OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

मुत्र असंयम

मुत्र असंबधता किंवा मुत्र थांबवण्याची असमर्थता वयस्क व्यक्तींची विषेशत: स्त्रीयांची सर्वसामान्य समस्या असते. 60 पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीयांपैकी 1/3 स्त्रीया आणि एकूण पुरुषांपैकी 10 टक्के पुरुष या समस्येने ग्रस्त असतात. असंबधतेची पातळी सौम्य ते गंभीर समस्येपर्यंत असू शकते.असंबंध मूत्र रोगाने पिडित रुग्ण आणि त्याच्या देखभालकर्त्यांना नेहमी उपलब्ध असलेल्या विकल्पांची माहिती नसते, रुग्ण अकारण पीडा सहन करतात. वास्तविकतेमध्ये बहुतांश स्थितीत असंबधता नियंत्रीत करता येऊ शकते.

असंबधतेचे कारण वाढते वय नसून ते विशीष्ठ रोग किंवा औषध असते. असंबधतेचा संबंध नेहमी अशक्तपणा, भ्रम किंवा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याशी किंवा मुत्र संसर्गाशी असते. दिर्घकालीन असंबधता खालीलपैकी एका ल़क्षणामुळे घडून येते.

  • दाब असंबधता किंवा व्यायाम, खोकला, शिंकणे, हसणे किंवा मुत्राशयावर दाब पाडणा-या शारिरीक कृतींच्या दरम्यान मूत्र स्त्रवण होते. हे सर्व वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत घडून येताना आढळते.
  • उत्तेजक असंबधता किंवा दिर्घकाळ मुत्र थांबवून धरण्याची असमर्थता शौचालयापर्यंत न पोहाचु शकल्यामुळे, स्ट्रोकशी निगडीत, मनोभ्रंश आणि पार्किनन्स रोगामुळे होते. काही वयस्कांच्या सांधेदुखीमुळे शौचालयात जाण्यास उशीर होतो, त्याचप्रमाणाणे सामान्य मुत्र नियंत्रणासोबत त्यांना असंबधतेची समस्या असू शकते. असे सामान्यत: वयस्क लोकांच्या बाबतीत घडते.
  • संवर्धित पुरस्थ ग्रंथी किंवा दिर्घकालीन मधुमेहामुळे ओव्हरफ्लो असंबधंता किंवा नेहमी भरलेल्या मुत्राशयातून काही प्रमाणात मुत्र स्त्रवण होऊ शकते.

निदान आणि उपचार

असंबधतेच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे रोगाच्या कारणनिश्चितीसाठी सविस्तर निदानात्मक मुल्यांकन करणे होय. बहुतांश रोग्यांना मुत्र तज्ञ ;मुत्रनालिकेसंबंधित रोगाचे तज्ञद्ध किंवा स्त्रीरोग तज्ञ दाखवण्याची आवश्यकता पडते. या समस्येचा उपचार निदानावर अवलंबून असतो. ऑक्सीबुटिलीन-ट्रोपान सारखी औषधे प्रभावीपणे लागु होतात, परंतु त्यांचे तोंड कोरडे पडणे, ग्लुकोमा, मुत्र धारण यासारखे दुष्परिणाम देखील आहेत. जर ही समस्या संबधित पुरस्थ ग्रंथीमुळे निर्माण झाली असेल, तर षस्त्रक्रियेमार्फत यावर सुधारणा आणि उपचार केले जाऊ शकतात.

व्यायामाने श्रोणी क्षेत्राच्यां पेशींना दृढ करत येते, तसेच मुत्राषय आऊटलेटला नियंत्रित करता येते मूत्र नियंत्रणात मूत्राशय पूर्नप्रशिक्षणाशी निगडीत व्यवहार व्यवस्थापन तंत्रे हितावह ठरु शकतात. यामुळे मुत्र भरणे आणि शौचालयापर्यंत पोहचेपर्यंत ते थांबवण्याचा अनुभवात सुधारणा होते.

कधी कधी असंबध मुत्राचा उपचार कॅथेटरला( लवचिक रबरी नलिका ) मुत्रमार्गात टाकून केला जातो, ज्यामध्ये मुत्राला नियीमत वेळेत उत्सर्जीत केले जाते किंवा त्यालस कायमस्वरुपात मूत्राशयात ठेवले जाते. परंतू जास्त काळ कॅथेटर लावल्यामुळे संक्रमण होऊ शकते.

वरील उपाय निकामी होणा-या रुग्णांसाठी खास तयार केलेले अवशोषक अधोवस्त्र लाभदायक ठरते. परंतू ते सुध्दा महाग असते

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.