OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

परिचय

ऑक्युपेशनल थेरपी

स्वत:ची काळजी घेणे

हालचाल

घरकाम

सुरक्षा

कायदेशिर कारवाई

संवाद

वेशभुषा उपकरणे

औषध व्यवस्थापन

स्टोअर्सआणि एईडी संबंधीत सुविधा

व्यवसाय

सर्व व्यक्तींमार्फत त्यांच्या जीवनातल्या समस्त पैलूंमध्ये आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी मदत करण्याच्या हेतुने स्वास्थ्य आणि आरोग्याला बढावा देण्याच्या हेतुने व्यावसायिक चिकित्सकाच्या मार्फत केलेल्या अर्थ पूर्ण कार्यांचा किंवा व्यवसायांचा उपयोग केला जातो. हे लोकांना "जीवन जगण्याच्या कौशल्यांना" उपलब्ध करुन देते, जे एक पूर्ण, उत्पादक आणि संतुष्ट स्वरुपाने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. विशेष स्वरुपात सेवा क्षेत्रांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:


  • व्यक्ती विशेषाशी संबंधीत मूल्यांकन आणि प्रचार त्यामुळे दैनंदिन कार्यांना करण्यात सुधारणा आणता येऊ शकेल
  • वातरणाच्या अनुकुलना सोबत घर आणि कार्याच्या संबंधातील व्यापक मूल्यांकन
  • परिक्षण आणि प्रदर्शन कौशल्यांचे आकलन अनुकुलनीय उपकरण शिफारस व प्रशिक्षण
  • कुटुंबातील सदस्यांना आणि देखभाल कर्त्यांना प्रशिक्षित करणे. व्यावसायिक चिकित्सक असे स्वास्थ्य व्यावसायिक असतात, जे सर्व वयोगटातील व्यक्तींच्या अशक्ततेवर नियंत्रण आणण्यात आणि त्याप्रमाणे अनुकुल होण्यास मदत करण्यासाठी कार्य करतात. या कार्यांमध्ये आंघोळ किंवा कपडे घालण्याच्या मूलभूत कार्यांपासून ते कंप्युटर चालवणे किंवा संशोधीत नियंत्रणांच्या सोबत वाहन चालविणे या सारख्या जटिल कार्यांचा समावेश होऊ शकतो.
सहाय्यक आणि समर्थक उपकरण (ए ई डी) प्रश्नावली

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (भारत सरकार) सध्या एका कार्यक्रमाला राबवत आहे ज्याचे शिर्षक "वयस्क लोकांसाठीचा तंत्रज्ञान अंत:क्षेप(टि आय ई)" असे आहे, जो तंत्रज्ञान विकासाच्या प्रकल्पांचे समर्थन देतो आणि वयस्क लोकांच्या हितासाठीच्या सेवांना पाठिंबा देतो. टि आय ई मध्ये सहाय्यक आणि समर्थक तंत्रज्ञानाच्या विकासाचा समावेश होतो. या प्रकल्पाच्या जोडीला डॉ. वी सी गोयल , १. डॉ.उषा दिक्षीत २. आणि श्री प्रकाश कुमार ३ यांनी एक प्रश्नावली निर्माण केली आहे, जीचे नाव "सहाय्यक आणि समर्थक उपकरणे (ए ई डी ) प्रश्नावली" असे आहे. ही प्रश्नावली ऑल इंडिया सिनीयर सिटीझन्स कॉन्फेड्रेशनच्या ८ व्या राष्ट्रिय बैठकित उपयोगात आणण्यात आली होती, ही बैठक २३-२४ डिसेंबर २००८ रोजी चतारपूर टेंपल कॉप्लेक्स , नवी दिल्ली येथे घेण्यात आली होती.

या प्रश्नावलीमध्ये तीन विभाग आहेत- पहिला विभाग सर्वसामान्य प्रश्नांच्या संदर्भात आहे ज्यात नाव, शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न, वैवाहिक स्थिती इ.चा समावेश होतो, दुस-या विभागामध्ये व्यक्तीद्वारे अनुभवण्यात आलेल्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या अडचणींचा मागोवा घेतला जातो आणि तीस-या विभागामध्ये आयुष्यातल्या महत्वपूर्ण कार्यांसाठी सहय्यक ए ईडि गरजांची माहिती दिली जाते आणि त्यांच्या बद्दल जागृतता निर्माण केली जाते.

1.
डॉ. वी सी गोयल

संचालक /वैज्ञानिक "एफ" सीड,
डि एस टी तंत्रज्ञान भवन, नवी दिल्ली
ईमेल :
vikasc.goyal@nic.in
2.
डॉ. कोंगा गोपीकृष्ण

वैज्ञानिक सी, सीड
डि एस टी,तंत्रज्ञान भवन,
नवी दिल्ली
ईमेल :
kongagopikrishna@yahoo.com
3.
श्री.प्रकाश कुमार

आर ए (ऑक्युपेशनल थेरपीस्ट) औषधी विभाग ए आय आय एम एस नवी दिल्ली -११००२९
ईमेल :
psharma@oldagesolutions.org

जर तुम्हाला ए ई डी प्रश्नावली संशोधनासाठी किंवा शैक्षणिक उद्देशासाठी हवी असेल, तर कृपया डॉ. ए बी डे , प्राध्यापक आणि चीफ ऑफ जेरीयाट्रिक सर्विसेस, ए आय आय एम एस , नवी दिल्ली यांना या ई मेल वर संपर्क साधा.
ईमेल abdey@oldagesolutions.orgs

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.