OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

पावलांची निगा

वृध्दावस्थेत पायाच्या समस्या एक सर्वसामान्य बाब आहे. ही अनेक वर्षांपासुन घडुन येत असलेल्या वेयर ऍंड टियर, योग्य त-हेने बसत असलेली पादत्राणे, पायांमध्ये रक्ताचे दुर्बळ रक्ताभिसरण, नखे न कापणे आणि इतर रोगांमुळे घडुन येते. तुमच्या पायांची नियमीत तपासणी करुन, त्यांना तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा आरोग्य तज्ञांना दाखवून तुम्ही पायांच्या संबंधीत समस्या कमी करु शकता.

थंड तापमानाला सामोरे जाणे, पादत्राणांमुळे पायावर दाब पडणे, बराच काळ बसुन राहिल्यामुळे किंवा आराम केल्यामुळे, धुम्रपान केल्यामुळे पायांमध्ये रक्त प्रवाह कमी होऊ शकतो. दुसरीकडे पायांवर वर उचलून, उभे राहुन आणि शरीराला ताणुन,चालुन आणि इतर व्यायामप्रकारांनी चांगले रक्ताभिसरण प्रोत्साहित केले जाऊ शकते.

आरामदायक, योग्य प्रकारे बसणारे बुट घातल्यामुळे अनेक आजारांपासुन बचाव होऊ शकतो. बुटाचा वरचा भाग नरम लवचिक सामुग्रीने बनलेला असावा, त्यामुळे बुट पायाचा आकार घेऊ शकतील. चामड्याच्या बुटांमुळे पायांना वायुविजन मिळते, यामुळे त्वचेवर ओरखडे होण्याच्या शक्यता टाळता येतात. सोलमुळे मिळालेल्या मजबूत पकड असणे आणि न घसरणे महत्वाचे असते. कठीण पृष्ठभागांवर जाड सोलमुळे पायांवर कमी दाब पडतो. उंच टाचेचे बुट घालणे टाळावे.

पायांना अंधारात, ओल्या किंवा गरम स्थितीत ठेवल्यामुळे फंगस स्थिती निर्माण होते. अशा संक्रमणांमुळे लालसरपणा, फोड, त्वचा खरचटणे आणि खाज निर्माण होऊ शकते. यच यांचा तत्परतेने उपचार केला नाही तर, संक्रमण जीर्ण आजाराचे स्वरुप घेऊ शकते, ज्याचा इलाज करणे कठिण होते. संक्रमणाला थांबवण्यासाठी पाय, विशेषत: बोटांच्यामध्ये असलेल्या भागाला स्वच्छ आणि कोरडा ठेवा, शक्य असेल तेव्हा पाय उन्हात ठेवा आणि हवेशीर स्थितीत न्या. जर तुम्ही फंगल संक्रमणाने वारंवार ग्रस्त होत असाल , तर दररोज तुमच्या पायांवर फंगल प्रतिबंधक पावडर लावा.

कधीकधी रुक्ष त्वचेमुळे खाज किंवा जळजळ होते. शुष्कपणा दररोज पायांवर लोशन लावल्यामुळे आणि सौम्यसाबण वापरल्यामुळे कमी करता येऊ शकतो. कॉर्न किंवा घट्टे बुटांचे आणि हाडांचे घर्षण झाल्यामुळे होतात आणि ते वेदनादायक असू शकतात. कॉर्नचा इलाज करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. जर कॉर्न किंवा घट्ट्यांना सोलण्यामुळे हानी होऊ शकते.

विषाणुमुळे त्वचेच्या होणा-या वृध्दिला वॉर्ट असे म्हटले जाते. नेहमी हे वेदनादायक असते, यांचा उपचार न केल्यास ते पसरतात. शस्त्रक्रिया किंवा रसायनामुळे त्यांना जाळणे हितावह ठरते.

जेव्हा नखाचा एखादा तुकडा त्वचेला छेदतो, तेव्हा अंगठ्याचे नख त्वचेत रुतते, आणि हे नख योग्यपध्दतीने कापले न गेल्यामुळे होऊ शकते. याला त्वचेला बाजुला करुन कापत येते. आणि संक्रमण होऊ न देता याचा उपचार केला जाऊ शकतो. पायांच्या बोटांच्या नखांना सरळ कापून किंवा बोटाच्या पातळीशी जुळवून त्वचेला छेदुन होणा-या नखाच्या विकासाला थांबवता येऊ शकते.

जास्तवेळ उभे राहणे, योग्य पध्दतीने न बसणारे बुट घालणे आणि गरजेपेक्षा वझन असल्यामुळे पायाचे हाड बाहेर वाढण्याला स्पुर्स म्हटले जाते. स्पुर्सच्या उपचारात पायांसाठी योग्य आधार, हील पॅड, हील कप, औषधे इंजेक्शनचा समावेश असतो, यासाठी कधी कधी शस्त्रक्रिया करावी लागते.

मधुमेहाने पिडित व्यक्तींना नेहमी पायांवर फोड किंवा संक्रमण होते. त्यांना विषेत: जास्त थंड किंवा जास्त गरम पाण्यापासुन दुर राहिले पाहिजे, पायांना इजा किंवा संक्रमणासाठी तपासले पाहिजे, धारधार वस्तु किंवा पृष्ठभागांवर पाय ठेवू नये.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.