OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

वृध्द लोकांसाठी लक्षात घेणयासारख्या पोषणात्मक बाबी

साठी झालेल्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असणा-या व्यक्तींची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे, तसेच नेहमी या वयोगटामध्ये सकस आहार न घेतल्यामुळे आरोग्याला बाधा पोहोचण्याच्या शक्यता सर्वात जास्त असतात. विभीन्न स्त्रोतांकडुन मिळालेल्या पुराव्यांवरुन हे म्हटले जाऊ शकते की अनेक वयोवृध्द व्यक्ती अनिवार्य ऊर्जा आणि सकस अन्नाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिने विविध प्रकाराच्या आहारांना घेण्यास असमर्थ ठरतात. सद्य स्थितीत विकसनशील देशांमध्ये वृध्द व्यक्तींमार्फत सामाजिक आणि जनसांख्यिकीतील बदलांच्यामुळे कुपोशणाची दुहेरी समस्या उदभवत आहे, ज्यामुळे किमान पौष्टिकता निर्माण होत आहे आणि त्याच सोबत त्यांच्या आहारात फॅट, पशु उत्पादने, रिफाईन अन्न पदार्थ आणि कमी तंतुमय अन्न पदार्थांमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे लठ्ठपणा, २-या प्रकारच्या मधुमेहामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. म्हणुन वृध्द व्यक्तींमध्ये आहाराच्या संबंधीत हस्तक्षेप विशेष स्वरुपात आव्हानात्मक आहे, कारण सकसपणाच्या संबंधीत आवश्यकतांमध्ये कुठल्या वयोगटासाठी बदल करण्याच्या दृष्टिने सूचना देण्यासाठ आवश्यक असलेल्या माहितीची कमतरता जाणवत आहे.


वय वाढण्याचे परिणाम

लोकांचे वय जसे वाढते, त्याप्रमाणे आरोग्यदायी पौष्टिकतेसंबंधीत सवयींसाठी नेहमी, सर्वतोमुखी हस्तक्षेप कार्यप्रणालीची गरज भासते, त्यामुळे असे व्यापक कारक, ज्यामध्ये शारिरिक मानसिक आणि आर्थिक बदलांचा समावेश आहे, आणि ज्यामुळे कमी प्रमाणात पौष्टिक आहार घेतला जातो, अशा कारणांचा आढावा घेता येऊ शकतो.


शारिरीक बदल

वाढत्या वयासोबत शरीराच्या कार्याचा वेग मंदावतो, इजा झालेल्या पेशींना बदलण्याची क्षमता कमी होते. चयापचय दर मंदावतो. याच्या परिणाम स्वरुपात, कॅलरी संबंधीत आवश्यकता कमी होतात, ज्यामुळे संतुलित आहार घेण्याची आणि ऊर्जेच्या गरजांमध्ये संतुलन ठेवण्याच्या वयस्क व्यक्तींच्या क्षमतेतील बदलांमुळे हे अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते. कमी कॅलरीच्या गरजे व्यतिरीक्त, अनेक वयस्क लोकांना ,मुबलक प्रमाणात कॅलरी मिळण्यास अडचण येते, ज्यामुळे शेवटी ते थकवा, वैमनस्य किंवा दुर्बळ प्रतिकार क्षमतेमुळे ग्रस्त होतात. जस जसे आपले वय वाढत जाते, आपल्या शरीराच्या रचनेतील पातळ उती वस्तुमानातील(२५%पर्यंत) कमतरतेमुळे , व शरीराच्या फॅटमध्ये वाढीच्या सोबत परिवर्तन होते, या प्रकारच्या बदलांचा वेग आणखी वाढू शकतो, कारण वयस्क लोकांच्या आहाराशी संबंधीत प्रथिनांना कमी प्रमाणात कुशलतेने वापरले जाते, त्याचप्रमाणे त्यांना आपल्या पातळ उतींच्या वस्तुमानाला राखुन ठेवण्यासाठी आहारामध्ये पुरेश्या उच्च गुणवत्तेच्या प्रथिनापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता भासु शकते. हाडांच्या घनतेत देखील कमतरता येते, तसेच डोळ्यांनी जवळच्या वस्तुंवर पहिल्या सारखे लक्ष केंद्रित करता येत नाही काही व्यक्तींच्या डोळ्यात मोतीबींदु तयार होतो, दात खराब होणे, सर्वसामान्य बाब बनते, त्याचप्रमाणे ऐकु येणे आणि चव घेणे, वास घेणे या संबंधीत समस्या कमी गंभीर स्वरुपाच्या असतात. हायड्रोक्लोरीक आम्ल आणि विकरांच्या स्त्रवणात कमी आल्यामुळे, पचन प्रभावीत होते. यामुळे इन्टोन्सिक फॅक्टर सिन्थेसिसमध्ये कमी येते, ज्यामुळे ब-१२ जीवनसत्वात कमतरता येते. आतड्यांचे बळ कमी होते, त्यामुळे मलावरोध व अनेक स्थितीत अतिसार होऊ शकतो.


मानसिक बदल

वयासोबत भावनांमध्ये कमतरता येत नाही. वास्तविकतेत, वाढत्या वयासोबत मानसिक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे वैमनस्य आणि भुक मंदावण्यासारखे परिणाम होतात. वयस्क व्यक्ती नेहमी तक्रार करतात, की त्यांना एकट्यासाठी जेवण बनवण्यास किंवा हॉटेलमध्ये एकटे जेवण्यास आवडत नाही. अभ्यासांनी हे माहित पडले आहे की एकटे राहणे वृध्द लोक, आपल्या नव-यासोबत किंवा बायको सोबत राहणा-या व्यक्तींच्या तुलनेत खराब आहाराचा विकल्प न निवडता कमी कॅलरी ग्रहण करतात. स्वत: बद्दल असलेल्या स्वाभिमानाच्या कमतरतेमुळे खाण्याबद्दलची रुची कमी प्रमाणात विकसीत होते.


आर्थिक बदल

कुठल्याही व्यक्तीला त्याच्या निवृत्ती नंतरच्या जीवनाची सावधानतेने तयारी न केल्यास, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, फळे, सुके मेवे यांच्या सारखे महाग पदार्थ त्याच प्रमाणे कॅल्शियम, प्रोटिन, झिंक, आयरन, बी जीवनसत्वाने युक्त आणि महत्वपूर्ण ऍंटि ऑक्सीडंट स्त्रोत म्हणुन ओळखल्या जाणा-या बदामांचे सेवन करु शकत नाहीत, ज्यामुळे विशेष स्वरुपात सेवन करण्यात कमतरता येते.


  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.