OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

खिन्नता

वय वाढत जाते तसे औदासीन्य येणे ही एक सामान्य समस्या आहे .त्यामूळे एखाद्या व्यक्तिस अतीव दु:ख सोसावे लागते आणि दैनंदीन जीवनात व्यत्यय येतो . त्यामुळे फक्त रोग्यालाच नाही तर त्यांच्या देखभालकर्त्यांसही कष्ट आणि अडचणी निर्माण होतात, ज्यापैकी ब-याचशा विनाकारण असतात .औदासीनाने ग्रासलेल्या बहुतांश लोकांना त्यावरील इलाजाची बात माहिती नसते , तरिही बहुसंख्य पिडीतांना मदत केली जाऊ शकते . नैराश्यासंबंधीची अस्वस्थता ही क्षणिक दु:खी मन:स्थिती सारखी नसते आणि ती आपोआप थांबत नाही शिवाय उपचाराअभावी अशी लक्षणे अनेक आठवडे , महिने किंवा वर्षे टिकून राहतात.
नैराश्यासंबधीची अस्वस्थता इतर आजारांप्रमाणे वेगवेगळ्या स्वरुपात प्रकट होते . ब-याचदा नैराश्य म्हणजे अशी लक्षणे असतात कि ज्यामुळे एखाद्याची कार्यक्षमता निद्रा , खाणे - पिणे व आनंददायक गोष्टींचा उपभोग घेणे यास अडथळा येतो .अशा नैराश्याच्या दुर्बल करणा-या घटना आयुष्यात अने कदा घडू शकतात. कमी नैराश्यामध्ये दिर्घकालीन जीर्ण क्षणांचा समावेश असतो . जी दुर्बल करत नाहित पण त्यामूळे तो आपल्या पूर्व क्षमतेनुसार काम करू शकत नाही किंवा चांगले वाटत नाही . नैराश्याची अवस्था आजारपानात देखील घटना घडु शकतात .मानिक - डिप्रेसिव सायकोसिस डिसऑर्डर हा नैराश्याचा तिसरा प्रकार आहे . ह्यामध्ये नैराश्य आणि हर्ष यांची आवर्तने समाविष्ट होतात कधी कधी मन:स्थिती क्षणात बदलते , तथापि ती ब-याचदा हळू हळू बदलते .


नैराश्याची लक्षणे खालिलप्रमाणे आहेत
 • सतत उदास , चिंतित किंवा रिक्तपनाची मन:स्थिती निराशा व दु:खीपणा
 • अपराधी भावना , अनुपयोगिता आणि अस्वस्थता
 • पूर्वी ज्याचा आनंद घेतला होता छंद किंवा कामात , ज्यात कामजीवन ही येते यात निरसता.
 • निद्रानाश , पहाटे लवकर जाग येणे किंवा अति निद्रा
 • भूक न लागणे , आणि वजन घटणे किंवा अति खाणे आणि वजन वाढणे .
 • शक्ती कमी होणे , थकवा किंवा संथपणा मृत्यू किंवा आत्महत्तेचे प्रयत्न
 • बेचैनी , चीडचीडेपणा , सकेंद्रित न होता येणे ,विस्मृती आणि निर्णयक्षमता नसणे .
 • उपचारांनी बरी न होणारी समस्या लक्षणे डोके दुखी , पचनासंबधी विकार आणि जुनाट दुखणे.

नैराश्यचा विकार उद्भवण्यात मानसिक जडण -घडण / मनोवृत्ती अतिशय निर्णायक असते . कमी आत्मसन्मान असलेली व निराशावादी व्यक्ति किंवा ज्या व्यक्ति तणावामुळे क्विलिन होतात त्यांना नैराश्य येण्याची जास्त शक्यता असते .

जीवन चक्रामध्ये गंभिर हानि , जीर्ण आजार , दुष्कर संबंध , आर्थिक प्रश्न आणि इतर नकारात्मक बदल यामुळे अचानक नैराश्याचा प्रसंग घडु शकतो. अनेकदा मनोवैज्ञानिक पारिसरिक घटक या नैराश्याच्या अस्वस्थतेला कारणीभूत असतात.


निदान व उपचार

नैराश्य विकाराचे अस्तित्व आणि त्याचे वर्गीकरण करण्यासाठी संपुर्ण शारिरिक व मानसिक चिकीत्सा ह्या अतिशय महत्वाच्या पाय-या आहेत . काही विशिष्ट औषधे आनि वैद्यकिय चिकीत्सिय रोगांमुळे नैराश्य येऊ शकते . जे रोखण्यासाठी परिक्षण , साक्षात्कार व प्रयोगशाळा परिक्षण केले गेले पाहिजे .

निदानाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत , जे चिकित्सेच्या परिणामांवर अवलंबुन आहेत. अनेक अवसादरोधी औषधोपचार उपलब्ध आहेत.तसेच नैराश्यावस्थेवरील इलाजासाठी मानसोपचाराचा उपयोग होऊ शकतो . अवसादरोधी औषधांच्या गटात ट्रायसायक्लिक अवसादविरोधी , मोनोअमाईन ऑक्सिडेस इन्होविटर्स (MAOls) , लिथीयम व निवडक सेरेटोनीन रिसेप्टर इनहिबिटर्स (SSRI) ही औषधे येतात. काही लोक मानसोपचाराला चांगला प्रतिसाद देतात .तर काहिंना अवसादरोधी औषधांनी गूण येतो पण दोन्हीच्या एकत्रित उपचार सर्वोत्तम आहे.

"ईलेक्ट्रोकॉन्वूल्सिवे थेरपी (इ सी टी) हा एक तिसरा उपचार आहे, जो अशा व्यक्तींना उपयोगी आहे ज्यांना तीव्र आणि जीवन धोक्यात येण्याइतका अवसादाचा विकार आहे , तसेच अवसाद-रोधी औषधे घेऊ शकत नाहीत आणि ज्यांना अवसाद-रोधी औषधांनी गुण येत नाही. "
" बऱ्याचदा लक्षणे नाहीशी झाल्यावर रोगी औषधोपचार खूप लवकर बंद करतात. चिकित्सकांचा सल्ला मिळेपर्यंत औषधे घेणे महत्वाचे असते. काही औषधे हळूहळू बंद केली जाऊ शकतात, तर द्विधृवी किंवा दीर्घकालीन प्रमुख अवसादासाठीचे उपचार आयुष्यभर घ्याव लागतात."

"अवसाद-रोधी औषधांची सवय लागत नसल्यामुळे एखाद्याला त्याची चिंता करायची गरज नसते. तरीही, कोणत्याही दिर्घकालीन निर्धारित औषधांप्रमाणे अवसाद-रोधी औषधे एखादी व्यक्ती योग्य मात्रा घेत आहे का हे काळजीपूर्वक निर्धारित केले पाहिजे. "

"काही लोकांना अवसाद-रोधी औषधांचा सौम्य आणि तात्पुरता दुष्परिणाम उद्भवतो, पण तो गंभीर स्वरूपाचा नसतो. असाधारण आणि गंभीर दुष्परिणाम किंवा जे सामान्य कार्यक्षमतेवर अडथला निर्माण करतात तेयाची डॉक्टरांना माहिती दिली पाहिजे. त्रीच्य्च्ली अवसाद-रोधी औषधाचे सामान्यतः जे दुष्परिणाम होतात ते असे : तोंड कोरडे पडणे, बद्धकोष्ठ , मूत्राशयाच्या समस्या, लैंगिक समस्या, अंधुक दिसणे, चक्कर येणे आणि झापड येणे. नवीन अवसाद-रोधी औषधाचे सामान्यतः जे दुष्परिणाम होतात ते असे : डोकेदुखी, मळमळ, अस्वस्थता, निद्रानाश आणि उद्विग्नता. "

"अवसादावर अनेक प्रकारचे मानसोपचार उपलब्ध आहेत. प्रशिक्षित समुपादेशाकाकडून घेतलेले मानसोपचार अत्यंत उपयोगी असतात. " "तीव्र अवसाद विकार, विशेषतः जे वारंवार उद्भवतात, त्याकरिता उत्तम परिणामांसाठी मानासोप्चारांबरोबर औषधे आणि ए सी टी ची आवश्यकता असते."


अवसादग्रस्त व्यक्तींना साहाय्य करणे
 • अवसादग्रस्त व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्याला/तिला योग्य ते निदान आणि उपचार मिळण्याकरिता साहाय्य करणे आणि मानसिक आधार देणे.
 • अवसादग्रस्त व्यक्तीला फसवा आजार किंवा आळशीपणा करण्याचा दोष देऊ नये अथवा "ह्यातून बाहेर पडण्याची" अपेक्षा करू नये. कालांतराने, योग्य उपचारांनी बहुतांशी अवसादग्रस्त लोक ठीक होतात.हे ध्यानात ठेवा आणि अवसादग्रस्त व्यक्तीला आश्वासन देत राहा कि काही काळाने आणि सहायतेमुळे त्याला/तिला बरे वाटेल.
 • आत्महत्येच्या संभाव्य धोक्याबाबत सजग राहा.
 • "अवसाद ग्रस्त व्यक्तीकडून आनंददायी कृती करण्यास त्यांनी सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्या कृतींमध्ये सहभाग घ्या."

साहाय्य कोठून मिळवावे

कौटुंबिक चिकित्सक
सरकारी किंवा खाजगी रुग्णालयातील मानसिक स्वास्थ्य विशेषज्ञ आणि समुपदेषक सरकारेतर संस्था ज्या मानसिक स्वास्थ्य समुपदेशन आणि मदतसेवा पुरवतात.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.