OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

सुदृढ हाडे

हाडे जीवीत उती असतात, ज्यामध्ये नव्या हाडांच्या निर्मितीसोबत, जुन्या हाडांच्या क्षय होण्याबरोबर जीवनभर सतत बदलत असतात. सक्रिय आणि स्वयंसिध्द राहण्यासाठीहाडांच्या रोगांपासुन वाचणे आणि हाडांना निरोगी ठेवणे गरजेचे असते. अंदाजे ३५ वर्शांपर्यंत हाडांच्या क्षमतेत वाढ होत असते,या कालावधीच्या दरम्यान जुनी हाडे शीघ्र गतीने क्षय पावतात आणि त्यांच्या जागेवर नवीन हाडांची निर्मिती होते. काही पुरुषांमध्ये आणि स्त्रीयांमध्ये नेहमी , हाडांचा क्षय गंभीर विषय असतो. त्यांची हाडे दुर्बळ, नाजुक बनतात आणि त्यांच्या तुटण्याची शक्यता वाढते.या स्थितीला ओस्टोयोपोरोसिस असे म्हणतात.आता आपल्याला या गोष्टीची माहिती आहे, की कशा प्रकारे या रोगामुळे हाडांचे कशा प्रकारे रक्षण करता येते आणि त्यांना सुदृढ ठेवता येऊ शकते.


हाडांच्या तुटण्यापासुन बचाव करणे

६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या चार पैकी एक स्त्रीयांमध्ये आणि आठपैकी एका पुरुषामध्ये ओस्टेयोपोरोसिसमुळे हाड तुटण्याला सामोरे जाण्याची वेळ उदभवते. नितंब, माकडहाड आणि मनगटाचे हाड तुटण्याची सर्वात जास्त शक्यता असते. स्त्रीयांची जोखीम सर्वात जास्त असते कारण,रजोनिवृत्तीच्या दरम्यान आणि त्या नंतर ऑस्ट्रेजोन नावाच्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे त्यांच्यात हाडांची झीज वेगाने होते. या काळात संप्रेरक प्रतिस्थापन थेरपीमुळे हाडांची झीज टाळता येऊ शकते. वेदना होण्यासोबत, हाडे तुटण्याची शक्यता स्वयंपूर्ण जीवनात अडचण आणते आणि सक्रियतेच्या संबंढात दिर्घकालीन अडचणी निर्माण होऊ शकतात. किती भारतीय ऑस्टेयोपोरोसिस ने ग्रस्त आहेत, याची माहिती मिळाली नाही आहे. सामान्य कमी पौष्टिकता स्थिती आणि दोषपूर्ण जीवनशैलीमुळे असे अनुमान लावला जातो कि,हि संख्या जास्त प्रमाणात असू शकते. कुठल्याही वयात हाड मोडण्यापासुन वाचण्यासाठी व्यक्तीमार्फत काही सामान्य उपाय केले गेले पाहिजेत.

जसजसे तुमचे वय वाढत जाते,तशी तुमच्या पडण्याची शक्यता वाढते यासाठी तुम्ही घराची रचना शक्य तेवढी सुरक्षीत बनवणे गरजेचे असते.तुमच्या मार्फत खालील सर्वसामान्य कृती केल्या जाऊ शकतात:

  • सरकण्या आणि पडण्यासाठी कारणीभूत ठरणा-या वस्तुपासुन सावध रहा.
  • दररोज उपयोगात येणा-या वस्तुंना योग्य त्या उंचीवर ठेवा,ज्यामुळे त्यांना उचलण्यासाठी तुम्हाला ताणण्याची किंवा वाकण्याची गरज भासणार नाही.
  • जीन्यामध्ये योग्य प्रकाश व्यवस्था ठेवावी.नियमीत स्वरुपात तुमचे डोळे तपासुन घेतल्यामुळे तुमची नजर चांगली असल्याची खात्री मिळू शकेल.
  • कॅल्शियम आणि ड जीवनसत्वयुक्त जेवण

हाडांना मजबूत आणी वाढत्या वयाप्रमाणे सुदृढ ठेवण्यासाठी योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाचे सेवन करावे. कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाने परिपूर्ण पदार्थांमध्ये दुध दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, बदाम इ. आणि सुखे मेवे यांचा समावेश होतो. ड जीवनसत्व आणि कॅल्शियमचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वयस्क व्यक्ती बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करु शकतात. ५०० मिग्रॅम पुरुषांसाठ आणि १००० मिग्रॅम स्त्रीयांसाठी असे याचे प्रमाण आहे.


निरोगी जीवनशैली
  • व्यायामाने हाड्यांच्या आसपासच्या मांसपेशी दृढ होतात. नियमीत स्वरुपात भराभर चालण्यासोबत फिरण्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात. यामुळे तुमच्या संतुलनात आणि समन्वयात सुधारणा होते आणि तुम्ही पडण्यापासुन वाचता.
  • अल्कोहोल आणि तंबाखु हाडांसाठी हानीकारक असते, त्यांच्यापासुन बचाव करणे आवश्यक आहे.
  • चहा आणि कॉफी कोला पेय पदार्थ आवश्यकतेपेक्षा जास्त प्यायल्यामुळे हाडांसाठी जोखीम निर्माण होते,यापासुन वाचणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला कधी अस्तिभंग झाला असेल किंवा तुम्हाला पाठसुखी असेल,उंची वाढत नसेल किंवा तुमची पाठ वाकलेली राहत असेल,तुमची हाडे भंगुरता युक्त आहेत किंवा तुम्हाला ऑस्टेयोपोरोसिस आहे. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा आणि तुमच्या स्थितीचे मूल्यांकन करुन घ्या आणि वर्तमान स्थितीत उपलब्ध असलेले उपचार सल्ल्याप्रमाणे घेणे सुरु करा.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.