OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

उत्तम झोप

जीवनात काही गोष्टी अतिशय आवश्यक असतात उदा रात्रीची झोप.परंतु अनेक वयस्क व्यक्तींमध्ये रात्रीची वेळ दिवसातील सर्वात वाईट वेळ असते.व्यक्तीचे वय वाढण्यासोबत त्याच्या झोपेच्या वेळापत्रकात बदल होतो.झोपेचा कालावधी कमी आणि दर्जामध्ये घट होते.यासोबत मानसिक आणि शारिरीक व्याधीमुळे झोपेत अडचण येऊ शकते.

सर्वासामान्य झोपेच्या चक्रात दोन वेळापत्रके असतात: स्वप्नाळू झोप आणि शांत झोप. प्रत्येक व्यक्ती रोज रात्री या दोन वेळापत्रकांच्या अंदाजे चार ते पाच चक्रातुन जातो.वयस्क व्यक्तींसाठी,झोपेच्या सर्वाधिक गाढपणात घालवला जाणारा वेळ कमी होऊ लागतो. यामुळे असे स्पष्ट होते की,वयस्क व्यक्तींना कमी झोप घेणा-या व्यक्तीम्हणुन संबोधले जाते.

जरी प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या झोपेत भिन्नता असते, तरी देखील दर रात्री अंदाजे सात ते आठ तास झोपेची गरज असते. परंतु वय वाढण्यासोबत सामान्य स्वरुपात येणारी झोप कमी होत जाते.

कुठल्याही टप्प्यामध्ये अनिद्रा झोपेच्या संबंधीत एक सर्वसामान्य तक्रार आहे. अनिद्रेत झोपण्यासाठी जास्त कालावधी लागणे (३० ते ४५ मिनीटांपेक्षा जास्त) आणि रात्रीत अनेक वेळा उठणे आणि झोप मिळण्यास असमर्थ होणे या बाबींचा समावेश होतो. कमी जास्त अपवादांना वगळता, अनिद्रा झोपेच्या समस्येचे लक्षण असते, आणि स्वत: एक समस्या नसते.

जीवनाच्या गुणवत्तेत रात्री चांगली झोप मिळवण्यामुळे बराच प्रभाव पडु शकतो. या सांबंधातील सूचना खालील प्रमाणे आहेत:


  • निर्देशीत वेळेत झोपण्यासाठी आणि उठण्यासाठी नियमीत वेळापत्रकाचा उपयोग करावा.
  • झोपेच्या आधी २ ते ४ तासांच्या मध्यम शारीरीक हालचालींमुळे तुमच्या झोपेत सुधारणा येऊ शकते.
  • तुमचे अंतर्गत घड्याळ सेट करण्यासाठी रोज काही वेळासाठी सकाळी आणि दुपारी नैसर्गिक प्रकाशात जावे.
  • संध्याकाळी आणि रात्री उशीरा कॉफी पिणे टाळा., जर झोपण्यापूर्वी तुम्हाला पेय घेण्यास आवडत असेल, तर गरम दुधाचा ग्लास हितावह ठरु शकतो. अल्कोहोल आणि धुम्रपान केल्यामुळे झोपेत बाधा येऊ शकते.
  • सहजपणे लावता येणारा दिवा आणि टेलिफोन उपयोगी पडु शकतात.
  • शयन कक्ष गडद रंगाचा, हवेशीर आणि शांत असणे गरजेचे आहे.
  • बिछान्यावर पडण्याची सवय लावा. दररोज एकसारखे काम करा, ज्यामुळे आता झोपेची वेळ झाली हे शरीराला समजु शकेल उदा टिव्ही पाहणे, पुस्तक वाचणे आणि उबदार पाण्यात पाय बुडवणे.
  • तुमच्या झोपेची काळजी करु नका. काही लोकांसाठी मानसिक खेळ खेळणे हितावह ठरते.
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.