OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

मलावरोध

व्यक्ती शौचास जाण्याची वारंवार आवश्यकता आणि शौचाचे प्रमाण व्यक्तीप्रमाणे बदलते. शौचाला कमी वेळा जाणा-या आणि जास्त वेळा जाणा-या आणि जास्त वेळ लावणा-या किंवा पूर्णपणे शौच झााल्याची भावना न होण्याच्या स्थितीला मलावरोध असे म्हटले जाते वयस्क व्यक्तींमध्ये मलावरोध ही सामान्य बाब आहे. वयस्क व्यक्तींच्या या तक्रारीचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत पाचपटीने अधिक असते, कदाचित त्यांना स्वत:च्या शौच प्रक्रीयेबद्‌दल नको एवढी चिंता असते .

मलावरोधाची अनेक कारणे असतात.जठरांत्रांच्या खालच्या भागातील रचनेतील अनियमितपणा हे सर्वात मोठे चिंतेचे कारण असते.वृघ्दावस्थेमध्ये मोठया आतडयांचा कॅन्सर न होण्यावर जास्त भर दिला जातो. सुदैवाने, मलावरोध असलेल्या बहुतांश रुग्णांकडे त्यांची ल़क्षणे स्पष्ट करण्याजोगी अनेक कारणे असतात. ज्यापैकी नेहमी आढळणारे कारण म्हणजे इरिटेबल बाऊल सिंड्रोंम किंवा मोठया प्रमाणातील शौचाच्या हालचालीतील बिघाड होय. इतर महत्वाच्या कारणांमध्ये औषधांचे दुष्परिणाम, व्यायामाचा अभाव, पुरेशा प्रमाणात तंतुमय आणि द्रवरुप आहाराचा अभाव, अतिप्रमाणात विरेचकांवर अवलंबून असण्याचा समावेष होतो.

ऍटयासिड्‌स, ऍटि हिस्टामाईन्स, मु़त्राशी संबंधित, पार्किन्सस रोगावरील औषधे, उच्च रक्तदाबाची औषधे, लोहयुक्त औषधे, मांसपेशींना आराम देणारी औषधे आणि ओपिडटसमुळे काही लोकांना मलावरोध होतो. कमी प्रमाणात भाज्या, फळे, अख्खे अन्नधान्य सेवन आणि जास्त प्रमाणात अंडी, मांस आणि दुग्ध उत्पादनांच्या सेवनामुळे मलावरोधाचा जास्त प्रादुर्भाव होतो. याच्यासोबत पुरेसे अन्न न खाणे किंवा हलका आहार घेणे यामुळे मलावरोधाचे प्रमाण वाढते.

जास्तकाळ अंथरुण धरणे, दुर्घटनेमुळे हालचाल बंद होणे, शौचास जाण्यास कंटाळा कारणे यामुळे मलावरोध होऊ शकतो सध्याच उत्पन्न झालेल्या ल़क्षणांच्या उपाचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ज्यामुळे तुमचा गंभीर समस्येतून बचाव होतो. जेव्हा संरचनात्मक बिघाडाच्या शक्यतेला दूर केले जाते तेव्हा खालीज उपाय


सर्वसामान्यत: उपयोगी पडतात
  • जास्त प्रमाणात फळे, भाज्या, अख्खे धान्य, डाळींचे सेवन करणे. मिठाईसारख्या प्रक्रिया केलेला आहार चरबीयुक्त आहार कमी प्रमाणात खाणे
  • भरपूर दुग्धपदार्थांचे सेवन करणे (6 ते 8 ग्लास), जर तुम्हाला ह्रदयरोग, अभिसरण किंवा वृक्काची समस्या नसेल तर परंतू जास्तप्रमाणात दुध प्यायल्यामुळे देखील मलावरोध होतो.
  • शारिरीक कार्ये वाढवणे
  • जरी तुम्हाला भावना येत नसली तरी दररोज काही विशीष्ठ वेळी शौचालयात थोडा वेळ घालवून शौचास जाण्याची वेळ निश्चित करावी.
  • शक्य असल्यास विरेचकांचे सेवन टाळावे आणि ऍटासिडचे सेवन मर्यादेमध्ये करावे
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.