OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

संज्ञानात्मक असमर्थता और मनोभ्रंश

वया सोबत मेंदुच्या संरचनेत आणि कार्यांमध्ये अनेक बदल होतात. यामध्ये मस्तिष्क कोशिकांचा क्षय, मस्तिष्कातुन प्रेरणा कमी प्रमाणात प्रक्षेपित होणे त्याचप्रमाणे, मस्तिष्किय कोशिकांच्या चयापचयाच्या अंतिम उत्पादनांच्या स्थितीत होणा-या बदलाचा समावेश असतो. हे बदल घडत असून देखील सामान्य वयस्क व्यक्तीचा मेंदु शिक्षण आणि लक्षात ठेवू शकण्याची क्षमता मोठ्याप्रमाणात बाळगुन असतो. परंतु काही व्यक्तींमध्येवयाच्या संबं्धातले हे बदल मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यांच्यात महत्वपूर्ण कार्यात्मक असामर्थ्यता निर्माण करतात, ज्यांना संज्ञात्मक असमर्थता म्हणुन संबोधले जाते.


संज्ञात्मक असमर्थता

वयस्क झालेल्या मस्तिष्काच्या निदात्मक लक्षणांमध्ये संज्ञान किंवा व्यवहारामध्ये सुक्ष्म किंवा स्पष्ट स्वरुपात बदल होत असतात. वयस्क व्यक्तींमध्ये एका मर्यादेपर्यंत विसरणे हे घटना सर्वसामान्य बाब आहे ज्याला "वयाशी संबंधीत स्मृति विकृती" असे म्हणता येते.

वयाशी निगडित स्मृति विकृती नेहमी ५० वर्षांच्या नंतर दिसू लागते आणि याच बरोबर मंद गतीने स्मृति दुष्क्रिया सुरु होते, जीला योग्य त्या परिक्षणांच्या मदतीने सिध्द केले जाऊ शकते. परंतु बौध्दिक कार्य साधारणत: तशीच राहतात आणि कुठल्याही प्रकारची तांत्रिक कमतरता आढळून येत नाही.
याच्या तुलनेत मनोभ्रंश संज्ञात्मक असमर्थतेचे गंभीर आणि विकृतीविज्ञानात्मक स्वरुप असते. हे निदानात्मक सिंड्रोम आहे आणि याच्या अंतर्गत बहु संज्ञान क्षमतांची सतत असमर्थता परिक्षित होते, जी व्यावहारिक समस्यांशी निगडित असते.

अनेक विकृतीजन्य स्थितींमुळे मनोभ्रंशाची स्थिती निर्माण होते, ज्यामध्ये अल्जायमर आजार, लेवी बॉडी डिमेन्शिया, पार्किन्सन्स आजार आणि संवहन मनोभ्रंशाचा समावेश असतो. जीर्ण अल्कोहोल प्रयोग, थाईरॉईड संप्रेरकांची कमतरता, ब १२ जीवनसत्वाची कमतरता, संक्रमण आणि इजा इ. कारणांच्यामुळे असमर्थता एकुण स्थितीत विकसीत होते.

मनोभ्रंशाच्या लक्षणांमध्ये हळू हळू स्मृति नष्ट होणे, रोजची कामे करण्याची क्षमता कमी होणे, आत्म विस्मृती, शिकण्यात अडचण येणे, भाषा कौशल्यात कमतरता होणे, निर्णय आणि नियोजनाच्या संबंधीत विकृती आणि व्यक्तीत्वामध्ये होणा-या बदलाचा समावेश असतो. प्रगतीचा दर प्रत्येक व्यक्तीत विविध कारणांच्यामुळे भीन्न असतो.अल्जाईमर रोगाच्या लक्षणांमध्ये परिवर्तित झाल्याने मृत्युपर्यंतच्या लक्षणांमध्ये आठ वर्षांचा अवधी लागतो, परंतु हा कालावधी तीन ते वीस वर्षांपर्यंत असू शकतो.

सामान्यत: वय वाढण्याच्या क्रिये दरम्यान उत्पन्न होणारी संज्ञात्मक असमर्थता अतिशय कमी प्रमाणात अशक्तपणा निर्माण करते, त्याचप्रमाणे रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात याला मनोभ्रंशापासुन वेगळे करता येऊ शकते. खाली दिलेल्या रकान्यामध्ये या फरकांच्या बाबतीतल्या काही लक्षणांना दिले गेले आहे.

कृती मनोभ्रंश Age- associated Memory Problems
विसरणे समग्र अनुभव Parts of an experience
नंतर लक्षात येणे दुर्मिळ Often
नोट्सचा उपयोग करु शकतो हळूहळू असमर्थ Usually able
स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही हळूहळू असमर्थ Usually able
लेखी किंवा तोंडी सूचनांचे पालन करु शकतो हळूहळू असमर्थ Usually able

परंतु संज्ञात्मक असमर्थतेच्या उपचाराच्या योग्य स्थितींना वेगळे करण्यासाठी काळजीपूर्वक मूल्यांकन करण्याची गरज असते, ज्यामध्ये औदासिन्य, औषधांच्या बद्दलचा प्रतिकुल प्रभाव, चयापचयीक आजार आणि पौष्टिकतेच्या संबंधीत कमतरतांचा समावेश असतो.

अल्जाईमर आणि इतर मनोभ्रंशाच्या आजाराच्या निदानासाठी एकटे परिक्षण नसते. एक सुनिश्चित निदानासाठी मस्तिष्किय उतींच्या लक्षणात्मक विकृतीविज्ञान बदलांचे परिलक्षण अपेक्षित असते, ज्यांची फार कमी वेळा तपासणी केली जाते. परंतु योग्य त-हेने परिभाषित दिशानिर्देशकांच्या आधारावर मनोभ्रंशाचे संभवित निदान केले जाऊ शकते.
निदानाच्या मूल्यांकनात सावधानतापूर्वक निदानात्मक चिकित्सा, मानसिक स्थितीचे मूल्यांकन, रक्तातील नियमीत जैवरसायन परिक्षण, मस्तिष्काच्या चित्राची तपासणी (सी टी स्कॅन आणि एम आर ई स्कॅन) आणि अनेक प्रकातच्या तांत्रिक मनोवैज्ञानिक परिक्षणांचा समावेश असतो.

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.