OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

उत्तमरित्या ऐकू येणे

व्यक्तीचे वय वाढण्यासोबत त्याच्या श्रवण क्षमतेत घट होते. अंदाजे ६० वर्षांपर्यंत हे निदर्शनास येते. ६० वर्षांच्या वरील व्यक्तींना वय वाढल्यामुळे कमी ऐकु येते. तुमची श्रवण शक्ती तपासण्यासाठी खालील तपासणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


  • तुमचे कुटुंब तुम्ही टिव्ही/रेडियो मोठ्या आवाजात ऐकत असल्याची तक्रार करते का?
  • तुम्हाला लोकांनी मोठ्या आवाजात बोलावे आणि कुजबुज करु नये असे वाटते का?
  • तुम्हाला तुमचे नाव उच्चारण ऐकु येत नाही का? तुम्ही कधी कधी लोकांनी बोललेल्या वाक्याचा चुकिचा अर्थ काढता का?
  • तुम्ही लोकांना त्यांचे म्हणणे परत सांगायला लावत आहात असे वाटते का?
  • तुम्हाला सार्वजनिक समारंभ, पुजा स्थळे या ठिकाणी किंवा पार्श्वभूमीत आवाजामुळे ऐकण्यास अडथळा येतो का?
  • तुम्हाला दारावरची घंटा आणि टेलिफोनचा आवाज ऐकण्यास अडचण येते का?
  • तुम्हाला आधीच्या तुलनेत तुमच्या टिव्ही आणि रेडियोचा आवाज वाढवण्याची गरज भासते का?

जर वरील सर्व प्रश्नांचे उत्तर हो आहे, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे आणि त्यांना तुमच्या ऐकण्यासंबंधीत चिंतेची माहिती द्यावी. आधीपेक्षा आता कमी ऐकु येण्याची अनेक कारणे असू शकतात, डॉक्टर तुमच्या कानाची तपासणी करतील आणि समस्या जाणुन घेण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारतील. उदा. तुमच्या कानात जास्तप्रमाणात मळ साठतो का, ज्याला काढले जाऊ शकते किंवा तुमच्या कानाला संसर्ग झाला आहे का, ज्याचा उपचार केला जाऊ शकतो, परंतु जर डॉक्टर तुमच्या कमी ऐकु येण्याचे ठोस कारण सांगु शकले नाहीत, तेव्हा ते तुम्हाला कान, नाक आणि घसा (ई एन टि) तज्ञांकडे जाण्याचा सल्ला देतात. जर कमी ऐकु येणे वयापरत्वे असेल, तर ते तुम्हाला याचा इलाज नसल्याचे सांगतात,किंवा ते तुम्हाला श्रवण यंत्र देतात. यापैकी कुठल्याही एका विकल्पाचा जरुर प्रयोग करा. तो अतिशय उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.


श्रवण यंत्र

श्रवण यंत्र आवाजाला विस्तारीत करुन त्यांना उंचावण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तुम्हाला किती विस्तारण हवे आहे यावर तुमचा श्रवण -हास कुठल्याप्रकारे आणि किती झाला आहे हे अवलंबून असते.श्रवण यंत्रांनी सगळ्या प्रकारच्या आवाजांना विस्तारीत केले जाऊ शकते, जेव्हा तुम्ही श्रवण -हासाने ग्रस्त होता तेव्हा नेहमी तुम्ही काही वारंवारतांना दुस-यापेक्षा जास्त स्पष्टपणे ऐकु शकता. वयस्क व्यक्तींना नेहमी उच्च वारंवारता ऐकण्यास अडचण येते. नेहमी तुम्ही बोललेले ऐकु शकता, परंतु वास्तविकतेत ऐकु शकत नाही.

सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्रवण यंत्रे उपलब्ध आहेत. श्रवण यंत्र व्यावसायिक तत्वावर देखील उपलब्ध आहेत. अनेक प्रकारची श्रवण यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत, ज्यापैकी एकाची तुम्ही निवड करु शकता, परंतु सर्व श्रवण यंत्रे तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरुपात उपलब्ध नसतात. काही लोकांना कानात लावलेले श्रवणयंत्र जास्त गोपनिय आणि आकर्षक वाटतात, कारण ही यंत्रे कानामध्ये लागुन जातात. जर तुम्हाला गंभीर स्वरुपात कमी ऐकु येत असेल, तर ही यंत्रे तेवढी उपयोगी पडत नाहित शरीरावर लावली जाणारी यंत्रे लहान युनिटच्या स्वरुपात उपलब्ध असतात, ज्यांना छातीवर लावले जाते, ज्याला तार इयरफोन आणि इयरमोल्ड जोडलेला असतो. इतर प्रकारच्या यंत्रांच्या तुलनेत हे जास्त जटिल असते. परंतु त्याचा आकारामुळे त्याला चालवणे सहज असते आणि त्यामुळे विस्तारणाचा उच्च दर उपलब्ध होतो.

श्रवण यंत्राने तुमची श्रवण शक्ती सामान्य होत नाही किंवा तुमचे बहिरेपण ठीक होत नाही. सामान्यत: हे ऐकण्यासाठी उपयोगी पडणारे यंत्र आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा याचा उपयोग करता तेव्हा रोज तुम्हाला आवाज मोठा वाटु शकतो. आवाजाला नव्याने ऐकण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागु शकतो. जर तुम्हाला प्रारंभिक कालावधीत समस्या असेल, तर तुम्हाला हे यंत्र उपलब्ध करुन देणा-या व्यक्तीशी संपर्क केला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला योग्य सल्ला मिळू शकेल.

कदाचित तुम्हाला वाटेल कि तुमचे श्रवण यंत्र काही परिस्थितींमध्ये जास्त सहाय्यक होत आहे. तुम्हाला ते उपयोगात आणण्याची आवश्यकता असेल. हि गोष्ट ध्यानात ठेवावी की, जेव्हा तुम्ही शांत वेळी एकावेळी एक किंवा दोन व्यक्तींशी संपर्क करीत असाल, तेव्हा ते जास्त प्रमाणात उपयोगी ठरेल.पार्श्वभूमीवरील आवाज उदा संगीत आणि इतर लोकांचे बोलणे तुमच्या ऐकण्यात अडथळा निर्माण करु शकते. याशिवाय तुमची श्रवण सहाय्यक उपकरणे, व्यस्त आणि आवाज असणा-या जागांवर उपयोगी सिध्द होतील.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.