OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

पोषक स्थितीचे परिक्षण करणा-या पध्दती

कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत स्थितीविषयी माहिती मिळवून घेण्यासाठी एन्थ्रोपोमेट्री एक सामान्य, नॉन इन्वेसिव, तीव्र आणि विश्वासार्ह प्रक्रिया आहे.


वजन

वयस्क लोकांसाठी सरळ बीम स्केल उपयोगात आणला जाऊ शकतो. अशा व्यक्ती ज्या केवळ बसु शकतात, त्यांच्यासाठी चलनशील व्हिलचेयर संतुलन बीम स्केलचा उपयोग केला जाऊ शकतो. शरीराच्या आदर्श वजनाहुन २०% कमी वजन शरीराच्या एकुण प्रथिनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरतेला दर्शवतो आणि त्यांच्या साठी तत्पर कारवाई आणि तपासणीची आवश्यकता भासते.


उंची

हालचाल करु शकणा-या वृध्द व्यक्तींची त्यांच्या उभ्या स्थितीत न वाकता उंची मोजली पाहिजे. जेव्हा सरळ अवस्थेमध्ये उंची मोजणे शक्य नसेल तेव्हा, उंचीचे अनुमान लावण्यासाठी झोपलेल्या अवस्थेमध्ये गुडघ्याच्या लांबीला (घुडघ्याच्या उंचीला मोजण्यासाठी कॅलीपरचा उपयोग करुन) मोजता येते. उंचीच्या खाली दिलेल्या सुत्राचा उपयोग करुन मापन केले जाऊ शकते

पुरुषांची उंची= (२.०२* गुडघ्याची उंची)-(०.०४* वय)+ ६४.१९
स्त्रीयांची उंची= (१.८३* गुडघ्याची उंची)-(०.२४* वय)+ ८४.८८

या समीकरणांमध्ये गुडघ्याची उंची सेंटिमीटरमध्ये आहे, आणि वयाला जवळचे संपूर्ण वर्ष मानले जाते.


एन्थ्रोपोमैट्रिक सूचकांक

संपूर्ण शरीराच्या फॅटचे अनुमान लावण्यासाठी बी एम आयला विस्तृतपणे उपयोगात आणले जाते. खालील सुत्राने बी एम आयचा अनुमान लावला जाऊ शकतो.

बीएमआई = वजन (किलोग्राम)/ उंची (एम2)


बी एम आय प्रमाणे निरोगी वजनापेक्षा किमान वजन , जास्त वजन आणि स्थुल वयस्कांचे आंतरराष्ट्रिय वर्गिकरण

वर्गिकरण BMI(kg/m)
  Principal cut-off points Additional cut-off points
वजन कमी असणे <18.50 <18.50
अति कमी वजन <16.00 16.00
मध्यम सडपातळपणा 16.00 - 16.99 16.00 - 16.99
सौम्य सडपातळपणा 17.00 - 18.49 17.00 - 18.49
सर्वसामान्य श्रेणी 18.50 - 24.99 18.50 - 22.99
अति स्थुलत्व ≥25.00 ≥25.00
स्थुलत्वा आधी 25.00 - 29.99 25.00 - 27.49
27.50 - 29.99
स्थुलता ≥30.00 ≥30.00
स्थुलता वर्ग १ 30.00 - 34-99 30.00 - 32.49
32.50 - 34.99
स्थुलत्व वर्ग २ 35.00 - 39.99 35.00 - 37.49
37.50 - 39.99
स्थुलत्व वर्ग ३ ≥40.00 ≥40.00

स्त्रोत: डब्ल्यु एच ओ , १९९५, डब्ल्यु एच ओ २००० आणि डब्ल्यु एच ओ २००४ पासुन घेतलेली माहिती

बी एम आय मूल्य वयावर अवलंबून असते आणि स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एकसारखे असते. उंची आणि वजन यामध्ये १% पेक्षा कमी विचलन गुणांक असतो, आणि वयोवृध्दांमध्ये याला काईफोसीस मार्फत परिवर्तीत केले जाऊ शकते आणि बी एम आई व्याख्येला अमान्य बनवता येते.
कुठल्याही वयस्क व्यक्तीच्या शरीराच्या वस्तुमानाचा इंडेक्स (बी एम आय) त्यांच्या वयाच्या कार्यानुसात परावर्तीत होत असतो. विशेषत: पुरुषांमध्ये त्यांच्या वयाच्या वाढण्यासोबत बी एम आय मध्ये घट होते. बी एम आय मध्ये होणा-या कमतरतेचा संबंध कालमानापरत्वे लीन बॉडी मास मध्ये होणा-या कमी सोबत होऊ शकतो, लीन बॉडी मास पुरुषांमध्ये आयुष्यभर स्त्रीयांच्या तुलनेत अधिक असते.


लघु पोषणात्मक मूल्यांकन (एम एन ए)
वयस्क लोकांसाठी तयार केलेली पौष्टिकते संबंधीत स्थितीसाठी विशेष मूल्यांकन उपकरणे

एम एन ए ला सामान्य व्यवहारात आणि नर्सिंग होम किंवा हॉस्पिटलनध्ये भरती झाल्यावर वयस्क व्यक्तींमधल्या कुपोषणाच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी विकसीत केले गेले आहे. त्यामध्ये सामान्य आरोग्य मूल्यांकन, आहार विषयक मूल्यांकन, एन्थोपोमेट्रिक मूल्यांकन, रोग्यांचे व्यक्तीगणिक मूल्यांकन आणि वैश्विक मूल्यांकन केले जाते. वैश्विक मूल्यांकनात स्वतंत्र जीवनपध्दती विषयी प्रश्न, निर्देशित केलेल्या औषधाचा प्रयोग, मनोवैज्ञानिक तणाव, दुर्धर आजार, सचलता, मनोभ्रंश आणि त्वचेच्या संबंधीत स्थितींचा समावेश असतो. एम एन ए वयस्क व्यक्तींमध्ये कुपोषणाची माहिती मिळवण्यासाठी अतिशय सरळ, नॉन इन्वेसिव्ह, प्रचालनात सरळ, रोगी उत्मुख, कमी खर्चीक, अतिशय संवेदनशील, अत्याधीक विशीष्ठ, विश्वसनीय आणि मान्यकृत स्क्रिनींग उपकरण आहे. विकासात्मक अभ्यासाच्या अनुसार, पौष्टिकता क्षेत्रात दोन विशेषतज्ञांच्या मार्फत केलेल्या निदानात्मक मूल्यांकनाच्या तुलनेमध्ये ९२% सटिकता प्राप्त करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे जैव रासायनिक परिक्षण, एन्थ्रोपोमॅट्रिक मापन आणि आहाराच्या विषयक मूल्यांकनाला समाविष्ट करुन व्यापक पौष्टिकता मूल्यांकना सोबत केलेल्या तुलनेमध्ये ९८% सटिकता आढळली आहे.


पौष्टिकतेशी संबंधीत स्क्रिनींगचा अग्रक्रम

एन एस आय अमेरिकन डायटैटिक असोसिएशन, सि अमेरिकन अकॅडमी ऑफ फॅमिली फिजीशीअन्स, आणि द नॅशनल काऊंसिल ऑन एजिंग चा एक बहुउद्देशिय प्रयत्न आहे, ज्याचा उद्देश आरोग्य आणि चिकित्सा देखरेख व्यवस्थांमध्ये दैनंदिन पौष्टिकते संबंधी स्क्रिनींगला बढावा देणे असा आहे, ज्यामुळे कुपोषणाच्या जोखमीच्या बद्दल जागरुकता वाढविण्यास मदत मिळू शकते. या अग्रक्रमाच्या अंतर्गत तीन स्तरांवर स्क्रिनींग आणि मूल्यांकन केले जाते.पहिली तपासणी सूची स्वत: भरण्यासाठी तयार केली गेली आहे. (परंतु देखभाल कर्त्यांमार्फत देखील हिला भरले जाऊ शकते.)यामध्ये हो/नाहीच्या स्वरुपात उत्तर दिले जाणारे आणि अंकांना मिळवण्यासारखे १० प्रश्न आहेत (ज्यांना त्यांच्या महत्वाप्रमाणे) ज्यात पौष्टिकतेशी संबंधीत सतर्कता लक्षणे वर्णन करण्यात आली आहेत. या प्रश्नांच्या मध्ये आहाराशी निगडित मूल्यांकन (खाण्याची संख्या, आहार आणि अल्कोहोल ग्रहण, अन्न तयार करण्याच्या संबंधीत ऍनाटोमी), सामान्य ,मूल्यांकन (चिकित्सा स्थीती, औषधे, तोंडाचे आरोग्य, वजनातील घट) आणि सामाजिक मूल्यांकन (आर्थिक अडचण, कधी होणारा सामाजिक संपर्क) संबंधीत प्रश्न दिलेले आहेत. तपासणी सूचीची वैधता तपासणी पूर्ववर्ती आणि अग्रवर्ती अभ्यासांच्या आंतर्गत घेण्यात आली आहे. अधिक गुण मिळवणा-या व्यक्तींमध्ये कमी पौष्टिकता स्तर आढळण्याची शक्यता होती आणि त्यांच्यात रुग्णतेची जोखीम अधिक प्रमाणात होती. एन एस आय परिक्षण सूची संक्षिप्त , सहजपणे गुण मिळवण्याजोगे स्क्रिनींग उपकरण आहे, ज्याच्या मार्फत पौष्टिकता ग्रहण करणारे सामुदायिक वयस्क व्यक्तींची आणि आरोग्याच्या संबंधीत समस्या असणा-या व्यक्तींना ओळखता येऊ शकते.


नुरास

अमेरिकन एन एस आयच्या प्रमाणे, नुरासचा विकास विधीमान्यकरण जर्मनीच्या तपासकांच्या मार्फत करण्यात आले, ज्याचा उद्देश्य हॉस्पिटलमध्ये भरती वयस्क व्यक्तींच्या पौष्टिकता संबंधीत समस्यांच्या संबंधात चिकित्सकांची जागरुकता वाढवणे असा होता.हे मूल्यांकन स्केल पौष्टिकतेसाठी सहज आणि विश्वसनिय स्क्रिनींग उपकरण आहे. त्याचप्रमाणे याला व्यापक जराचिकित्सा मूल्यांकनाच्या भागात लागु केले जाऊ शकते. यामध्ये जठरांत्र अनियमीतता, वेदना, गतीहिनता, वहन, भूकेतील बदल, खाण्याच्या समस्या, औषधे, संज्ञानात्मक आणि भावनात्मक समस्या, औषधे, धुम्रपान आणि ड्रिकिंगच्या सवयी त्याचप्रमाणे सामाजिक स्थिती सारख्या १२ घटकांना समाविष्ट करण्यात आले आहे. ४ पॉइंटपेक्षा जास्त कट ऑफ स्कोरने वयस्क व्यक्तींना कमी पोषित मानले गेले पाहिजे, याच प्रकारे अशा स्केल प्रमाणे त्या उपचार जोखमींच्या कारणांची ओळख करुन, ज्यामुळे कमी पोषक स्थिती निर्माण झाली आहे, त्यांचा इलाज करण्यास सहजता लाभू शकते. या स्केलच्या उपयोगाला हॉस्पिटलमध्ये भरती रोग्यांच्या संबंधात प्रमाणीत केले गेले आहे परंतु इतर व्यवस्थांच्या मध्ये याच्या प्रयोगाची तपासणी अजुन बाकी आहे. याच्या सोबत, या स्केलच्या पूर्वानुमान वैधतेला साबीत करण्यासाठी अधिक तपासणीची आवश्यकता आहे (एन्न नुट्र मेटॅब 1995;39:340±5)


स्क्रीन

सामुदायिक स्थितीत राहणा-या वयस्क लोकांमध्ये पौष्टिकतेच्या जोखमीला निर्देशित करण्यासाठी एक सरळ, व्यवहारीक, वैध आणि विश्वसनीय स्क्रिनींग उपकरणाचा विकास करण्याचा प्रयत्न कॅनडाच्या विशेषतज्ञांनी १५ घटकांनी युक्त प्रश्नावलीला तयार करुन केला होता, स्क्रीन (समुदायातील वरिष्ठ: जेवण्याच्या आणि पौष्टिकतेच्या संबंधीत जोखीम मूल्यांकन) आणि त्याला स्वत: किंवा मुलाखत काराकडुन प्रचलित करता येऊ शकते. प्रश्नावलीच्या प्रश्नांमध्ये वजनातील बदल, सीमित अथवा न खाल्ल्या जाणा-या आहाराची संख्या, जेवणाची वारंवारता, फळे आणि भाज्या, मांस, दुध आणि दुग्धजन्य उत्पादनांचे आणि द्रव्य पदार्थांचे सेवन, चावणे, खाणे आणि गिळणे, एकटे जेवणे, आहार प्रतिस्थापन (उदा.एन्श्युर), भूक, खाण्यासाठी लागणारा पैसा, जेवण तयार करणे, आणि खरेदी या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.याच्या अंतर्गत विषय वस्तु वैधता आणि आंतरिक आणि परिक्षण पुर्नपरिक्षण विश्वसनीयता सिध्द करण्यात आली आहे. नंतर, नैदानिक निर्णयांच्या सोबत नंतरच्या कंस्ट्रक्ट वैधतेला सिध्द करण्यात आले आहे. (जे जेरोनटोल 2001:56A:M552±8)


  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.