OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

कर्करोग

वयस्क भारतीयांच्या मृत्युच्या पाच मुख्य कारणांपैकी कर्करोग/कॅन्सर महत्वाचे कारण आहे. कॅन्सरच्या विकासाचा व्य हा सर्वात महत्वपूर्ण घटक असतो. कॅन्सर आणि वय यामधला संबंध जरी गौण असला तरी खालील बाबींमुळे वृध्दावस्थेत कॅन्सर होण्याची जोखीम वाढते: दुर्बळ पेशी दुरुस्ती यंत्रणा, कॅन्सर उद्देपित करणा-या जीन्सची सक्रियता आणि कॅन्सर प्रतिबंधत करणा-या जीन्सची कमतरता, कॅन्सरच्या संबंधी जागरुकतेची कमतरता आणि आयुष्यभर कार्सिनिजीन्सश संपर्क येणे.

विशीष्ठ प्रकारचे कॅन्सर वयाच्या पन्नाशी नंतर उद्भवतात. यामध्ये डोके, आणि घशाचा कॅन्सर, स्त्रीयांच्या गुप्तांगाचा कॅन्सर, जठरांत्राच्या वरच्या आणि खालच्या भागाचा , स्वादुपिंड आणि पुरस्थ ग्रंथींच्या कॅन्सरचा समावेश असतो. वक्ष आणि हृदयाशी संबंधीत अर्ध्यापेक्षा जास्त घटना वयाच्या साठी नंतर आढळून येतात.


  • कॅन्सरसाठी च्या स्क्रिनींगमध्ये रुची नसणे. समस्येच्या बाबतीतली जागरुकता असण्याची कमतरता.
  • सामान्यत: कॅन्सरशी निगडित प्राणघातक प्रवृत्ती

वृध्दावस्थेत कॅन्सरचा विकास भिन्न प्रकारचा असू शकतो हे दाखवणारे पुरावे आहेत. परंतु वयोवृध्द लोकांमध्ये कॅन्सरचे निदान उशीरा होते. निदानामध्ये होणारा उशीर खालील कारणांमुळे होऊ शकतो:


व्यवस्थापन तत्वे

वयोवृध्द व्यक्तींवर आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात उपचार केला जातो, अशी गैर समजुत आहे की, वयस्क व्यक्ती शल्य चिकित्सेसाठी कमी प्रमाणात पात्र असतात. त्याचप्रमाणे ते रेडियोथेरपी आणि किमोथेरपी सहन करु शकत नाहीत. जास्त वय असणा-या व्यक्तींच्या संदर्भात कॅन्सरचा आकडा नगण्य आहे कारण, बहुतांश अभ्यासांमध्ये या प्रकारच्या रोग्यांना समाविष्ट करुन न घेण्याची प्रवृत्ती असते. ज्याप्रकारे इतर वयोगटांसाठी रुग्णांवरच्या उपचार तत्वांचा अंगिकार केला जातो, त्याचप्रकारे वयस्क व्यक्तींच्या बाबतीत देखील कारवाई करणे गरजेचे असते.

उपचाराचा प्रभाव आणि विषारीपणाच्या उच्च तीव्रतेसाठी आधीच प्रवृत्त होण्यावर वयाचा कुठलाही प्रभाव पडत नाही. शारिरिक फिटनेस आणि मानसिक आरोग्यावर विचार करण्याची गरज असून कालक्रमाप्रमाणे वयाला आणि उपचाराच्या सर्व विकल्पांना जास्त प्रमाणात घेता कामा नये. .


उपशामक देखभाल

असाध्य किंवा अंतिम पातळीवरील कॅन्सर रुग्णांना होणारी वेदना , निराशात्मक लक्षणे आणि इतर मनोवैज्ञानिक मुद्द्यांच्या सक्रियतेने केलेल्या देखभालीला उपशामक देखभाल असे म्हणतात. वयस्क व्यक्ती उपशामक देखभाल प्राप्त करण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. चोवीस तासांसाठी ओरल ओपियम आणि त्याच्या उत्पत्तींसोबत वेदनेपासुन धीर देण्याच्या कार्याचा समावेश उपशामक देखभालीच्या सर्वात महत्वपूर्ण कार्यांपैकी एक कार्य आहे. योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे सर्व लक्षणांची लक्षणांच्या अनुसार देखरेख करण्याचा प्रयत्न जरुर केला गेला पाहिजे.

कॅन्सरवरील नियंत्रण आणि स्क्रिनींग

जीवनशैलीत बदल, आहार आणि व्यायामाचा समावेश असलेले उपाय वृध्दावस्थेत कॅन्सरवरील प्राथमिक नियंत्रणासाठी कमी प्रमाणात महत्वाचे असतात. .

दुस-या बाजुला स्क्रिनींग मार्फत वेळेवर शोध घेऊन द्वितीय पातळीवरील नियंत्रण व्यावहारिक दृष्ट्या जास्त महत्वाचे असते. २५ वर्षांच्या तरुणांच्या तुअलनेत ७५ वर्षांच्या वयस्क व्यक्तींमध्ये कॅन्सर सहजपणे आढळून येतो, म्हणुनच वृध्दावस्थेत स्क्रिनींग स्वस्त पडते. .
नियमीत रुपात स्क्रिनींग केलेले कॅन्सरचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.


  • फुप्फुस-छातीचा एक्सरे
  • मोठे आतडे आणि मलाशय-डिजीटल तपासणी, स्टूल ऑक्युल्ट ब्लड
  • प्रोस्टेट-डिजीटल तपासणी
  • स्तन- सयंपरिक्षण, मॅमोग्राफी
  • स्त्री गुप्तांग- पॅप स्मीयर

तरीसुध्दा अनेक सामाजिक आणि व्यावहारीक कारणांमुळे वृध्द लोक कॅन्सर स्क्रिनींग कार्यक्रमांमध्ये साधारणत: जास्त रुची दाखवत नाहीत.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.