OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

वयस्क व्यक्तींसाठी आंतर्गत कृती

वयस्क व्यक्तींसाठी बाह्य कृती

करमणुक केंद्रांची

वरिष्ठ व्यक्तियों के लिए बाह्य गतिविधियां

वॉकिंग

खरतर सर्व वयाच्या लोकांसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. खुल्या हवेत श्वास घेण्याची संधी मिळाल्यास आणि हिरवाईचा अनुभव घेतल्यास तुम्हाला उदासिनता घालविण्यास आणि मनाचे संतुलन राखुन ठेवण्यास मदत मिळते. यामुळे दुस-या लोकांना भेटण्याची संधी मिळते. परंतु यासाठी तुम्हाला आरामदायक बुट घालणे महत्वाचे आहे, ज्यामुळे तुमच्या पावलांना आराम मिळेल आणि त्यांना थकवा जाणवणार नाही.असे लोक ज्यांना मध्यवर्ती आधाराची गरज आहे किंवा कुठल्याही आधाराची गरज भासते, त्यांना काठी घेऊन चालने जास्त सोईस्कर होते. असे लोक लांब फेरफटका मारण्यास जाऊ शकतात, किंवा बागेत जाणे पसंत करु शकतात, त्यांनी पाण्याची बाटली जरुर न्यावी, त्यामुळे तहान लागल्यास पाणी सहजपणे मिळू शकते. जर एखादी व्यक्ती व्हील चेयरवर असेल, तर त्यांना कदाचित चालणे किंवा बागेत जाणे तेवढे सोईस्कर होणार नाही.


पक्षांचे निरीक्षण करणे

असे लोक ज्यांना निसर्गात रममाण होण्यास आवडते, परंतु ते शारिरीक कारणांमुळे, वाहतुकिच्या गैरसोईमुळे, साथिदारांमुळे किंवा इतर समस्यांमुळे चालण्यासाठी शेतात किंवा जंगलात जाऊ शकत नाहीत.परंतु तुम्हाला यासाठी जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. हि कृती करण्यासाठी आसपासच्या बागेत जाऊन सुध्दा सुरुवात केली जाऊ शकते. जर तुम्ही या छंदाचा गंभीरतेने विचार करत असाल तरhttp://www.birding.in/ काही संकल्पना आणि बरीचशी रोचक माहिती उपलब्ध करुन देते.


फोटोग्राफी

इतर कृती,जीला मागील काळाशी जोडले जाऊ शकते किंवा त्याचा स्वतंत्रपणे आनंद घेतला जाऊ शकतो,तो छंद आहे फोटोग्राफी. तुम्हाला फक्त एका खोलीची आवश्यकता असते.एखादी डिजीटल कॅमेरा घेऊन,तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीचे फोटो घ्या आणि तुमच्या कॅमे-यावर किंवा संगणकावर एकत्रित करा.फोटोग्राफीचे अनेक विषय असू शकतात उदा.निसर्ग,वाहन किंवा वयक्ती,अशी कोणतीही गोष्ट जी आकर्षक असेल.यानंतर तुमच्या संगणकावर स्क्रॅपबुकच्या स्वरुपात फाईलमध्ये एकत्रित करा.आपल्याला यामध्ये रुची असल्यास http://www.asianphotographyindia.com/default.htmlवरुन याची माहिती तुम्हाला घेता येईल. काही प्राथमिक आणि डिजीटल फोटोग्राफी तंत्रांची आणि फोटोगॅलरीजची शहरांप्रमाणे सूची दिली गेली आहे, ती तुम्ही http://www.photolinks.com/resources.html? वरुन मिळवु शकता.


बागकाम

अशी यथार्थ कृती जी तुम्हाला निसर्गाशी जोडते. तुम्हाला जमिनीच्या एका छोट्याश्या तुकड्याची आवश्यकता असते किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर तुम्ही काही कुंड्या आणि ठळक उपकरणे ठेवू शकता. निवडक वेबसाईट आणि काही पुस्तके बाग तयार करण्यासाठी पुरेशी असतात आणि http://www.seasonsindia.com/lifestyle/gardening_sea.htm http://www.cityfarmer.org/kitchenIndia.html. प्रमाणे भाज्या उगवण्यासाठी उपयोगी पडतात. यासाठी थोडीशी खबरदारी घेणे आवश्यक असते, जसे जास्त उकाड्याच्या वेळी बागकाम करु नये, सकाळी किंवा सायंकाळी हे काम करावे. जड कुंड्या किंवा सामान उचलू नये, ज्यामुळे तुमच्या पाठीला दुखापत होऊ शकते. जर तुमच्या पाठिला त्रास होत असेल, तर उंचजागी कुंड्या ठेवाव्यात, त्यामुळे तुम्हाला जास्त वाकावे लागणार नाही.


खेळ

जर तुमचे डॉक्टर परवानगी देत असतील, तर गोल्फ, बॅडमिंटन, टेनिस, पोहणे किंवा तुमच्या आवडिचा एखादी खेळ आणि व्यायाम करमणुकिचा चांगला पर्याय आहे.


व्यायाम

सर्व डॉक्टरांकडुन सर्व वयोगटाच्या लोकांना याची शिफारस केली जाते.वयस्क लोकांना वेगळे गणले जात नाही.आज काल वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम केला जातो,ज्यामुळे सहजता आणि व्यायाम मिळतो आणि तुमचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य राखले जाते. यामधले काही विकल्प खालील प्रमाणे आहेत:


अ.योग

विकिपिडियाच्या अनुसार योग म्हणजे कमालीच्या सतर्कतेसोबत एकात्मता गाठणे होय,यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते.एका व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्फत टिव्ही कार्यक्रमांमध्ये योगाच्या लाभांना दाखवले/सांगितले जाते,याला करण्याच्या पध्दतींची देखील माहिती सांगितली जाते.तुम्हाला योगाविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही http://www.yogapoint.com/index.htm ही वेबसाईट पाहु शकता. भारतातल्या विविध योग केंद्रांची माहितीhttp://www.yoga-centers-directory.net/india/india.htmया वेबसाईटवर मिळू शकते.


ब. ताई ची

चीनी मार्शल आर्ट आजकाल फारच प्रसिध्दि मिळवत आहे. विशेषत: वयस्क लोकांसाठी सहज कौशल्ये असल्यामुळे आणि आरोग्य आणि आयुष्यमाना बरेच लाभ मिळवून देत असल्यामुळे ह्या कलेला प्रसिध्दि मिळत आहे. याच्या दिर्घ प्रवाहित कृती हळूवारपणे सफाईने करता येतात. प्रत्येक मुद्रा न थांबता दुस-या मुद्रेमध्ये रुपांतरीत होते. योगाप्रमाणेच टाईची संधीशोथ, मधुमेह,ऑस्टेरोपोरोसेसीस इ.साठी लाभदायक असते.भारतातील टाईची प्रशिक्षकांची यादी http://www.taichinetwork.org/searchpages/Asia-India-Tai-Chi-teachers.htmlवर दिली आहे.।

क. जीवन जगण्याची कला

यासाठी तयार केलेल्या या वेबसाईटच्या अनुसार जीवन जगण्याच्या कलेसाठी केलेल्या अग्रक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाला राखण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला तणावमुक्त मन, निरोगी शरीर आणि आध्यात्मिक विकासासाठी संभावनांचा उच्च स्तर गाठण्यासाठी संधी देण्याची गोष्ट केली गेली आहे.आर्ट ऑफ लिव्हिंग ही सामाजिक कल्याणासाठी असलेली एक खाजगी संस्था आहे. http://www.artofliving.org/AboutUs/tabid/60/Default.aspx वर भारतातील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रांची यादी उपलब्ध आहे. या संस्थेची स्थापना श्री रवि शंकर यांच्या मार्फत केली गेली आणि याच्या मार्फत स्वयं विकासाच्या अनेक तंत्रांचा विकास केला गेला आहे, ज्यांना सहजपणे आपल्या जीवनात सहभागी करता येऊ शकते, ज्यामुळे मन:शांती मिळते आणि त्यांना उत्साहाने स्वत:ला परिपूर्ण केले जाऊ शकते. त्यांच्या मार्फत विकसीत खास तंत्रांच्या मार्फत ज्याला सुदर्शन असे म्हटले जाते, हे एक प्रभावी श्वसन तंत्र असून त्याच्यामुळे शारिरीक, मानसिक आणि भावनात्मक, तसेच सामाजिक हित प्राप्त केले जाऊ शकते . भारतातील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रांची सूची खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बाह्यकृतींची ही सूची एवढीच मर्यादित नाही आहे. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करु शकता आणि वेळ घालवण्यासाठी आणि तुम्हाला पूर्णत्वाचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला आनंद देणारी कोणतीही कृती करु शकता. जर तुम्ही अशा कृतींसाठी वेळ्ख राखुन ठेवल्यास उदा. चालायला जान्यासाठी वेळ ठरवल्यास त्याचा तुम्हाला आणखीन लाभ मिळू शकतो. तुम्ही मानसिक दृष्ट्या सिध्द होता आणि शरीराने तयार होता, तुमच्या मेंदुला शिस्त लागते आणि तुम्ह त्याच्या कडे लक्ष देऊ लागता

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.