OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

प्रिय व्यक्तीचा मृत्यु

कुठल्याही जवळच्या किंवा प्रिय व्यक्तींच्या मृत्युचा अनुभव हा असा अनुभव असतो, ज्याचा आपण आपल्या जीवनात कधी ना कधीतरी , विशेषत: आपण वयस्क होत असताना सामना करावाच लागतो.

असे शक्य आहे की, तुम्ही आधीपासुनच तुमच्या पालकांच्या, भावाच्या किंवा बहिणीच्या, पती किंवा पत्नीच्या , चांगल्या मित्राच्या किंव्फ़ा मुले किंवा नातवंडांपैकी कुणा व्यक्तीच्या मृत्युचे दु:ख भोगलेले असते. अशी व्यक्ती जीच्यासोबत तुम्ही तुमचे जीवन घालवले आहे, त्या व्यक्तीच्या मृत्युने गंभीर तणाव निर्माण होतो. वयस्क होत असताना याचा अर्थ एका अशा भावुन नात्याचा मृत्यु असतो जे अनेक वर्ष टिकून राहिलेले असते.
तुमच्या जीवनात इतर समस्या असू शकतात: हालचाल करण्याचा अभाव, एकटे राहण्याची समस्या, अशक्तपणा, मुलांपासुन दूर राहणे, किंवा कुटुंबात सदस्य नसल्याची शक्यता असू शकते.

शोक एक अत्यंत व्यक्तीगत आणि दु:खकर स्थिती असते . कुठल्याही व्यक्तीपासुन दुरावल्यामुळे निर्मआण झालेल्या वेदनेचे मापन करण्याचे मोजमाप उपलब्ध नाही आहे, त्याच प्रमाणे आपल्याकडे व्यक्तीच्या मार्फत शोकाचा सामना केला त्याच्या पध्दतीने केला जातो. तरीही शोक करण्याची एक मान्यताप्राप्त पध्दत आहे, या अध्यायामध्ये तुम्हाला शोक किंवा दु:खाच्या सामान्य कारणांच्या बद्दल सांगितले जाईल, ज्यामुळे दु:ख निवारण कसे केले जाईल हे दर्शवता येऊ शकेल.

कुठल्याही अकस्मिक घटनेशी संबंधीत भिती आपल्यासाठी सर्वात जास्त भयंकर असते, परंतु जर तुम्ही स्वत: हे जाणता कि शोकातुन वर आहे पाहिजे आणि लोक कशाप्रकारे स्थितीतुन जातात, याची तुम्हाला माहिती असल्यास, त्यामुळे कदाचित जवळच्या व्यक्तीच्या मृत्युचा सामना करण्यासाठी तुम्हाला तयार राहण्यास सहकार्य मिळू शकेल.
प्राचीन काळामध्ये, शोक करण्यासाठी अधिक औपचारिकता आणि दु:खाच्या बाबतीततल्या रुढी आपल्याचा जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, कदाचित आपण शोक करण्याच्या रुढींची उपेक्षा करु शकतो, परंतु त्या आपल्या आरोग्य आणि दु:खातुन वर येण्यासाठी आवश्यक असतात. आपण स्वत:ला दु:ख करण्यासाठी आणि दु:ख सहन करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, आणि आपण असे दुस-यांसाठी देखील केले पाहिजे व त्यांची मदत केली पाहिजे. अनेक व्यक्तींना धर्माच्या माध्यमातुन शांती मिळू शकते. परंतु जर तुम्ह नेहमी धर्मावर अढळ विश्वास ठेवत असाल तर, कदाचित तुमचा विश्वास तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्युने ढासळू शकतो, जर तुम्ह नियमित पुजा अर्चा करीत नसाल तर, तुम्ही नव्याने जीवनाची सुरुवात करु शकता. शोकाकुल अवस्थेमध्ये व्यक्तीगत विश्वास आणि दुष्टिकोनाच्या संबंधीत हेतुमुळे जास्त मन:शांती मिळते.

दु:खामुळे उत्पन्न झालेल्या तणावामुळे आपल्यावर अधिक शारिरिक आणि भावनात्मक भाग पडतो. तणावामुळे आपल्यासोबत घडणा-या दुर्घटना वाढू शकतात. म्हणुन आपल्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे. आराम, पौष्टिक आहार, ताजी हवा आणि व्यायाम या दु:खकर घटनेतुन बाहेर पडण्यासाठी औषधे आणि अल्कोहोल पेक्षा जास्त आवश्यक असतात.


तुमच्या भीतीला वाटा

आपल्या वाढत्या वयासोबत कदाचित आपण भीतीचे ओझे वाहु लागतो. शोकाकुल स्थितीत, आपल्याला लहानपणीच्या भीतीचा किंवा नवीन प्रकारच्या भीतीचा अनुभव येऊ शकतो उदा. अंधाराची भीती, अनोळखी भविष्याबद्दलची भीती, घर बदलण्याची भीती, घरी काम करु न शकण्याची भीती, अनेक वर्ष दुस-या सोबत राहिल्या नंतर एकटे राहण्याची भीती, परंतु याला वाटु शकणे शक्य असते, या भीतीला दुर करण्यासाठ तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि मित्राची मदत घेऊ शकता.


आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्युसाठी कणखर बनणे

मृत्यु बद्दल बोलणे वावगी गोष्ट नाही परंतु जेव्हा शक्य असल्यास शारीरीक आणि मानसीक अशा सोन्ही स्वरुपांमध्ये यासाठी कणखर बनणे समजुतदार पणाचे लक्षण आहे. कुठली गोष्ट कशाप्रकारे करता येईल याची आपल्याला सर्वप्रथम माहिती नसते, यामुळे दु:खद घटनेच्या वेळी राग आणि संभ्रमाची अवस्था असू शकते. भावनात्मज उतार चढावाच्या स्थितीत दैनंदिन कार्य करु शकण्यामुळे अतिशय समाधान मिळू शकतेआणि आपल्या जवळ्खच्या व्यक्तीला तुम्ही या स्थितीचा सामना करु शकत असल्याचा आनंद होत आहे याचे समाधान मिळू शकते.


मृत्यु झाल्यावर केली जाणारी कार्ये.

घरी कुठल्याही व्यक्तीचा मृत्यु झाल्याच्या स्थितीत, जर पोलिसांना याची सूचना न दिल्यास, मृत्युची पुष्टि देण्यासाठी तपासणी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी डॉक्टरांना बोलवा. मृत्युच्या विशिष्ठ कालावधीच्या आत त्या प्रमाणपत्राला स्थानिक जन्म मृत्यु रजिस्ट्रार कडे घेऊन जाणे गरजेचे आहे.


अकस्मिक निधन

अचानक आणि अनैसर्गिक मृत्यु झाल्याच्या स्थितीत, याची माहिती पोलिसांना देणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे. ज्यामुळे पोस्ट मार्टेम होऊ शकते आणि मृत्युचे कारण माहित करुन घेण्यासाठी तपासणी केली जाऊ शकते. बहुतांश स्थितींमध्ये एका विशिष्ठ प्रकारची तांत्रिक औपचारिकता असते, त्यामुळे जास्त चिंता करु नये.


मृत्युची सूचना

तुम्ही वर्तमान पत्रात मृत्युची सूचना देऊ शकता ज्यामध्ये अंत्येष्टिची तारीख, वेळ आणि स्थान दिलेले असते. याप्रकारच्या शोक संदेशासाठी वृत्तपत्राच्या क्लासीफाईड जाहिरात विभागाच्या कर्मचा-यांमार्फत तुमच्या शब्दांच्या निवडीसाठी सहाय्य मिळू शकते आणि तुम्हाला खर्चाचा अंदाज देण्यात येतो. सुरक्षा कारणांमुळे तुम्ही स्वत:ला सहभागी न करण्याचा देखील निर्णय घेऊ शकता.


व्यावहारीक दृष्ट्या काय करावे आणि करु नये
  • मृत्युसाठी स्वत:ला आधीच कणखर बनवा
  • आपल्या भावनांना व्यक्त करा, त्यांना लपवण्यात काहीही अर्थ नसतो. घडलेल्या घटनेबद्दल तुमच्या कुटुंबीयांशी, मित्राशी किंवा जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा.
  • स्वत:कडे लक्ष द्या: योग्य आहार आणि आराम घ्या.
  • घरात दुर्घटना होऊ नये म्हणुन खबरदारी घ्या आणि तुमचे घर सुरक्षित असल्याची खात्री करुन घ्या.
  • तुमचे स्वास्थ्य गंभीर असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुमच्या कुटुंबीयांकडुन आणि मित्रांकडुन लवकर निर्णय घेण्याची मागणी असल्यास तसे करु नका.
  • तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टिंसाठी कुठलाही आर्थिक करार करु नये.
  • अंत्येष्टिमधील परंपरांवर जास्त खर्च करु नका. जास्त प्रमाणात औषधे, अल्कोहोल आणि धुम्रपानाचा आधार घेऊ नका.
  • दु:खी अवस्थेत बाहेर पडु नका. तुम्हाला बदललेल्या परिस्थितीत सामावण्यासाठी वेळ लागू शकतो.
  • सामान्य स्थितीत परत येण्यासाठी घाई करु नका, याला स्वाभाविकपणे होऊ द्या.
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.