OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences
l

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

इस्चेमिक हृदय विकार

शरीरातील विविध अवयवांकडे रक्ताचे सतत पंपन करणारा हृदय हा एकप्रकारचा पंप आहे. हा पंप स्नायुंचा बनलेला असतो, ज्याच्या उत्तमरितीने काम करण्यासाठी सातत्यपूर्ण रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. हृदयातील रक्ताच्या प्रभावी अभिसरणाच्या अभावामुळे निर्माण होणा-या हृदय रोगाला इश्चेमिक हार्ट डिसीज (आय एच डी) असे म्हणतात. वयस्कपणातील मृत्युच्या सर्वसामान्य कारणांपैकी आत एच डी एक कारण सिध्द होते.

आय एच डीच्या काही स्वरुपांमध्ये: सौम्य स्वरुपाचा आजारापासुन अकाली मृत्युचा समावेश होतो. परंतु, सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणा-या आय एच डीच्या स्वरुपात एन्जाईना (शारीरीक कृतीशी संबधीत छातीतील वेदना) आणि ऍक्युट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन (हार्ट अटॅक) आढळून येतात. हार्ट अटॅक हृदयाला रक्त पुरवठा करणा-या धमन्यांमधला रक्त पुरवठा अचाकन बंद झाल्यामुळे येतो. याचा परिणाम म्हणुन हृदयाच्या स्नायुंचे भाग मृतवत होतात किंवा कायम स्वरुपी निकामी होतात. एन्जाईना हार्ट अटॅकचे सौम्य आणि पुनरावर्तित होणारे स्वरुप आहे. इश्चेमिक हार्ट डिसीज रक्त वाहिन्यांच्या अरुंद होण्याच्या क्रियेचा (अथेरोसेक्लेरोसिस)परिणाम असतो, या आजारात भित्तिकांच्या आतल्या बाजुला कोलेस्ट्रॉल (रक्तातील चरबी) साठते. या अथेरोसेक्लेरोसि प्रक्रियेमुळे मेंदुच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन स्ट्रोक होण्याची आणि अवयवांकडे जाणा-या वाहिन्यांवर परिणाम होऊन गॅंगरीन होण्याची शक्यता असते.

काही धोकादायक कारणांमुळे आय एच डी उदभवतो. यांना चार स्थायी स्वरुपाच्या घटकांमध्ये विभागले गेले आहे उदा. लिंग (पुरुष), वय (वयस्कपणा), जाती (काळे, दक्षिण आशियाई) आणि कौटुंबिक इतिहास आणि बदलता येणारे घटक उदा. धूम्रपान, उच्च कोलेस्ट्रोल पातळी आणि उच्च रक्त दाब.


एन्जाईना

एन्जाईना काही क्षणांपुरते आढळून येणारे लक्षण आहे. कदाचित तुम्हाला छातीमध्ये जडपणासारखे, श्वास थांबल्यासारखे वाटु शकते, दाब, छाती पिळून निघणे किंवा जळजळणे, हात, मान किंवा पाठीपर्यंत पसरणारी अस्वस्थता, आणि खांदे , बाहु किंवा मनगटे संवेदनारहित झाल्याची जाणीव होऊ शकते.

साधारणत: तुम्ही जीने चढत असताना, जड वस्तु उचलताना, रागावलेले किंवा उदास असताना, उष्ण किंवा थंड वातावरणात काम करीत असताना, संभोग केल्यावर, भावनिक ताणाच्या स्थितीत, व्यायाम केल्यावर किंवा यापैकी कुठल्याही घटकांच्या संमिश्रणाच्या स्थितीत एन्जाईना निर्माण होऊ शकतो. तुम्ही कृती थांबवल्यावर किंवा तुमच्या जीभेखाली नायट्रोग्लेसेरीन (सोर्बिट्रेट)ची गोळी ठेवल्यावर हि स्थिती निर्माण होते. एन्जाईनाचे निदान नेहमी वैद्यकिय स्वरुपाचे असते. परंतु तुम्हाला खा्त्रीसाठी खालील चाचण्या करुन घेणे आवश्यक असते:


  • रक्त तपासणी (कोलेस्ट्रॉल)इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ई सी जी)व्यायाम ई सी जी (ट्रेडमील तपासणी)
  • पुनरावर्तित इश्चेमाचे प्रदर्शन करण्यासाठी स्ट्रेस थॅलियम चाचणी
  • धमनी बंद झाल्याचे दर्शवून देणारे कार्डिऍक कॅथेटेरायझेशन

तुमचे डॉक्टर तुम्हाला नायट्रोग्लेसरीनची गोळी देऊ शकतात, एक असे असे औषध , जेव्हा तुम्ही ते जीभेखाली ठेवता तेव्हा तुम्हाला आराम मिळतो. काही लोक नायट्रोग्लेसरीन गोळी घेतल्यावर डोकेदुखीची तक्रार करतात.

सल्ला घेताना डॉक्टरांना एन्जाईना उदभवल्याच्या स्थितीत नक्की काय करावे आणि तुमच्या नायट्रोग्लीसरीन गोळीला योग्य प्रकारे कसे वापरावे याची माहिती विचारा. जर तुम्हाला एन्जाईना उदभवल्यास तुम्हाला तुमच्या जीवनशैलीवर लक्ष देणे आणि सुधारणात्मक पावले उचलणे गरजेचे असते. त्याला इश्चेमिक हृदय रोगात परिवर्तीत करण्यात काहीच अर्थ नसतो. तुम्ही त्याचा सामना करु शकता. त्यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात.


  • धूम्रपान थांबविणे.सकस आहार घेणे. उच्च रक्तदाब आणि रक्तातील कॉलेस्ट्रॉल पातळीवर नियंत्रण मिळवणे.
  • शांत राहण्यास आणि ताणाचे व्यवस्थापन करण्यास शिकणे ताण देणा-या कृतींना टाळणे.
  • तुमच्या एन्जाईनात बदल झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, उदा तुम्हाला आराम करताना ऍन्जेईना उदभवल्यास किंवा तो गंभीर स्वरुपाचा झाल्यास.

हार्ट अटॅक

हार्ट अटॅकचे नेहमी आढळून येणारे लक्षण म्हणजे छातीतील वेदना होय. हे नेहमी एन्जाईना सारखे असते, परंतु त्याची तीव्रता तुलनेने जास्त असते. काही लोकांना एन्जाईना च्या अनुपस्थितीत हार्ट अटॅक येतो. त्यांना आधी कधीच न अनुभवलेल्या छातीतील वेदना प्रत्यय येतो. वयस्क लोकांमध्ये आणि मधुमेह असणा-यांमध्ये छातीतील वेदना आढळून येत नाही. सामान्यत: ईसीजी काढुन हार्ट अटॅकचे निदान केले जाते.

सध्याच्या काळात हार्ट अटॅक आता असाध्य स्वरुपाचा राहिलेला नाही. अरुंद रक्त वाहिन्या उघडू शकणा-या औषधांचा विकास झाला आहे. पुढे, हार्ट अटॅक येऊन गेल्यावर तुम्हाला तुमच्या हृदय वाहिन्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी शस्त्रक्रियात्मक आणि शस्त्रक्रियात्मक नसलेल्या पध्दतींचा अवलंब करावा लागतो. हि चांगली गोष्ट आहे की, वाईट गोष्ट संपलेली आहे आणि लवकरच तुम्ही आधीसारखी बहुतांश कामे करु शकत आहात!

तुमच्या जीवनशैलीत आता योग्य सुधार करण्याची वेळ आलेली आहे. तुमचे हृदय योग्य त्या आकारात परत आणण्यासाठी तुम्ही योग्य त्या कृती न केल्यास हृदय रोग गंभीर स्वरुप धारण करतो. फार काळजी घेण्यासारखे आता हार्ट अटॅकबद्दल तसे विशेष काही राहिलेले नाही आहे. चांगले होण्यासाठी आणि स्वत:बद्दल चांगला विचार करण्यासाठी वेळ लागु शकतो. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना पाळणे आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास शिकणे हितावह ठरु शकते. तुम्हाला अजुन बरीच सक्रिय वर्षे आस्वाद घेण्यासाठी शिल्लक आहेत. बहुतांश लोक त्यांना हार्ट अटॅक येऊन गेल्यावर वाईट वाटल्याचे सआंगतात. या भावान सामान्य आणि समजुन घेण्याजोग्या असतात.


  • तुम्हाला कदाचित मरणाची, छातीत वेदना होण्याची , संभोग न उपभोगु शकण्याची आणि तुम्ही काम करु शकण्याची भीती वाटु शकते.
  • तुम्ही हा प्रकार तुमच्या बाबतीत घडल्यामुळे उदवीग्न होऊ शकता.
  • तुम्हाला कदाचित नैराश्याची , आयुष्य संपल्याची भावना येऊ शकते, तुम्ही कदाचित परत पहिल्यासारखे राहु शकत नाही आणि इतरांना तुम्ही अशक्त झाल्याची भवना होऊ शकते.
  • केवळ तुम्हीच नव्हे, तर तुमच्या आसपासचे लोक देखील हार्ट अटॅकचा अनुभव घेतात.

कामावर परतणे

बहुतांश लोक १ ते ३ महिन्यांमध्ये कामावर परततात. तुमचे डॉक्टर तुम्हाला आधी प्रमाणे काम करु शकण्याच्या क्षमतेला माहित करुन घेण्यासाठी तपासणीचा सल्ला देऊ शकतात. काही लोक त्यांच्या ह्रुदयाला सहज होतील अशी कामे करु लागतात.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.