OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

वृध्दावस्थेतील उत्तम नजर

जस जसे आपले वय वाढत जाते, त्याचसोबत आपल्या दृष्टित कमी येऊ लागते आणि ६० वर्षांच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला चष्मा लागतो. काही असे रोग देखील असतात, ज्यामुळ्खे वृध्दावस्थेत दृष्टिवर प्रभाव पडतो. डोळ्यांची नियमीत तपासणी , योग्य चष्मा, शल्य चिकित्सा, औषधे आणि दृष्टिशी निगडीत सहाय्यक उपकरणांमुळे बहुतांश लोक त्यांची योग्य ती दृष्टि राखण्यास यशस्वी ठरतात आणि स्वतंत्र आयुष्य जगतात.


दृष्टिची नियमीत तपासणी

दृष्टिची तपासणे केवळ चष्म्यासाठी केली जात नाही, तर ती व्यक्तीच्या संपूर्ण डोळ्याची तपासणी असते. जर कुठल्याही व्यक्तीला डोळ्यांचा आजार उद्भवला असेल, तर त्याची तपासणी वेळेवर केली जाऊ शकते. यामुळे नियमीत दृष्टि तपासणी करणे आवश्यक आहे आणि व्यक्तीच्या दृष्टित बदल घडुन आल्यास डोळ्यांची वारंवार तपासणी केली पाहिजे. डोळ्यांची तपासणी विशेष स्वरुपाची असते, ती नेत्र चिकित्सकाकडुन केली जाते. जर कुठल्याही व्यक्तीच्या नेत्र चिकित्सेत असामान्य बाब आढळून आली , तर त्याच्या साठी पुढचा उपचार करण्याची गरज भासते, तुमच्या कौटुंबीक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


चष्मे आणि कमी दृष्टीशी संबंधीत सहाय्यक उपकरणे

तुमच्या दृष्टीच्या नंबरप्रमाणे चष्मा बनविण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल वापरण्यासाठी तयार वाचनाचे चष्मे देखिल उपलब्ध आहेत. त्याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता नसते, परंतु त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो आणि डोकेदुखी होऊ शकते. तुमचा चष्मा स्व्च्छ करणे विसरु नका. लेन्सचा पृष्ठभाग जमिनीस स्पर्श करेल अशाप्रकारे चष्मा ठेवु नये, त्यामुळे चष्म्यावर ओरखडे पडतात.ओरखडे असलेल्या चष्म्यमुळे स्पष्ट दिसत नाही आणि कमी दिसू लागते.

मॅग्नीफ़ायरने वस्तू मोठ्या दिसतात, त्यामुळे एरव्ही अडचण भासणारी काये सहजतेने होऊ शकतात, कारण अशा व्यक्तींची दृष्टी क्षीण झालेली असते. पुरेसा प्रकाश

६०वर्षांमध्ये २० वर्षांच्या तुलनेत अपेक्षित दृष्टीच्या तीप्पट प्रकाशाची आवश्यकता असते. तुमच्या घरात नैसर्गिक प्रकाश भरपूर असावा. घरात योग्य विद्युत व्य्वस्था असण्याची, विशेषतः जिन्याच्या सुरवातीला आणि शेवटी अशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. वाचणे आणि जवळ्च्या दृष्टीशी संबंधित कार्ये करीत असताना, पुस्तक आणि कामाच्या मागच्या बाजूने उजेड येण्याची खात्री केली पाहिजे. फ़्लोरोसंट दिवे खास करुन हितावह असतात, कारण ते मोठ्या प्रमाणावर प्रकाश देतात आणि उष्मा देखिल अतिशय कमी असतो.


दृष्टी अधिक दुर्बल होण्याची कारणे

डोळ्यांच्या काही विशेष स्थितींमुळे वयस्क व्यक्तींची दृष्टी आणखीन क्षीण होते ज्यामध्ये खालील घटकांचा सह्भाग होतो-


मोतीबिंदू

ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये सामान्यतः पारदर्शक असणारे भिंग अपारदर्शक बनते.यामुळे वेदनामय रितीने दृष्टी क्षीण होते.सुरवातीला ही समस्या चष्मा वापरून दूर करता येते, परंतु त्यासाठी व्य्क्तीला शस्त्रक्रियेची गरज भासते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत अपारदर्शक भिंगाला काढले जाते. दृष्टीला प्लॅस्टीकचे एंट्रा-ऑक्युलर (डोळ्यातील) भिंग बसवुन नीट केले जाते किंवा चष्मा दिला जातो.


मधुमेह रेटिनोथेरपी

मधुमेहामुळे दृष्टीपट्लात बदल सुरु होतो ज्यामुळे डोळ्यांमध्ये विकृती निर्माण होते. सर्वसामान्यतः हे बदल कायमस्वरुपी असतात. आजकाल याबद्द्ल सुरवातीलाच माहिती मिळते, आणि लेजरच्या उपचाराने दृष्टीचा र्हास होणे थांबवले जाऊ शकते. रक्तशर्करेवर सक्तीचे नियंत्रण आणण्यासोबतच, प्रत्येक रुग्णाने मान्यताप्राप्त नेत्रतज्ञाकडून डोळ्यांची सविस्तर तपासणी करुन घेतली पाहिजे.


ग्लुकोमा

ग्लुकोमा अस्थायी स्वरूपात दृष्टी क्षीण होण्याचे कारण असून यात डोळ्यांमधला अंतर्गत दाब वाढतो. सुरवातीच्या अवस्थेत रोगाचे निदान आणि उपचार आवश्यक असतात. ग्लुकोमाचा इतिहास असलेल्या ४० वर्षांवरील सर्व व्यक्तींनी नियमित स्वरुपात ग्लुकोमाची तपासणी केली पाहिजे.


वयाशी संबंधित मॅक्युलर विक्रती

दृष्टीपटलावर मॅक्युला दृष्टीचे केंद्र असते. मॅक्युलामधील वयोमानापरत्वे येणा-या विकृतीमुळे नजर क्षीण होते, कधी कधी याची तीव्रता गंभीर स्वरुपाची असते. काही स्थितींमध्ये लेजरच्या उपचारामुळे मदत मिळते. इतर व्यक्तींमध्ये चष्मा, कमी दृष्टीसंबंधित उपकरणे, सकस आहार उदा. फळे, भाज्या यांचा समावेश होतो. थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळावा आणि जीवनसत्वे व खनिजांचे सेवन करावे.

यापैकी काही रोग उपचाराने ठीक होतात. उपचार निरुपयोगी असतील किंवा उपलब्ध नसतील तर व्यक्तींमार्फत आपल्याला उरलल्या दृष्टीचा उपयोग मदत करता येते. केवळ काही टक्के लोक अजिबात पाहू शकत नाहीत, काही व्य्क्ती ज्या नोंदणीकृत नेत्रहिन असतात, त्यांच्यामध्ये देखिल पाहण्यची क्षमता काही प्रमाणात शिल्लक असते. दृष्टीदोष असलेल्या व्यक्ती घरात आणि बाहेर सुरक्षीतपणे वावरणे शिकू शकतात, ज्यामुळे ते खरेदी, स्वयंपाक करणे, घर चालवणे, विरंगुळ्याच्या वेळात कामे करणे सामाजिक कार्यात सहभाग घेण्यासारखी कामे करु शकतात. व्यक्तींची दृष्टी क्षीण झाल्यास, घरातील प्रकाश व्यवस्था वाढवली पाहिजे. या स्थितीत कमी दृष्टीसाठीची सहाय्यक उपकरणे उपयोगी पडतात.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.