होम >>> स्वास्थ्य >>> शारिरीक स्वास्थ्य >>>पुर:स्थ ग्रंथी समस्या
Resize Text -   

पुर:स्थ ग्रंथी समस्या

पुरस्थ ग्रंथी अक्रोडाच्या आकाराची असून ती पुरुषांमध्ये मुत्राशयाच्या खाली आढळते आणि मुत्रमार्गाने (मुत्र उत्सर्जन करणारी नलिका)वेढलेली असते. पुरुष प्रजननात ही महत्वाचे कार्य करते. .

पन्नाशीनंतर, पुरस्थ ग्रंथीच्या समस्या सर्वसामान्य बाब आहे. पुरुष संप्रेरकाच्या क्रियेमुळे पुरस्थ ग्रंथीचा आकार वाढतो. पुरस्थ ग्रंथीच्या आकारातील वाढ बहुतांश व्यक्तींमध्ये शुल्लक असते. परंतु, आकारमानातील वाढ काही रुग्णांमध्ये प्राणघातक ठरते.

बिनाईन प्रोस्टेटिक उपचार (बी पी एच)

प्रोस्टेट बिनाईन एनलार्जमेंटमध्ये मोठ्या आकाराची ग्रंथी मुत्रमार्गाला दाबते आणि मुत्राच्या उत्सर्जनामध्ये अडथळा उत्पन्न करते. वारंवार मुत्रोत्सर्जन, ठिबकणे आणि शेवटी मुत्रोत्सर्जन पूर्णपणे थांबणे ही नेहमी आढळणारी लक्षणे आहेत. आकार वाढलेली पुरस्थ ग्रंथी मुत्रमार्गाच्या संसर्गास कारणीभुत ठरते.

डिजीटल रेक्टरल तपासणीने वाढलेल्या पुरस्थ ग्रंथीचे लवकर निदान करता येते. अल्ट्रासोनोग्राफी परिक्षणामुळे पुरस्थ ग्रंथीच्या आकारामध्ये वाढ होण्याची पुष्टि मिळते आणि मुत्रोत्सर्जना नंतर मुत्राशयात किती मुत्र उरले आहे याचे मापन करता येते. प्राझोसिन, टेराझोसिन आणि डोज्साझोसुन या औषधांच्या वैद्यकिय उपचाराने पुरस्थ ग्रंथीची सौम्य प्रमाणातील वाढ व्यवस्थापित केली जाते

परंतु या उपचाराने बरे वाटत नाही. मोठ्या आकाराच्या पुरस्थ ग्रंथी लक्षणांच्या समवेत उपचाराला प्रतिसाद देत नसल्यास त्यात शस्त्रक्रियेचा उपाय करवा लागतो. वाढलेली पुरस्थ ग्रंथी मुत्रमार्गाच्या मार्फत (प्रोस्टेट टुर्पचे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन) काढुन टाकली जाते आणि पोटावरची शस्त्रक्रिया आता प्रचलना बाहेर गेली आहे. .

प्रोस्टेट कॅन्सर

पासष्टि नंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सामान्य बाब आहे.

कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला बी पी एच मुळे उदभवणा-या लक्षणांप्रमाणे आढळतात. उपचार न केलेला कॅन्सर शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पसरतो आणि त्यामुळे वेदना, अस्वस्थता आणि शेवटी मृत्यु संभवतो. रेक्टल तपासणीमार्फत नियमीत चिकित्सा प्रोस्टेट कॅन्सर शोधणाचा सर्वात चांगला मार्ग आहे आणि बरे होण्याच्या पातळीमध्ये त्याला लवकरात लवकर निदान करणे शक्य होते.

प्रोटेस्ट कॅन्सरचे खात्रीशीर निदान करण्यासाठी बायोप्सी (सोपी शस्त्रक्रियात्मक प्रक्रियाजीला सूई च्या सहाय्याने केले जाते आणि सुक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करण्यात येते.) सकारात्मक परिणामाच्या स्थितीत , आजाराच्या फैलावाचे परिक्षण करण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या केल्या जातात.

शस्त्रक्रिया, संप्रेरक उपचार आणि रेडियोथेरपी प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचाराच्या विविध प्रकारच्या पध्दती आहेत. शस्त्रक्रियेचा परिणाम आजाराच्या फैलावाच्या टप्प्यावर अवलंबुन असतो.

प्रोस्टेट समस्यांवरील सर्वोत्तम सुरक्षा म्हणजे नियमीत स्वरुपातील वैद्यकिय चिकित्सा होय, ज्यामध्ये पुरस्थ ग्रंथीच्या रेक्टल तपासणीचा आंतर्भाव असतो. तुमच्या डॉक्टरांना सतत मुत्रोत्सर्जनाची भावना, मुत्रोत्सर्जनात त्रास वाटणे , ठिबकणे यासारख्या लक्षणांच्या स्थितीत जरुर भेटा. गंभीर परिणामांची वाट पाहणे गंभीर आणि जीवघेण्या जटिलतांना कारणीभुत ठरु शकतात.