OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

औषधांचे व्यवस्थापन

औषधे जीवनाचा एक भाग आहेत.तरुणपणात याची गरज कमी प्रमाणात लागते.परंतु वाढत्या वयासोबत औषधांची गरज नेहमी एका पेक्षा जास्त औषधाप्रमाणे वाढते.अनेक कारणांमुळे लोकांना आपल्या मागील वयापेक्षा औषधांची जास्त आवश्यकता भासु शकते.कदाचित औषधांची मात्रा आपल्यासाठी लहान असते कारण आपले यकृत आणि वृक्के औषधाला काढण्यासाठी कमी कार्यशील असतात, त्यामुळे ती आपल्या शरीरात जास्त काळ सक्रिय राहतात.हि सहज प्रवृत्ती आहे, तुम्हाला या गोष्टिकडे विशेष लक्ष दिले पाहिजे की.दिलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रेत औषधे घेऊ नये.या अध्यायात औषधांच्या प्रबंधनासाठी मार्गदर्शन देण्यात आले आहे.


औषधाचे नाव

बहुतांश औषधांची दोन नावे असतात. ब्रॅंड नाव किंवा व्यापारिक नाव जे औषधाच्या निर्मात्यांच्या मार्फत दिलेले असते आणि शास्त्रीय नाव यामध्ये असलेल्या घटकांसाठी दिलेले असते. तुम्ही कुठल्या ब्रॅंडचे औषध वापरता हे महत्वाचे नसते, परंतु ब्रॅंडला न बदलणे हितावह असते. जेव्हा तुम्ही औषध विकत घेता, तेव्हा त्याच्या शास्त्रीय नावाची खात्री करुन घ्यावी, त्यामुळे तुम्ही आधीपासुन घेत असलेल्या घटकांना टाळू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लिहिलेल्या औषधांना (ओवर दि काऊंटर औषधे किंवा ओटिसी) खरेदी करते वेळी , ती तुम्हाला लिहुन दिलेल्या औषधाशी मेळ खाते का हे पहाण्याचा सल्ला दिला जातो.


दुष्परिणाम कमी करणे

दुष्परिणाम होत नाहीत असे कुठलेही औषध नसते, त्यांचे असणे आवश्यक नसते काही सावधनता बाळगुन या परिणामांपासुन बचाव करता येतो.

  • तुम्हाला दुष्परिणाम म्हणुन संबोधल्या जाणा-या लक्षणांचा अनुभव असेल, तर नेहमी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करणे इष्ट असते.
  • जिथपर्यंत सांगितले न गेल्यास, औषधे जेवणासोबत घेतल्यास, पोट बिघडण्यापासुन वाचता येते. पोटाची थोड्याप्रमाणातील असुविधा किंवा हलकिशी मळमळ , वारंवार शौचास जाण्यासाठी प्रतिजैविक औषध घेतल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.
  • आहारात बदल करुन किंवा तो घेण्याच्या प्रकाराला बदलून काही दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

सुरक्षित संग्रह

आपल्या औषधांना इतर औषधांच्या सोबत ठेवू नये. लहानमुले घरात नेहमी नसण्याच्या स्थितीत, त्यांना मुलांच्या पोहचण्यापासुन दुर ठेवावे. औषधे जास्त काळ उपयोगात आणण्यासाठी त्यांना थंड आणि कोरड्या जागेत ठेवावे.


उपयोग असलेल्या काळाच्या आत उपयोग

अन्नपदार्थांप्रमाणे सर्व औषधांचा निर्देशित कालावधी असतो. म्हणुन थोड्याप्रमाणात घेणे हितावह असते आणि त्यांच्या उपयोग करण्याच्या कालावधी संपल्यावर उपयोग न करण्याची खात्री घ्यावी.एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी गोळ्या किंवा कॅप्सूल ठेवू नये. द्रवपदार्थ केवळ सहा महिन्यांपर्यंत ठेवावेत.

आऊट ऑफ डेट असलेल्या औषधांना, त्यांची आवश्यकता नसल्यास उपयोग करणे टाळावे. त्यांना परत उपयोगी पडण्यासाठी ठेवून देऊ नये.


औषधे लक्षात ठेवणे

औषधे लक्षात ठेवणे अतिशय कठिण असते. तुमची औषधे घेण्याची वेळ अशाप्रकारे निर्देशित करावी, जी तुमच्यासाठी सर्वात अनुकुल असेल. जेवणाची वेळ सर्वात उत्तम वेळ असते, कारण तुमच्या जवळ औषध घेण्यासाठी पाणी असते. लेबलावर दिल्याप्रमाणे उपाशीपोटी औषध घ्यायचे असल्यास, तुम्ही ते औषध जेवणाआधी कमीत कमी एक तास आधी घेण्याचा प्रयत्न करावा. हे मुख्यत्वे प्रतिजैविकांसाठी लागु होते.


ड्रॉप्स, क्रीम आणि इन्हेलर्स

ज्याप्रकारे गोळ्या आणि कॅप्सूलसाठी खबरदारी घेणे आवश्यक असते, त्याचप्रकारे डोळे, कान आणि नाकाच्या ड्रॉप्ससाठी देखील सावधानता बाळगणे आवश्यक आहे कारण त्यामुळे दुष्परिणाम उदभवू शकतात. इतर कुठल्याही औषधांच्या सोबत तुमचे ड्रॉप्स ठेवू नये. डोळ्यांच्या कुठल्याही ड्रॉप्सच्या कंटेनरला वारंवार उघडल्यानंतर, त्याचा एका महिन्याच्या आत उपयोग केला पाहिजे. डोळ्यांमध्ये ड्रॉप्स टाकते वेळी डोळ्यांना स्पर्श करु नये. क्रीम किंवा मलमासारख्या औषधांची देखील काळजी घ्यावी. क्रिम किंवा मलम लावण्याआधी हात धुवावेत.

श्वास घेण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टिने फेसाच्या स्वरुपातऔषध फुप्फुसांमध्ये जाण्यासाठी इन्हेलर्स औषधाच्या नवीन डिलेवरीचे तंत्र आहे. परंतु पफर दाबणे आणि योग्यवेळी श्वास घेणे दरवेळेस सोपे नसते. अनेक व्यक्ती कधीच औषधाची योग्य मात्रा घेऊ शकत नाहीत. वैकल्पिक स्वरुपात, तुम्ही इन्हेलर सोबत स्प्रेअरचा उपयोग करु शकता ज्याला चालवणे अतिशय सोपे असते. जर तुम्हाला तुमच्या इन्हेलरमध्ये अडचण येत असल्यास डॉक्टरांकडुन याचा योग्य प्रकारे उपयोग शिकुन घ्या.


प्रिस्क्रिप्शन पुनरावृत्ती

जर तुम्ही नियमीत स्वरुपात औषध घेत असाल, तर डॉक्टरांची भेट न घेता देखील तुम्ही ते पुनरावृत्त करु शकता. परंतु तुम्ही डॉक्टरांची भेट घेण्याचा कालावधी सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. कदाचित एखाद्या औषधाची आता गरज नसावी किंवा तुम्हाला मात्रेत बदल करण्याची गरज भासु शकते. दुष्प्रभावांच्या जोखमीला कमी करण्यासाठी नियमीत तपासणी करुन घ्या, हे केल्यामुळे तुम्ही औषध अनावश्यक रित्या घेत नसल्याची खात्री पटते.तुम्हाला दुष्परिणामाची भावना असल्यास,परंतु त्याची तीव्रता कितीही कमी असलीतरी, त्याबद्दलची माहिती डॉक्टरांना द्यावी. डॉक्टरांना अशा गोष्टी न सांगणे एक सर्वसामान्य बाब आहे, त्यामुळे डॉक्टरांना सल्ला घेण्यास जाण्याआधी तुम्ही विचारायचे प्रश्न तयार करुन ठेवावेत.


कारायच्या आणि न करण्याच्या कृती
  • खाण्यासोबत किंवा त्या नंतर औषध घ्यावे (जर तसे सांगितले गेले नसेल तर) परत घेण्यापासुन बचाव करण्यासाठी औषधात असलेल्या घटकांना तपासा.
  • परत घेण्यासाठी केलेल्या सूचनांनुसार त्याच ब्रॅंडचे औष घ्या.
  • अनावश्यक स्वरुपात औषधाचे सेवन करण्यापासुन वाचण्यासाठी डॉक्टरांची भेट घ्या.
  • औषध घेण्याच्या पध्दतीच्या मार्गदर्शकांना समजावून घेण्यास विसरु नका.
  • औषधाच्या बाटलीवर दिलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रेचे सेवन करु नये.
  • कुठल्याही व्यक्तीसोबत तुमचे औषध वाटू नका अनावश्यक औषधांचा संग्रह करु नका.
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.