OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

पोषणतत्वांची कमतरता आणि अतिरीक्त सेवन

सरासरी पौष्टिक त्वांच्या सेवनाशी संबंधीत वर्तमान माहितीवरुन असे लक्षात येते की,वयस्क व्यक्तींना कॅल्शियम,ड-जीवनसत्व,ई,पोटॅशियम,तंतुमय पदार्थांच्या मुबलक प्रमाणातील सेवनाच्या मूल्यांवर उतरण्यासाठी जोखीम उदभवते.


कॅल्शियम

कॅल्शियमचे सेवन आणि शोषण वाढत्या वयासोबत कमी होत जाते. सध्याच्या अभ्यासावरुन असे लक्षात येते की, कॅल्शियमची कमतरता आणि ऑस्टोयोपोरोसिसच्यामध्ये जवळचा संबंध आहे, चयापचयी हाडांच्या रोगामध्ये कॅल्शियमचे संतुलन नकारात्मक असते आणि हाडांच्या वस्तुमानाची हानी होते. आपल्या शरीराचे भिन्न घटक जे कॅल्शियम शोषण्याचे कार्य करतात, त्यात सुर्य किरणे, आहाराशी निगडित तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांचे सेवन लहान आतड्यातुन होणा-या अवशोषणाला वाढवतात आणि त्यात सहभागी होतात. कॅल्शियम वनस्पती आणि पशु दोहोंमध्ये आढळते. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ(मठ्ठा, साय नसलेले दुश आणि पनीर)जैव उपलब्ध कॅल्शियमचे सर्वात समृध्द स्त्रोत आहेत. वनस्पतीजन्य आहारात पालेभाज्या, अमरनाथ,मेथी, शेवग्याची शेंग विशेष स्वरुपात क‘अल्शियमची मात्रा मोठ्याप्रमाणात असते. कंदमुळे टॅपिओकाचे श्रेष्ठ स्त्रोत आहेत. भातामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी आढळते आणि बाजरी आणि रागीमध्ये ती जास्त असते. सुके मेवे आणि बीयांमध्ये कॅल्शियम मोठ्याप्रमाणात असते. डेयरी उत्पादनांच्या सेवनावर बंदी आणणारा घटक लेक्टोस सहनशलतेचा उच्च दर आणि लॅक्टोस असहिष्णुता यांचा ग्रहण बोध आहे.


ड जीवनसत्व

वाढत्या वयासोबत त्वचेच्या संश्लेषणाची क्षमता कमी झाल्यामुळे वयस्क लोकांमध्ये ड जीवनसत्वाची गरज पूर्ण करण्याची जोखीम वाढते, वयस्क व्यक्तींमध्ये निर्देशीत वजनापेक्षा जास्त वजन आणि स्थुलपणाच्या वाढण्यामुळे शरीराच्या फॅट कंपार्टमेंट्सच्या स्थानांतरणामुळे जैव उपलब्धता आणखीन कमी होते. निसर्गामार्फत दिलेल्या अतिशय कमी पदार्थांमध्ये ड जीवनसत्व आढळते. मासे (सॅलोमन, टुना आणि मॅकरेल) फीश लीवहर ऑईल द जीवनसत्वाचे सर्वश्रेष्ठ स्त्रोत आहेत, बीफ लीवर, पनीर, अंड्याचा पिवळा बलक इ.मध्ये लहान प्रमाणात ड जवनसत्व ढळाते. ड जीवनसत्व आहारात प्रामुख्याने विटामिन डी३ (कॉलेकॅसिफेरॉल) आणि त्याच्या मेटॅबोलाईट २५ (ओ एच)डि ३ च्या रुपात आढळते.


लोह

शरीर क्रिया विज्ञानाविषयीची माहिती (उदा विकास आणि मासिक पाळी बंद होणे) आणि स्त्रीयांमधल्या संचित लोह मापाचा पत्ता लागणे असे दर्शवते की ५१ वर्षानंतर लोहाच्या गरजेत घट होते. परंतु वयस्क लोकांच्या काही अवयवात लोहाचे प्रमाण वाढल्याने जोखीम तयार होते कारण लोहाच्या उपलब्धतेत आणि आणि शोषणात कमतरता येते. आहारात लोहाचा सर्वात मोठा स्त्रोत असणा-या मांसाचे सेवन वयस्क लोक कमी प्रमाणात करु लागतात. अन्न चावण्यास अडचण आणि आर्थिक कारणे आहार कमी करण्यास कारणीभुत ठरतात.पोटात स्त्रवणा-या एच सी एल मध्ये वयाच्या वाढण्यामुळे येणारी कमतरता, लोहाचे शोषण कमी करु शकते किंवा अवशोषणात कमी आल्यामुळे अंशत: किंवा पूर्णत: गॅस्ट्रेक्टोमी, किमान अवशोषण सिड्रोम होऊ शकतो.


तंतुमय पदार्थ

उच्च तंतुमय आहार निम्न ऊर्जा आणि जीवनसत्वे आणि खनीजे व फाईटो रसायनांनी युक्त असतो. तंतुमय पदार्थ वयस्क व्यक्तींसाठी महत्वपूर्ण पौष्टिक तत्व असते, कारण वाढत्या वयासोबत पचन तंत्र आणखीन मंदावते. आपल्या जेवणात तंतुमय आहारामुळे नियमीत कार्ये आणि भरपूर पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शौच यंत्रणेमध्ये नियमीतता येते. वयस्कांसाठी दररोज ३०४- ग्रॅम तंतुमय पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली जाते.

खालील घटक तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत:
  • डाळी शेंगभाज्या,विशेष स्वरुपात भरड असलेल्या धान्याचे विविध प्रकार
  • फळे आणि भाज्या
  • बदाम इ.

पौष्टिक पदार्थांचे आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन करण्याची संभावना

फॉलिक आम्ल

६५ वर्षापेक्षा जास्त वयात आर डि ए ३०० एम सी जी/दिवस असतात. फॉलेटच्या कमी प्रमाणात सेवनाने मेगालोब्लास्टिक ऍनेमिया आनि मॅक्रोसाईटोसिस विकसीत होऊ शकतो. फॉलेटच्या आहाराशी निगडीत स्त्रोतांमध्ये भाज्या , यकृत आणि आणि वृक्काचा समावेश होतो. जास्त वेळ शिजवण्यामुळे किंवा निम्न श्रेणीतील भोजनपर्यायांमुळे उदा चहा आणि टोस्ट ग्रहण केल्याने फॉलेट नष्ट होते. हॉस्पिटल किंवा नर्सिंग होममध्ये भरती झालेल्या व्यक्तींमध्ये याचे सेवन कमी आढळते. हे लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे की, १२ च्या सीरम स्तरामध्ये वाढत्या वयासोबत कमतरता येते. गॅस्ट्रिक एट्रोफी मुळे होणा-या कमी अवशोषणामुळे निम्न सीरम बी १२ च्या अनेक समस्या निगडित आहेत. बी १२ च्या अस्तित्वामध्ये फॉलिक आम्लाच्या अधिशेष पुरकतेमुळे बी १२ च्या कमतरतेच्या संबंधीत लक्षणे आढळतात.


सोडियम

वयस्क लोकांसाठी चव किंवा वास घेण्याची कमी झालेली संवेदना सर्वसाधारण बाब आहे. त्यामुळे ते आपल्या जेवणामध्ये तत्परतेने मीठाच्या प्रमाणाला वाढवतात.

जलशोफ किंवा द्रव धारणा उच्च क्षारयुक्त आहार घेतल्याने होऊ शकते, आणि जेव्हा वय झालेले असते तेव्हा होण्याची अधिक शक्यता असते. क्षार सेवनाचे प्रमाण कमी केल्याने द्रव धारणा कमी होण्यास मदत होते आणि ह्रदयरोग, नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा यकृतकाठिण्य असलेल्या रुग्णांना क्षारसेवनाचे प्रमाण कमी केल्याचा विशेष लाभ होईल.


पाणी

अनुगामी अभ्यासानुसार, पुरुषांमध्ये वयाच्या 65 वर्षांपर्यंत आणि स्त्रियांमध्ये 40 किंवा 50 पर्यंत, बहुधा मेनोपॉजच्या प्रभावांमुळे एकूण शारीर जलाच्या प्रमाणात बदल होत नसतो. वयस्कांमध्ये द्रव आणि इलेक्ट्रोलाइट विक्षोभाचे निर्जलीकरण हे सर्वांत सामान्य कारण आहे. तहानेची संवेदना कमी होणे आणि मूत्रपिंडांद्वारे कमी झालेले जलसंवर्धन यामुळे कमी झालेले जलप्राशन ही निर्जलीकरणाची प्रमुख कारणे असतात. डायरेटिक्स आणि लॅक्सेटिव्ह्स आदी औषधांमुळे द्रव वेगाने आटते. 30 ते 35 मि. ली./ किलो योग्य शारीर वजन हे जलसेवनाचे पुरेसे प्रमाण आहे. वयस्कांनी रोज सहा ते आठ ग्लास पाणी प्याले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे रोज साधारणतः 6 कप मूत्र निर्माण होईल. सजलीकरणाच्या स्थितीची व्याख्या करणे किंवा नेमकेपणाने किंवा अचूकरीत्या निश्चित करणे कठीण असते. रक्ताची ऑस्मोलॅलिटी हे सजलीकरण स्थितीचे लक्षण असते. मात्र, ते साधारणतः 284 एमओएसएमओएल/किलो जवळून नियमन केलेले असते. (ते वयस्कांमध्ये थोडेसे वाढते (1-2 टक्के)


योग्यरीत्या सजलीकृत राहण्यासाठी टिपाः

  • दिवसभर नियमित पाणी प्या. प्रत्येक जेवण आणि खाण्यासोबत पेयाचा समावेश करा.
  • द्रवाचे उत्तम स्त्रोत म्हणजे पाणी, रस, मिनरल वॉटर आणि नारळाचे पाणी, ताक, लिंबू पाणी इ.
  • तुम्ही पिता त्या अल्कोहॉलच्या प्रमाणावर नजर ठेवा. जर तुम्ही खूप प्यालात तर तुम्ही निर्जलीकृत व्हाल.
  • कोला, चहा आणि कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवा.
  • द्रव अधिक मात्रेने असलेले अन्न सेवन करा, उदा. फळे, भाज्या, सूप, दही, लस्सी, खीर, कस्टर्ड आणि आइसक्रीम.

Mail to -: Dr. Parmeet Kaur
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.