OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

इंफ्लूएंजा

ज्याप्रकारे लहानमुलांना रोगांपासुन बचाव करण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता असते,त्याच प्रकारे वयस्क व्यक्तींसाठी देखील ते आवश्यक असते.इन्फ्युएंझा,न्यूमोकोक्कल न्यूमिनिया आणि टेटनस हे रोग वयस्क स्थितीत विशेष स्वरुपात शक्यता असते.


इंफ्लूएंजा

इंफ्लूएंजा किंवा फ्ल्यु अतिशय गंभीर संसर्गाने होणारा रोग आहे,जो इंफ्लूएंजा नावाच्या जीवाणुमुळे पसरतो,यामुळे ताप,अंगदुखी,गळ्याला सुज येऊ शकते आणि यामुळे गंभीर स्वरुपाच्या जटिलता निर्माण होतात, उदा. न्युमोनीया,निर्जलीकरण आणि फ्यु नंतर वजनात घट येऊ शकते.

दरवर्षी फ्ल्यु अनेक जीवाणुंमुळे फैलावतो.म्हणुनच दरवर्षी थंडीच्या सुरुवातीपासुन लस टोचली जाणे गरजेचे आहे. फ्ल्युच्या लसीमुळे काही दिवसांपर्यंत हलकासा ताप, वेदना यासारखे दुष्परिणाम थेडे दिवस आढळतात.

इंफ्लूएंजाची लस महाग आहे, त्यामुळे संक्रमणाची उच्च जोखीम असलेल्या आणि या परिणामस्वरुप गुंतागुंतीच्या समस्यांच्या श्रेणीमध्ये येणा-या वयस्क व्यक्तींना लस टोचण्याची आवश्यकता भासते. यामध्ये हृदयरोग, यकृताचे आजार, वृक्काचे आजार, मधुमेह आणि दिर्घकालीन ब्रॉंकायटिस असलेल्या लोकांचा समावेश होतो.


न्योमोकोक्कल न्यूमीनिया

न्युमोनिया नेहमी न्योमोकोक्कल नावाच्या जीवाणुमुळे होतो. वयस्क व्यक्तींमध्ये तरुणांच्या तुलनेत हा रोग होण्याची शक्यता २पटीपेक्षा जास्त असते.वयस्क व्यक्तींमधला न्युमोनिया गंभीर स्वरुपाचा असू शकतो ज्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या स्थिती निर्माण होतात. एक्ल प्रतिरोधक लसीमुळे ९०% पर्यंत सुरक्षा मिळते. या लसीचे दुष्परिणाम इन्फ्ल्युएंजाच्या लसी प्रमाणे असतात.


टेटनस

विश्व संरक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत मुलांना टेटनसची लस दिली जाते.निरंतर सुरक्षा कवच देण्यासाठी या लशीला दर १० वर्षांनी देणे गरजेचे असते.वृध्द व्यक्तींमध्ये दुर्घटना आणि इजा होणे सामान्य बाब असते, त्यांना लहानपणी कदाचित लस दिली नसल्याची देखील शक्यता असते. या लशीचे कुठलेही दुष्परिणाम नसतात, हिला दर १० वर्षांनी देण्याची गरज भासते.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.