OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

पडणे आणि अपघात

पडणे आणि दुर्घटना सहजपणे घडून येत नाहीत. बहुंताशवेळा दुर्घटना होण्यासाठी स्थिती वाट पहाते, त्यामुळे दुर्घटना टाळता येऊ शकते. वयस्कपणात पडण्याचे परिणाम गंभीर असतात. यामुळे इजा, हाड मोडणे इ. घटना घडतात. व्यक्तीची सक्रियता आणि स्वांतत्र्य संपुष्टात येते. पडण्यामुळे अनेक स्त्री पुरुष अशक्त होतात, नेहमी कायमस्वरुपात त्यांचे हाड मोडते. एवढेच नाहीतर, केवळ पडण्याची भीती त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करते.

परंतु, आसपासच्या परिसरात बदल करुन आणि सुक्षिततेने कार्य करुन इजा आणि लागणे टाळता येऊ शकते.


वृध्दावस्थेतील पडण्याची कारणे
 • नजर, श्रवण, मांसपेशीची क्षमता, समन्वय आणि प्रतिक्रियेत बदलांमुळे वयस्क व्यक्ती पडण्याची शक्यता वाढते. य सोबत मेंदू, हृदय, हाडे, सांधे, थायरॉइड आणि मधुमेहामुळे संतुलन आणि चालणे प्रभावित होते. आजारासाठीच्या औषधांमुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि पडण्याच्या घटना घडतात.
 • पडण्याच्या बहुतांश घटना शयनकक्ष आणि स्नानगृहात योग्य प्रकाशव्यवस्थेच्या अभावामुळे, सरकणा-या स्पर्शामुळे, जमिनीवर पडलेल्या पुस्तकांमुळे आणि कागदांमुळे आणि आसपासच्या परिसरांतील अडथळ्यांमुळे होतात.

पडणे आणि दुर्घटना यांना टाळणे

पडणे आणि दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी अनेक सर्वसामान्य प्रयत्नांनी याची शक्यता कमी करता येऊ शकते, त्याप्रमाणे आपल्या घराला आणि परिसराला सुरक्षित बनवता येऊ शकते.

 • तुमच्या डॉक्टरांना औषधांच्या दुष्परिणामांबद्दल विचारा आणि त्यांच्यामुळे तुमचा समन्वय आणि संतुलन न बीघडण्याची खात्री करा. त्यांना पडण्याची शक्यता कमी करण्याचे उपाय विचारा.
 • अल्कोहोल संतुलन आणि प्रतिक्रिया प्रभावित करत असल्याने वाहन चालवण्याआधी अल्कोहोलचे सेवन करु नये.
 • जेवण झाल्यावर लगबगीने उठताना, झोपेतुन जागे होताना, खाली बसताना, दिर्घ काळ आराम करतेवेळी काळजी घ्यावी. रक्तदाब जलदगतीने कमी होऊन चक्कर येण्याची शक्यता असते.
 • जर असंतूलित आणि अनोळखी ठीकाणी तुम्हाला भोवळ येत असेल तर, संतुलन टिकवण्यासाठी छडी, वॉकिंग स्टीक किंवा वॉलरचा उपयोग करावा. घराबाहेरच्या ओल्या जागेवरून चालताना विषेश खबरदारी घ्यावी.
 • आधार देणारी, रबरी सोल असलेली कमी उंच पादत्राणे वापरावीत. पाय-या आणि सरकणा-या पृष्ठभागावर गुळगुळीत सोलची पादत्राणे किंवा स्लीपर्स वापरणे टाळावे
 • व्यायामाचा नियमित कार्यक्रम ठेवावा. नियमित शारीरीक कार्यांमुळे मांसपेशीची क्षमता वाढते, त्यामुळे सांधे, टेंडटस, अस्थिबंधाना जास्त लवचिक करीत सभोवताली वावरणे सहज शक्य होते. वजन उचलण्याच्या सौम्य कार्यामुळे हाडांमधल्या ओस्टयोपोरोसिसमुळे होणा-या झीजेला कमी करता येऊ शकते

खालील घटकांना सुरक्षित करुन घराला अधिक सुरक्षित केले जाऊ शकते.
 • जीने आणि कोरेडोअरमधली चांगली प्रकाशव्यवस्था
 • वीजेचे स्वीच, टेलिफोन आणि दैनंदिन उपयोगी वस्तुपर्यंत सहज पोहोचता येणे.
 • जीने आणि स्नानगृहात हॅडरेल किंवा पकडण्यासाठी बार्स असणे.
 • स्नानगृहात पाणी साचल्याने आणि सरकरणा-या फरशीला टाळण्यासाठी योग्य त-हेने डिझाईन केलेल्या फरशा असणे आवश्यक आहे.
 • ये जा करण्याच्या रस्त्यापासुन विजेच्या आणि टेलिफोनच्या तारा दुर लावाव्यात.
 • बिछाना आणि खुर्चीवर बसण्यासाठी किंवा उतरण्यासाठी त्यांची उंची योग्य असणे आवश्यक आहे.
 • बाहेरचा जीना आणि येजा करण्याच्या रस्त्यांची योग्य दुरुस्ती करावी.
 • वयस्क अवस्थेत भाजणे सर्वसामान्य बाब आहे आणि रोग उपचार क्षमता मंद असलेल्या वयोवृध्द व्यक्तींसाठी ते अधिक वेदनादायक ठरु शकते. काही सामान्य उपायांनी भाजण्याच्या जोखमीला कमी केले जाऊ शकते.
 • वयस्क लोकांची वाहनाच्या अपघात हा मृत्युचे सर्वसामान्य कारण आहे.
 • गाडी चालवणा-या व्यक्तींना हे माहित असले पाहिजे की. वयाच्या संदर्भातील बदल उदा. चकाकीच्या बद्दल असलेली संवेदनशीलता, कमी प्रमाणातील समन्वय आणि मंद प्रतिक्रियेमुळे त्यांची वाहन चालवण्याची क्षमता नकारात्मक दृष्ट्या प्रभावित होऊ शकते. या प्रकारच्या नकारात्मक क्षमतांची भरपाई कमी वेगाने वाहन चालवून, कमी प्रमाणात वाहन चालवून,रात्री किंवा गर्दीच्यावेळी गाडी कमी चालवण्यामार्फत कमी केली जाऊ शकते.

सार्वजनिक परिवहन वापरताना
 • सतर्क रहावे आणि बसचा वेग कमी होत असताना किंवा ती वळत असताना स्वत:ला त्यासाठी तयार करावे.
 • वाहनामध्ये चढताना किंवा उतरताना सरकणा-या पृष्ठभागापासुन आणि इतर जोखमींपासुन सतर्क रहा.
 • सुट्ट्या पैशांसाठी खिसे तपासताना तुमचे संतुलन न गमावण्यासाठी भाड्याची रक्कम तयार ठेवा.
 • जास्त पिशव्या घेऊ नये आणि रेलिंगला पकडण्यासाठी एक हात मोकळा ठेवावा.
 • गल्ल्यांना हळू आणि सावधानतेने ओलांडा आणि प्राधिकृत क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडा.
 • रस्ते ओलांडताना, विशेषत: खराब ऋतुत जास्त वेळ घ्या.
 • रात्री हलक्या रंगाचे कपडे घाला आणि आपल्यासोबत फ्लॅश लाईट ठेवा.
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.