OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

सुविधा

कायदेविषयक समस्या

जेष्ठ नागरिकांची सुरक्षा

वृध्दाश्रम डिरेक्टरी

वृद्धावस्था पेंशन योजना

इतर

सार्वजनिक तक्रारी पुनर्स्थापन व निरिक्षण यंत्रणा(पी जी आर ए एम एस) ही एन आय आय ई एन इ टी वईल एक ऑनलाइन संगणकीय यंत्रणा आहे जी जलदगतीने पुनर्स्थापन व निरिक्षण करते. निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनाचे सर्व तक्रारींचे अर्ज संगणाकावर नोंदवले जातात आणि संबंधित मंत्रालय/ विभागाच्या केंद्रीय तक्रार अधिका-याकडे संगणकीय पत्र पाठवले जाते. तक्रारींचे निवारण पूर्णपणे व्हावे व त्यांची योग्य ती दखल घेतली जावी यासाठी स्वयंचलित गजर यंत्रणा देखिल कार्यन्वित केली जाते. उत्तरांच्या पावत्यांची नोंद ठेवली जाते आणि थकित अर्जांची माहिती ठेवली जाते व त्यांचे वेळोवेळी सर्वेक्षण केलेजाते.

संबंधित मंत्रालये/ विभागातील सार्वजनिक तक्रार अधिकारी यांची त्यांच्या संपर्क माहितीसह यादी दिलेलि असून त्यामध्ये भारत सरकारविषयी सविस्तर माहिती व सुविधा (आय एफ सी) आहे.

निवृत्ती वेतन संबंधी कोणतीही तक्रार तात्काळ कार्यवाहीसाठी प्रमुख कचेरीत(हेड ऑफिस) , निवृत्ती वेतन मान्यता अधिकारी किंवा निवृत्ती वेतन संवितरण अधिकारी, करावे, सर्व पत्रव्यवहारामध्ये खालील आवश्यक माहिती असावी की जेणे करून आपली नोंद सहजपणे घेता येईल.

  • नाव
  • पूर्ण पत्ता
  • निवृत्त झालेल्या कचेरीचे नाव(कचेरीचे नाव पूर्ण असावे)
  • निवृत्तीच्या वेळेस आपला हुद्दा(व पगाराची श्रेणी)
  • निवृत्ती वेतन मान्य झाल्यास त्याचे परिमाण स्पष्ट केलेले असावे.

 

  • १. पी पी ओ जाहिर करणा-या खाते अधिका-याची माहिती
  • २. निवृत्ती वेतन संवितरण अधिका-याची माहिती
  • ३. पी पी ओ क्रमांक/ किंवा पी पी ओ ची प्रत

जर आवश्यकता वाटल्यास निवृत्तीवेतन विभाग आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण , लोक नायक भवन (३रा मजला), कान मार्केट, नवी दिल्ली-११०००३, हे निवृत्ति धारकांच्या समस्यांना पाहणारे केंद्रीय कार्यालय आहे त्याव्यतिरिक्त सचीव (पीजी), सार्वजनिक तक्रारी निदेशक, कॅबिनेट सचीव, सरदार पटेल भवन, पार्लमेंट मार्ग, नवी दिल्ली-११०००१. इथे संपर्क करू शकता.


हिमाचल प्रदेश सरकारतर्फे तरतूद( सोलन जिल्हा निवृत्तीवेतन हेल्पलाइन)

हिमाचल प्रदेश सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी प्रथम हेल्पलाईन सुरू केली असून निवृत्तीवेतनाची माहिती इंटरनेट वर उपलब्ध केली आहे. निवृत्तीवेतन धारकांना आपल्या निवृत्तीवेतनाच्या मासिक रकमेची माहिती मिळण्यासाठी(ऑक्टोबर २००१ पासून) त्यांचा पी पी ओ क्र. आणि नाव द्यावे लागते.कोणतीही शंका असल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा: जिल्हा कोष अधिकारी, सोलन , पिन कोड- १७३२१२, हिमाचल प्रदेश.


५५ वर्षे वरील संस्कृत पंडितांसाठी विशेष योजना

ज्या व्यक्तींनी आपला उदरनिर्वाह संस्कृत भाषा शिकवून केला त्यांना सद्य स्थितीत उदरनिर्वाहाचे कोणते साधन नसेल तर रु.१०,०००/- पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.


दिल्ली मधील करमणूक केंद्रे

१९४५-९५ मध्ये सामजिक कल्यण विभागामार्फत " दिल्ली मधील सर्व संसदीय क्षेत्रामध्ये जेष्ठ नगरिकंकरित करमनूक केंद्रे" ही योजना मांडण्यात आली. ही केंद्रे आराम, करमणूक आणि फावल्या वेळी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्याच्या उद्देसाने निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्येक करमणूक केंद्रामध्ये दूरदर्शन, रेडियो, पुस्तके, वर्तमानपत्र , धर्म व सामाजिक विषयांवरील प्रवचने व वाचनाच्या साहित्याने सुसज्ज वाचनालय, बैठे खेळ, सहलींचे आयोजन इ अतंर्भूत असावे. जर एखाद्या जेष्ठ नागरिकास जर या सुविधांचा आनंद घ्यावयाचा असेल ती व्यक्ती त्या प्रभागाच्या नगरसेवकाला संपर्क करू शकतो.


दिल्ली पोलीस व जेष्ठ नागरिक

दिल्ली पोलिसांतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना राबवल्या जातात त्यामध्ये त्या विभागातील गस्त पथकातील अधिका-यांना जेष्ठ नागरिकांची यादि करण्यास सांगण्यात येते आणि त्यांना योग्य ते वातावरण देण्याबाबत खात्री देण्यात येते. या योजने अंतर्गत, एस एच ओ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी त्यांना भेट देतो आणि गस्त अधिकारी दर रविवारी

दिल्ली पोलीस जेष्ठ नागरिक कक्ष हेल्प लाइन क्र.: १०१९१२९१. हा कक्ष अतिरिक्त पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा) यांच्या हाताखाली अधिकाराखाली येतो., अतिरिक्त पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा), दिल्ली पोलीस मुख्यालय, इंद्रप्रस्थ इस्टेट, नवी दिल्ली-११०००२.

गुन्हा, तक्रारी किंवा कोणत्याही स्वरुपाचा छळ व कोणत्याही प्रकारची अयोग्य त-हेची वागणूक या बद्दलची कोणतीही माहिती असल्यास पुढील पत्त्यावर पाठवावी: पोलीस आयुक्त, पोष्ट बॉक्स क्र. १७१, जी पी. ओ, नवी दिल्ली.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.