OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

आमवात आणि हालचाल

संधींच्या व्याधी अनेक ज्येष्ठ नागरिकांना जडतात. सांधे दुखणे, सांधे आणि स्नायू आखडणे यामुळे तुमच्या गतीशीलतेवर गंभीर परिणाम होतो. तुमची लक्षणे दूर करण्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला औषधे सुचवू शकतात, भौतिकोपचारतज्ज्ञ विशेष व्यायामाद्वारे आपल्याला मदत करू शकतो आणि व्यावसायिक रोगोपचारतज्ज्ञ गतीशीलतेची साधने आणि आपल्या सांध्यांच्या काळजीबाबत तुम्हाला सल्ला देऊ शकतो. तुमचे डॉक्टर तुम्हाला भौतिकोपचारतज्ज्ञाकडे किंवा व्यावसायिक रोगोपचारतज्ज्ञाकडे अशा प्रकारच्या मदतीसाठी जाण्यास सांगू शकतात.


गतीशीलता साधने

जर आपल्याला हिंडण्याफिरण्याचा त्रास होत असेल, तर अनेक प्रकारची गतीशीलता साधने आहेत. जर तुम्ही तुम्हाला योग्य असे साधन निवडलेत, तर तुमचे स्वातंत्र्य तुम्ही पुन्हा प्राप्त करू शकाल. साधे गतीशीलता साधन म्हणजे वॉकिंग स्टीक, जी तुमच्या एखाद्या पायाला आधार हवा असेल तर उपकारक ठरेल. तुमच्या दोन्ही पायांना अधिक आधार हवा असेल तर तुम्हाला दोन वॉकिंग स्टीक, वॉकिंग फ्रेम किंवा रोलेटर वापरावा लागेल. तुम्हाला चालायला जमतच नसेल तर व्हीलचेअरची गरज भासेल.

तुमची वॉकिंग स्टीक योग्य लांबीची आहे याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. तुमचे हात बाजूला असतील तेव्हा ती मनगटाच्या पातळीवर असायला हवी. जर तोल राखण्यासाठी दोन वॉकिंग स्टीक वापरत असाल, तर त्या थोड्या अधिक लांब असाव्यात, कारण त्या तुमच्या पुढे धरल्या जातील. वॉकिंग स्टीकच्या टोकाला रबर असणे गरजेचे असते, कारण त्यामुळे त्या घसरण्याची भीती नसते. त्यांची झीज लवकर होत असते, त्यामुळे नियमितपणे त्या तपासणे आवश्यक असते. वॉकिंग फ्रेम अधिक आधार देतात, स्थिर असतात आणि तुमचा आत्मविश्र्वास वाढवतात. रोलेटर म्हणजे व्हील्ड फ्रेम्स ज्या हाताळायला सोप्या असतात. मध्यम समतोल समस्या असलेल्यांसाठी त्या चांगल्या असतात.


आर्थराईटिस आणि वेदनाशमक औषधे

आर्थराईटिस किंवा सांध्यांची जळजळ या वयोवृध्द स्थितीत नेहमी आढळून येणारा त्रास आहे आणि हा वयस्क लोकांना होणा-या तीन त्रासांपैकी एक आहे. आर्थराईटिसचे प्रकार आहेत, ज्यापैकी ओस्टेओआर्थराईटिस हा सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. ओस्टेओआर्थराईटिस, स्पष्ट शब्दात व्यक्त करायचा झाल्यास जळजळ होणारी स्थिती नसते, परंतु वयाशी संबंधीत अपकर्ष करणारा आजार आहे. या स्थितीची निर्मिती वजन उचलणा-या खालच्या बाजुच्या अवयवांचे सांधे, मान आणि पाठ व हातांमध्ये होते. वेदना जास्त कमी होऊ शकते आणि सौम्य ते तीव्र अशा स्वरुपाची असू शकते. आर्थराईटिसचे बहुतांश प्रकार इलाज न होणारे असतात. उपचारांचा उद्देश वेदना कमी करणे आणि बाधीत सांधांच्या कार्याला पुर्नस्थापित करणे असा असतो. .

आर्थराईटिसच्या उपचार वेळापत्रकामध्ये आराम, वजन कमी करणे, फिजीयोथेरपी, व्यायाम आणि वेदना शमनासाठी औषधोपचाराचा समावेश असतो. आर्थराईटिसची औषधे वयस्क लोकांच्या मार्फत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सर्वसामान्य औषधे आहेत. सर्व वेदनाशमकांमध्ये नॉन स्टेरॉईड, जळजळ न होणारी औषधे (एन एस ए आय डिज) सर्वात जास्त वेळा लिहुन दिली जातात हि औषधे शरीरात निर्माण होणा-या रसायनांवर आळा घालतात , ज्यामुळे वेदना, कडपणा आणि सूज उदभवते. एन एस ए आय डीची सुरुवात करण्यासाठी काही दिवस ते एक आठवडा लागतो आणि पूर्ण उपचाराच्या २ ते ३ आठवडे आधी फायदे दिसू लागतात. Some of the most frequently used NSAIDs are listed below. Most of these pain-relieving drugs have similar effect and side-effects.

जेनेरिक नाव ब्रॅंडचे नाव
  ऍस्पिरीन   डिस्प्रिन
  निमेस्युलिड   निम्युलिड, नाईस
  मेलोक्सिकॅम   मेलफ्लाम, एमकॅम
  आयबुप्रोफेन   ब्रुफेन
  डायक्लोफेन्स   वॉवेरान
  पायरोक्सीकॅम   पिरॉक्स
  पॅरासिटीमॉल   क्रोसिन, कॅलपोल
  सेलेकोक्सिब   सेलॅक्ट, रेविब्रा.
एन एस ए आय डीचे दुष्परिणाम

अतिआवश्यक असलेल्या वेदना शमनासोबत, एन एस ए आयडीचे अनेक नको असलेले दुष्परीणाम काही लोकांमध्ये आढळून येतात. यामध्ये पोटा़चा अल्सर, हृदयाची जळजळ, मळमळ, पोटदुखी, उलट्या, डायरिया , जठरांत्रीय रक्तस्त्राव यांचा समावेश आहे. जठरांत्रीय रक्तस्त्राव रक्ताच्या उलट्यांमध्ये किंवा काळ्या रंगाच्या शौचात परिवर्तीत होऊ शकतो. एन एस ए आय डीमुळे डोकेदुख, सुस्ती आणि अंधुक दृष्टीचा त्रास होऊ शकतो. .

तुमच्या हि लक्षणे विकसीत होत असल्यास डॉक्टरांना संपर्क करा. काही स्थितींमध्ये दुष्परिणाम किमान ठेवण्यासाठी उपचार जुळवून घेण्याची आवश्यकता भासते. दुष्परिणाम कमी करण्यासाठी, एन एस ए आय डी जेवणा नंतर घ्याव्यात. या व्यतिरीक्त, ऍंटि अल्सर औषध, ओमेप्रासोले (ब्रॅंड नाव ओमेझ, ऑसिड, प्रोटोलॉक) पोटाच्या सुजेला टाळतात. एन एस ए आय डि ने होणा-या पोटाच्या समस्या धूम्रपान करणा-या आणि अल्कोहोलचे सेवन करणा-या लोकांमध्ये नेहमी आढळून येतात. .


कोर्टिकोस्टेरॉईड

कोर्टिकोस्टेरॉईड काही प्रकारच्या आर्थराईटिसमध्ये जळजळ कमी करते. तोंडावाटे किंवा जळजळ होणा-या स्नायुत ते इंजेक्शनने दिले गेल्याने कोर्टिकोस्टेरॉईड जळजळ कमी करते आणि तात्पुरत्या प्रमाणात वेदना कमी करतात. .

कोर्टोकोस्टेरॉईडचे गंभीर दुष्परिणाम असतात, ज्यामध्ये जळजळीचा कमी झालेला प्रतिरोध, अपचन, वजन वाढणे, स्नायुंच्या क्षमतेचा -हास, मुड बदलणे, अंधुक दृष्टि, मोतीबींदु, मधुमेह, ब्रिटल बोन्स (ओस्टेओपोरोसिस) आणि उच्च रक्त दाबाचा समावेश होतो.

कोर्टिकोस्टेरॉईड जरी उपयोगी पडणारे औषध असले तरी, ते वैद्यकिय निरीक्षणाच्या अंतर्गत घ्यावे. .


सिध्द न झालेले उपचार

दिर्घकालीन आर्थराईटिस असलेले लोक नेहमी औषधोपचाराचे विकल्प शोधतात. काही गोळ्या, यंत्रे आणि आहार आर्थराईटिसला बरे करण्यासाठी सूचवले जातात. आर्थराईटिसची वेदना कमी जास्त होत असल्यामुळे, अनेक लोक या उपचारांचा खरोखरीच लाभ होण्यावर विश्वास ठेवतात. चमत्काराचा दावा करणारी कुठलीही गोळी किंवा यंत्र काळजीपूर्व वापरावे कारण बहुतांश आर्थराईटिस बरे होत नाहीत. .

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.