OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

स्वास्थ्य आणि सुदृढता

तुम्हाला निरोगी आणि फीट राहण्यासाठी स्वयंसिध्द आणि सक्रिय राहण्याची गरज असते. तुमच्या जीवनशैली किंव आहारात तुम्ही कधीही बदल करु शकता, किंवा तुमची शक्ती आणि सामर्थ्यात सुधार करण्यासाठी व्यायाम सुरु करु शकता.

शारीरीक कृती

नियमीत सुरक्षित आणि आनंददारी शारीरीक कृती कुठल्याही वयामध्ये निरोगी जीवनशैलीला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. शारीरीक कृतींचे अनेक फायदे असतात, उदा हृदय आणि फुप्फुसांची कार्यकुशलतेमुळे कार्यान्वय, हाडांची दृढता आणि मांसपेशींमध्ये वाढीव बळ मिळण्याचा समावेश असतो. तुम्हाला अधिक उत्साही वाटेल, याचा अर्थ असा काढता येणार नाही , की आपण ऑलिम्पिकपटू होऊ शकतो. सध्या तुम्ही कुठलाही व्यायाम करीत नसाल, तर हळू हळू तो सुरु करावा , नंतर त्यात तुम्ही वाढ करु शकता, ज्यामुळे तुमचे शरीर अधिक सक्रितेने वळेल आणि मांसपेशींच्या ताणाची शक्यता कमी होईल. नवा खेळ किंवा शारीरीक कृती सुरु करण्यासाठी वयाची अट नसते. जर तुम्ही एखादे औषध घेत असाल, तर कठोर व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फिट राहण्यासाठी विविध उपाय आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडणा-या विकल्पाला निवडा. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे, तुम्हाला दमेपर्यंत चालण्याची आवश्यकता असते. तुम्हाला सक्रिय राहण्याची समस्या असल्यास, तुमच्या गरजेनुसार व्यायाम कार्यक्रमासाठी डॉक्टर किंवा फिजीयोथेरपिस्टचा सल्ला घ्यावा.


वजन कमी करणे

निर्देशित वजनापेक्षा जास्त वजन आरोग्यासाठी जोखीम ठरु शकते. यामुळे व्यायाम करणे कठिण बनु शकते आणि आर्थराईसीस रोग आणखीन गंभीर होऊ शकतो, त्याचप्रमाणे हृदय आणि छातीच्या समस्या मधुमेह, पाठदुखी आणि वेरीकोस वेन्स वाढू शकतात , ज्यामुळे तुमच्या सक्रियतेवर परिणाम होतो. जर तुम्ही वजनामुळे सक्रिय राहु शकत नसाल, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. वजन कमी करायचे असेल, तर गोड आणि चरबीयुक्त अन्नपदार्थांचे सेवन कमी करण्याची गरज असते. विविध प्रकारचा आहार घ्यावा, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले होण्यासाठी तुम्हाला पौष्टिक तत्वे मिळू शकतील. हि गोष्ट ध्यानात ठेवावी कि, आदर्श वजनापेक्षा कमी वजन असणे सुध्दा निरोगी पणाचे लक्षण नाही आहे.


धूम्रपान

धूम्रपान कधीही सोडता येते. तुमच्या वयाची यासाठी अट नसते, एका प्रभावी कृतीमुळे तुम्ही निरोगी आरोग्याकडे वळू शकता. तुम्ही सहजपणे श्वास घेऊ शकता, तुमच्या हृदयाच्या यंत्रणेत सुधार होईल आणि तुम्ही तुमच्या सक्रियतेत अडचण आणणा-या रोगांना टाळू शकता.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.