OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

तुमच्या तोंडाची कळजी घेणे

निरोगी तोंड हे उत्तम स्वास्थ्य आणि चांगल्या व्यक्तीमत्वाचे लक्षण असते. परंतु आपण सामान्य स्वरुपात आपल्या तोंडाची आवश्यक असलेली काळजी घेत नाही आणि दातांशिवाय आपण आयुष्यभर त्रास झेलत राहतो.

जंतुंमुळे दातांची झीज होण्याची प्रक्रिया आयुष्यभर तोंडात नैसर्गिकरित्या दात असेपर्यंत सुरु राहते. मुलांप्रमाणे, फ्युरॉईड जेष्ठ व्यक्तींसाठी देखील आवश्यक असते. या व्यतिरीक्त फ्युरॉईड युक्त पाणी घेणे, टूथपेस्टमध्ये फ्युरॉईडचा वापर करणे आणि तोंड धुणे देखील सुरक्षेमध्ये समाविष्ट करण्यात येते.

हिरड्यांचा आजार किंवा पॅरिडोनटाईटिस, वाढत्या वयामध्ये दात पडण्याचे सर्वसामान्य कारण असते, आणि हे घाण साठल्यामुळे होते. हिरड्यांच्या संबंधीत रोगांना थांबवण्यासाठी तुम्ही रोज ब्रश करणे आणि दातांवरील घाण साफ करण्याची आवश्यकता असते. त्याचसोबत तुमच्या दातांना आणि हिरड्यांना काळजीपूर्वकपणे तपासून, तुम्ही लालसरपणा, सुज किंवा हिरड्यातुन रक्त येण्यासारख्या रोगाच्या लक्षणांना आ्धीच जाणुन घेऊ शकता.

दात आणि हिरड्यांना अधिक चांगल्या पध्दतीने निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारे ब्रश करण्याबद्दल माहिती असावी लागते. दातांवर चहुबाजुंनी कोमल केसांच्या ब्रशने आणि फ्युरॉईड टूथपेस्टने ब्रश करावा. गोलाकार आणि पुढे पाठी करत ब्रश करा आणि हिरड्यांच्या आसपास काळजीपूर्वक ब्रश करा. तुमच्या जीभेवर हल्का ब्रश करा, त्यामुळे त्यावर साचलेली घाण आणि अन्नकण घालवता येऊ शकतील, आणि तोंडात तजेला उत्पन्न होण्यास मदत होईल.

कोरड्या तोंडामुळे तहान लागण्याची भावना निर्माण होते आणि सारखे पातळ पदार्थ प्यायची इच्छा होते, असे अनेक वयस्कांच्या बाबतीत होते. याचे कारण म्हणजे, खाणे, गिळणे आणि स्वाद घेण्यात आणि बोलण्यासाठी अडचण येऊ शकते. जेव्हा लाळ ग्रंथींमार्फत योग्य कार्य केले जात नाही, तेव्हा तोंड कोरडे पडते. हा अनेक औषधांचा दुष्परिणाम देखील असू शकतो, याच्या सोबत अनेक शारिरिक समस्या देखील असू शकतात.तोंड कोरडे राहिल्यामुळे दातांच्या आरोग्यावर प्रभाव पडु शकतो,. ज्यात दात पडणे सुरु होते आणि हिरड्या रोगग्रस्त होतात, कोरडेपणा दुर करण्यासाठी अतिरीक्त पाणी प्यावे, सारखयुक्त पदार्थ टाळावेत, कॅफिन असलेल्या पेय पदार्थांमुळे , तंबाखु किंवा अल्कोहोल असलेल्या पदार्थांच्यामुळे कोरडेपणा वाढत असल्याने ते टाळावेत. दोषी औषधाचा शोध लावण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असते.

जर तुम्ही खोटे दात (डेन्चर्स)लावलेले असतील, तर त्यांना स्वच्छ ठेवावे आणि त्यावर साचलेल्या अन्नकणांना साफ करावे, ज्यामुळे कायमचे डाग पडण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे श्वासाची दुर्गंधी आणि हिरड्यांची जळजळ होऊ शकते. दिवसातुन एकवेळा तुमच्या डेन्चरला डेन्चर केयर उत्पादनाने स्वच्छ करावे. खोट्या दातांना पाणी किंवा डेन्चर स्वच्छ करण्याच्या द्रवपदार्थात ठेवा. सकाळी जेवणानंतर रात्री झोपताना मीठाच्या पाण्याने चुळभरणे लाभदायक ठरु कते.

अंशत: डेन्चर्सची पूर्ण डेन्चर्सच्या नुसार काळजी घ्यावी. कारण अंशत: डेन्चर्सच्या क्लाप्समध्ये जीवाणु साचु शकतात. या भागांना योग्य प्रकारे स्वच्छ करणे आवश्यक असते.

कालमानपरत्वे तोंडातील उतींमधल्या बदलांच्या प्रमाणे डेन्चर्स बदलावेत किंवा त्यांच्या डिजाईनमध्ये बदल करावेत. डेन्चर्स घरी दुरुस्त करु नये यामुळे ते क्षतीग्रस्त होऊ शकतात आणि तोंडातील उतींना इजा पोहचू शकते.

डेन्टल इम्प्लांट्सना दातांसारखे दिसण्यासाठी डिजाईन करता येऊ शकते आणि हिरड्यांच्या पृष्ठभागावर टिकण्यासाठी किंवा जबड्याच्या हाडात त्यांना शस्त्रक्रियेमार्फत लावले जाऊ शकते. असे रुग्ण ज्यांच्यात हाडांची पुरेशी संरचना अस्तित्वात आहे, त्यांच्यात डेन्टल इम्प्लांट्स यशस्वी होऊ शकतात. यासाठी विशेषतेची आवश्यकता असते आणि म्हणुनच तुम्ही अनुभवी दंत चिकित्सकाला संपर्क करुन तुमच्या प्रश्नांची चर्चा करु शकता , यामुळे कृती तुमच्यासाठी हितावह ठरते.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.