OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

सकस आहार

तुमचे वय कितीही असो, सकस आहाराचे सेवन अतिशय आवश्यक असते. जर तुम्ही चांगल्या प्रकारचा आहार ग्रहण करता, तर तुम्ही स्वत:ला निरोगी समजु लागाल आणि अनेक आजारांपासुन वाचू शकाल. नियमीत आहार ग्रहण आणि चहापान इ. चांगल्या सवयी आहेत. जर तुम्हाला मध्ये मध्ये खायची सवय लागली तर, तुम्ही अबरचबर खाऊ लागता आणि स्वत: थकलेले किंवा उदास वाटणे सुरु होते. तुम्हाला नेहमी सकाळची न्याहरी, मधल्यावेळचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण जेवणे गरजेचे आहे. निरोगी राहण्यासाठी चांगल्या आणि नियमीत आहाराचे वेळापत्रक असणे गरजेचे आहे. निरोगी राहण्यासाठीदर दिवशी तीनदा जेवण आणि एक वेळा संध्याकाळी स्नॅक इ. ग्रहण करणे गरजेचे आहे. न जेवता तुम्ही सामान्य स्नॅक किंवा जेवण सहभागी करु शकता.


उत्तम आहार मार्गदर्शक

हीच योग्य वेळ आहे,तुम्ही काय जेवता याकडे लक्ष द्या,आणि त्यात सुधारणेसाठी काही बदल करण्याची गरज भासते.अशा आहाराशी संबंधीत इथे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे,ज्याला तुम्ही दररोज ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


 • दुध आणि डेअरी पदार्थ: दररोज दिवसातुन तीन वेळा दुध किंवा दुधाची उत्पादने घ्या. यात कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते.
 • मांस, कुक्कुट इ. मासे, पनीर, अण्डी, शेंगा, मसूर, डाळी आणि बदाम इ.: या अन्नपदार्थांमध्ये प्रथिन चांगल्या प्रमाणात असते. रोज यापैकी कुठल्याही दोन पदार्थांचे ग्रहण करा.
 • फळे: रोज एक ताजे फळ खाण्याचा प्रयत्न करा.
 • भाज्या: हा तंतुमय पदार्थांचा प्रमुख स्त्रोत असतो आणि तुम्हाला खाण्यात वेगळे पणा मिळतो. दिवसातुन तीनवेळा योग्य प्रमाणात भाज्या खाण्याकडे लक्ष द्या,.
 • ब्रेड आणि धान्य: प्रत्येक खाण्यात ब्रेड, धान्य, चपाती समाविष्ट करा. तरल पदार्थांच्या सोबत या आहारांना समाविष्ट केल्यामुळे मलावरोध थांबण्यास मदत मिळते. यामुळे आपल्याला ऊर्जा, जीवनसत्वे, आणि खनिजे मिळतात.
 • लोणी आणि जेवण बनवण्यासंबंधीत चरबी: लोणी आणि जेवण बनवण्या संबंधीत चरबी आपल्याला ऊर्जा देतात, आणि आपले जेवण सुध्दा स्वादिष्ट बनवतात, जर तुम्हाला वजनावर लक्ष द्यायचे असेल, तर यांचा वापर कमी केला पाहिजे कारण त्यात कॅलरीचे प्रमाण जास्त असते.थोड्या मात्रेत वनस्पती तेल आणि सुर्यफुलाच्या तेलाचा वापर करावा.
 • बिस्किटे आणि मिठाया: ह्या प्रकारचे खाद्यपदार्थ चटपटीत लागतात, परंतु यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते आणि ते महाग देखील असतात.
 • पेये: चहा, कॉफी, फळांचा रस, दुध आणि पाणी दररोज सहा ते आठ ग्लास प्यावे.
 • ज्या प्रकारे मांसाहार चांगला असतो, त्याचप्रमाणे शाकाहारी पदार्थ देखील चांगले असतात.
 • जर तुमचे वजन कुठलेही कारण नसताना कमी होत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
 • तुमचे वय वाढत जाते, तशी तुम्हाला जेवण पाहुन भुक न लागण्याची शक्यता असू शकते.
 • एकत्र जेवण जेवल्यामुळे जेवण रुचकर लागू शकते.
अन्नपदार्थांचे चार नियम
 • सर्व अन्नपदार्थांपैकी थोडे सेवन करावे आणि एकच गोष्ट अतिप्रमाणात खाऊ नये.
 • तुम्ही एकाच प्रकारचे अन्न खाऊ शकत नाही. जर तुम्हाला एखादा पदार्थ आवडत नसेल तर तेवढ्याच प्रमाणात पोषक असणा-या दुस-या पदार्थाचा विकल्प निवडावा.
 • काही अन्नपदार्थ इतरांपेक्षा चांगले असतात. तुमच्या पैशाचे अतिशय कमी मोल देणारा (कमी पोषण) पदार्थ टाळावा.
 • जरी तुम्हाला तहान लागली नसेल तरीही दिवसातुन सहा ते आठ ग्लास तरल पदार्थांचे सेवन करा.

जर तुम्ही या चार नियमांचे पालन केले आणि वरदिलेले अन्न मार्गदर्शन अनुसरले,तर शाकाहार मांसाहाराच्या तुलनेत जास्त हितावह सिध्द होतो. जर तुमची भूक मंद असेल आणि तुमचे वजन हळू हळू कमी होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असते. तुम्ही मोठ्याप्रमाणात तरल पदार्थांचे सेवन करत असे पर्यंत कधी कधी अन्न न खाल्ल्यामुळे हानी होत नाही . तुमचे वय जस जसे वाढत जाते त्याप्रमाणे अन्नाचा स्वाद कमी होत जातो. सहभोजन केल्यामुळे तुमची अन्नातील रुची वाढ शकते. .

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.