली आणि शेवटची पायरी म्हणजे, दोन्ही ट्रेड्स आणि राईजर्स , प्रत्येक स्टेयर फ्लाईटवर पाय-यांच्या करड्या रंगावर उठून दिसणा-या रंगाने चिन्हांकित केली जाणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यात अधिक सुस्पष्टता येते. यामुळे तुम्हाला अडथळा आल्याशिवाय मार्गक्रमण करण्यास सुलभता होते.


३. रस्तेघरे आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये फुलदाण्या , कचरापेट्या इ.ना गल्ल्या, रस्ते आणि बागांच्या येण्याजाण्याच्या मार्गामध्ये ठेवून गर्दी करता कामा नये. रस्ते इ.मध्ये पाईप्स, कॉलम इ.सारखे बाहेर आलेले अडथळे नसावेत. जेथे संभव असेल तीथे सर्व अप्लायंसेसना आणि फिटिंग्जना रिसेस करावे. जर या खबरदा-या घेतल्या गेल्यास, तुम्हाला घरामध्ये अधिक मोकळे जाणवेल आणि तुम्हाला दैनंदिन कार्ये करणे सुलभ होईल. खरतर तुम्ही अधिक सक्रिय होण्यास प्रवृत्त व्हाल.


४. शौचालय

वयस्क व्यक्ती सर्वात जास्तवेळा शौचालयात पडतात. कारण फरशीवर पडलेल्या पाण्याने फरशीवर घसरडे होते. फरशी इ.ला घसरण्याला प्रतिबंध करणा-या टाईल्स आणि रबरी मॅट्सनी घसरण्यापासुन प्रतिबंध करणे आवश्यक आहे. वापरल्या नंतर प्रत्येकवेळी शौचालये कोरडी ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला रबरी सोल असलेली पादत्राणे वापरण्याचा सल्ला दिला जातो. शौचालयांमध्ये ५० मिली व्यासाच्या स्टीलच्या बारने तयार केलेले ग्रॅब बार्स होणे आवश्यक आहे.जेव्हातुम्ही वयामुळे अशक्त व्हाल किंवा तुमची तब्बेत नीट नसेल, तेव्हा देखील निश्चिंतपणे शौचालयाचा उपयोग करु शकाल.तुम्ही इंग्रजी डब्ल्यु सीला वापरण्याचे लहान वयामध्येच प्रशिक्षण घेऊ शकता, त्यामुळे वृध्दावस्थेत याचा उपयोग अधिक सहजपणे केला जाऊ शकतो. घुडघ्याच्या दुखण्याने पिडित अधिकांश व्यक्ती देखील इंग्रजी डब्ल्यु सीचा सहजपणे वापर करु शकतात. संधिवाताने ग्रस्त बोटे आणि मनगटांच्या मार्फत सहज उपयोगासाठी देखील सॅनेटरी फिटिंग्जमध्ये लीवर हॅंडल्स असणे आवश्यक आहे.५. फर्निचर

घरामध्ये फर्निचरची रचना साधी आणि अडगळ न होणारी असली पाहिजे. त्यामुळे कमी ऐकू येत असल्यामुळे किंवा अशक्त झाल्यामुळे अस्वस्थ वाटत असताना घरात सहज फिरता येऊ शकते. यामुळे तुम्ही निश्चिंत होता आणि घरात रोजची कामे सहजपणे करु शकता नाहीतर तुम्हाला सतत पडण्याची भीती वाटत राहते.फर्निचर आरामदायक देखील असले पाहिजे. बैठक जास्त खाली असू नये आणि त्यामुळे तुम्हाला उठण्यास अडचण येऊ शकते, कारण नेहमी बसलेल्या स्थितीमध्ये तुम्हाला उठण्यासाठी जास्त बल लावावे लागते.


६.प्रकाशव्यवस्था


तुमच्यापैकी बहुतांश लोकांची दृष्टि क्षीण होते. तुमचे डोळे चमकता प्रकाश सहन करु शकत नाहीत किंवा अंधारामध्ये तुमच्या दृष्टिला समायोजीत करण्यास अडथळा येऊ शकतो. जीथे शक्य असेल तीथे सुर्याच्या नैसर्गिक प्रकाशाची थेट तीव्रता कमी करण्याचा सल्ला दिला जातो. खिडक्यांच्या बाहेरच्या स्थानांवर बल्ब लावावे, त्यामुळे आतल्या चमकदार स्थळांच्या आणि बाहेरच्या अंधा-या रात्रीतली तफावत दूर करता येऊ शकते.


स्वीच प्लेट्सना स्पष्टपणे निर्देशित केलेले असावे आणि शक्यतो वेगळ्या रंमामध्ये सहजपणे दिसण्यासाठी रंगवावे. घराच्या आत बोळामध्ये आणि घराच्या बाहेर खुल्या येण्याजाण्याच्या रस्त्यांना वेगळे रंगवले गेले पाहिजे किंवा किनारी वेगळ्या दर्शविल्या पाहिजेत, त्यामुळे ते वेगळे दिसु शकतील आणि तुम्ही नि:संकोचपणे हिंडू शकाल.७. एकाऊंटिक्स (श्रवण विज्ञान)

तुमच्या पैकी बहुतांश लोकांना कमी ऐकु येत असेल. वाढत्या वया सोबत दुस-यांचे बोलणे स्पष्टपणे ऐकणे कठीण होते. उत्तम श्रवणा विज्ञानासाठी आवाजाल शोषुन घेणारे घटक जसे अपहोल्स्ट्री, टेपेस्ट्रीज, गालिच्चे, दरीज इ.चा उपयोग केला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे सामान्य संभाषणाला स्पष्टपणे ऐकले जाऊ शकते.
८.प्रतिपाळ

तुमच्यापैकी बहुतांश लोकांची प्रतिकारशक्ती क्षीण झाल्यामुळे , निर्माण केलेल्या वातावरणाला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आतल्या भिंती गुळगुळीत आणि एकसामान पृष्ठभाग असाव्यात असा सल्ला दिला जातो. या सपाट भिंतींवर धुळ आणि कोळीष्टके तयार होत नाही. त्याचप्रमाणे सपाट भिंती आणि गोलाकार केलेल्या किनारींमुळे तुम्हाला इजा होत नाही, कारण तुमची त्वचा तीची लवचिकता कमी झाल्यामुळे सहज घासली जाऊ शकते.


९. सौंदर्यशास्त्र

तुमच्या पैकी अनेक लोक एकटेपणाने आणि कौटुंबिक कारणे किंवा आजारपणामुळे येणा-या खिन्नतेने त्रस्त असतील, सौदर्य्शास्त्रदृष्ट्या सुखावह आणि उत्तम रितीने ठेवलेल्या परिसरामुळे तुमचे मनोबळ आश्चर्यकारक रितीने वाढते. तुम्हाला स्वत:ला स्वत:ची करमणुक करण्यासाठी आसपासचे जग पाहण्यासाठी खिडकी किंवा बाल्कनी सापडते. त्याचप्रमाणे तुम्ही घरातल्या एखाद्या कोप-यातुन इतरांना त्रासा न देता किंवा त्यांच्या मध्ये न येता, तुमच्या नातवंडांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत व्यस्त असताना पाहु शकता.


१०.सुरक्षा

समाजाचे सर्वात बहुमूल्य घटक होण्याच्या नात्याने चोरी किंवा खुन इ.साठी सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेश द्वारांची संख्या कमी करु शकता, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात येणा-या जाणा-या व्यक्तींवर योग्य ते नियंत्रण ठेवू शकता. कधीही सेल्समॅन आणि इतर लोकांना घरात न येण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही, कारण त्यांची ओळख करुन घेण्याचा कुठलाही विकल्प नसतो. तुम्हाला सेवा देणा-या व्यक्तींना घरात प्रवेश करण्याआधी त्यांची तपासणी केली जाऊ शकते. प्रवेशद्वारावर पीप होल, चेन किंवा लॅच किंवा उच्च ऍक्सेस नियंत्रण यंत्रणा घरातील प्रवेशावर नियंत्रण आणु शकतात.

वयोवृध्द लोकांच्या खाजगी क्वार्टर्स आणि शौचालयांमध्ये आपत्कालीन संपर्काची साधने उपलब्ध असावीत (उदा.टेलिफोन, शेजारी अलार्म, इंटरकॉम इ.) तुमच्यापैकी बरेच लोक वाढत्या वयामुळे वासाच्या क्षमतेमध्ये कमतरतेचा अनुभव घेतात. त्यासाठी घरामध्ये वायुवीजन उत्तम स्वरुपाचे असावे. वीजेच्या मुबलक पुरवठ्यासोबत चांगल्या दर्जाच्या तारा इ. मुळे शॉर्ट सर्किटची शक्यता कमी होते, ज्यामुळे आग लागु शकते. आंतर्गत स्थळांवर अग्नि प्रतिरोधक सामुग्रीमुळे बाहेर पडण्यास आवश्यक वेळ मिळू शकेल. असे घटक ज्यांच्या ज्वलनामुळे विषारी धुर निघतो, त्यांचा वापर घरामध्ये करणे टाळले पाहिजे.


अधिकांश वयस्क व्यक्ती विसराळू होतात. एकट्या राहणा-या वयस्क व्यक्तींसाठी काही सोप्या कृती सूचवल्या जाऊ शकतात, त्यांनी झोपण्यापूर्वी , किंवा घरातुन बाहेर पडण्याआधी खिडक्या आणि कपाटांना कुलुप लावण्यासाठी सूची पहावी असा सल्ला दिला जातो.


या शृंखलेतील इतर पुस्तके
 • डिसऍबलिटी इन एल्डरली
 • हाऊ टू रिटेन युअर टिथ
 • पार्किन्सन डिसीज
 • युनिनरी इन्कान्टिनेन्स इन एल्डरली विमेन
 • डाएट फॉर एल्डरली
 • हेल्थी एजिंग
 • बेटर साईट इन एल्डरली
 • हाऊ टू एन्जॉय हॅपीनेस इन लेटर लाईफ
 • हाई ब्लड प्रेशर
 • आर्थराईटिस-फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स
 • बेनाईन डिसीज ऒफ प्रोटेस्ट
 • बॅरियर फ्री एनवायन्मेंट फॉर एल्डरली
 • ओस्टियोपोरोसिस-यु ऍंड युअर बोन हेल्थ
 • पॉवर ऑफ मेडिटेशन
 • सेफ इनवायन्मेंट फॉर ओल्डर पर्सन्स
 • हाऊ टू प्रिपेयर युअर वील

हेल्प एज इंडिया डॉ.किरण सोहाल, विषेतज्ञ बाधारहित वातावरण वास्तुकला, यांचे या लेखाला तयार करण्याबद्दल आभार मानते..

संपादक डॉ. शुभा सोनेजा, प्रमुख आर ऍंड डी, हेल्पएज इंडिया.
(लेखी संमती शिवाय कुठल्याही भागाची प्रतिकृती किंवा प्रतिलीपी केली जाऊ शकत नाही.)

हेल्पएज इंडिया, कुतुब इनस्टिट्युशनल एरिया, नवी दिल्ली-१६ दूरध्वनी : 41688955-56. फॅक्स :26852916
लॉग ऑन करा:http://www.helpageindia.org/.ईमेल करा:helpage@nde.vsnl.net.in

टिप: वृध्दावस्थेच्या समाधानासाठी आम्हाला हे पुस्तक उपलब्ध करुन देण्याबद्दल मी हेल्पएज इंडियाचे आभार मानु इच्छितो.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.