OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

डिजाइन और वयोवृद्ध व्यक्तियों

वयोवृद्ध अशक्त व्यक्तियों के लिए बाधा

वृध्दांसाठी रचना आणि वातावरण

कुठल्याही वास्तुची किंवा सुविधेची निर्मिती करते वेळी, त्याच्या संरचनेची निर्मिती सर्वसामान्य, निरोगी आणि सक्रिय मनुष्याला लक्षात घेऊन केली जाते. वास्तुकार आणि त्या सोबत अंतिम उपयोगकर्त्यांना सामान्यत: ते आज नाही तर उद्या म्हातारे होणार आहेत, या गोष्टीची जाणीव फार कमी प्रमाणात असते. सध्याच्या काळात आपल्या समाजामध्ये चिकित्सा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अतिशय प्रगती झालेली आढळते. याच्या परिणाम स्वरुपामध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये आपल्याला वाढ झालेली आढळते.लवकर या भूतलावर वयस्क होणा-या लोकांचा विशाल समुदाय तयार होईल, ज्यांना वेगवेगळ्या कारणांनी स्वत:च स्वत:च मदत करावी लागेल.परंतु त्यांच्या साठी तयार केलेले वातावरण अचडणींनी युक्त असेल. अडचणी वयस्क व्यक्तींवर प्रतिकुल प्रभाव पाडतात. त्यांच्यामुळे वृध्दांच्या शारिरिक हालचालींमध्ये अडचण येते, आणि त्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी परावलंबी व्हावे लागते. त्यांच्या साठी अडथळा विरहित वातावरणाच्या निर्मितीसाठ तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.वयस्क व्यक्तींना वातावरणातील अडचणींच्या मुळे त्यांच्या संपूर्ण सहभाग आणि आनंदापासुन वंचित न करणे गरजेचे आहे.

बाधा विरहित वास्तुशिल्पाच्या अंतर्गत वयस्क व्यक्तींसाठी कार्यात्मक, सुरक्षित आणि सुविधाजनक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विशिष्ठ डिजाईन तत्वांचा प्रयोग आणि समावेश केला जाईल. योजना तयार करण्याच्या दरम्यान या तत्वांना आत्मसाद करण्याची गरज आहे.


 • सुगमता
  निर्मिती केलेल्या सगळ्या वातारणांचा आराखडा अशा प्रकारे तयार केला गेला पाहिजे, ज्यामुळे तरुण , वृध्द आणि दुर्बळ व्यक्तींसाठी ते सुगम होऊ शकेल.
 • अवाका
  निर्मिती केल्या गेलेल्या वातावरणात अशा प्रकारे व्यवस्थांचे निर्माण केले पाहिजे, ज्यामुळे तरुण, वृध्द आणि दुर्बळ व्यक्तींना पोहोचणे शक्य होऊ शकेल.
 • उपयोग
  निर्मीती झालेल्या सर्व पर्यावरणांची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की त्यांचा उपयोग सर्वांना सहजतेने करता येईल.
 • दिशानिर्देशन
  निर्मिती केलेल्या सगळ्या परिसरसाची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की, त्यामध्ये सहजपणे प्रवेश करता येणे आणि आपला मार्ग शोधणे सुकर होऊ शकेल.विशेषत: अचानक घडणा-या अपघातांच्या किंवा आपत्तींच्या वेळी इमारतीमधुन सर्वांचे निर्वासन देखील महत्वपूर्ण असते.
 • कार्यक्षमता
  रचनेमध्ये अशा सर्व तत्वांचा समावेश करणे जरुरी आहे, ज्यामुळे वयस्क व्यक्तींसाठी त्या कार्यक्षम बनू शकतील आणि ते स्वत:चे काम स्वत: करु शकतील.
 • सुरक्षा
  सर्व निर्मित परिसराला सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन रचना केल्याने प्रत्येक व्यक्ती जीवीत आणि आरोग्याला किमान धोक्यामध्ये घालुन प्रवास करु शकेल.

संवेदनाशीलतेने रचना केलेल्या परिसरामुळे वयस्क व्यक्तींना उपेक्षित किंवा परावलंबी जगण्यापासुन प्रतिंबंधीत करु शकते. म्हणुनच आंतरिक निर्मिती केलेल्या रचनांसोबत सार्वजनिक स्थळांवर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या दोहोंच्यामध्ये रचनेच्या उद्देशाने अशा एका समर्थ परिसरासोबत अशा सेवांचा विकास होईल, ज्यामुळे व्यक्ती आपल्या कुटुंब आणि समाजाच्यामध्ये अधिक काळ स्वयंसिध्द होऊ शकतील आणि त्यांना संस्थेच्या अंतर्गत घेतल्याजाणा-या काळजीची किमान गरज भासेल.

आपल्यापैकी प्रत्येकजण लवकर नाहितर उशीरा वृध्दावस्थेकडे झुकत असतो, वृध्दावस्थेला अनेक घटक कारणीभुत ठरतात ते म्हणजे:

 • प्राथमिक घटक
  अनुवंशिक जैविक घटक, जन्माच्या वेळी असलेले दोष, अनुवंशिक किंवा कौटुंबिक आजार उदा. मधुमेह हाडे, सामर्थ्य, दृष्टि इ. वर प्रभाव पाडु शकतात.
 • दुय्यम कारणे
  प्रदुषित वातावरणाच्या आणि घातक कार्यस्थळांच्या एकत्रित परिणामामुळे श्वसन, ऐकू येणे आणि ठेवणीवर परिणाम होऊ शकतो.
 • शारिरीक घटक
  सामर्थ्य, हालचाल प्रतिकारशक्तीमध्ये घट, वयस्क लोकांची चयापचय यंत्रणा मंद होणे यामुळे त्यांच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होऊ शकतो. मुत्रावर संयम नसणे या महत्वपूर्ण व्याधीचे समाधान शोधणे आवश्यक आहे.
 • मानसिक घटक
  आर्थिक स्त्रोतांची कमतरता, निवृत्ती नंतर काम नसणे, साथीदार किंवा मित्र गमावल्यामुळे येणारा एकटेपणा वयस्क लोकांवर ताण आणु शकतो.
अडथळा मुक्त वातावरणाची निर्मिती करण्यासाठीची प्राथमिक तत्वे

प्रवेश आणि निर्गमन:

प्रत्येक इमारतीचे प्रवेशद्वार आणि निर्गमन मार्ग सहजपणे हाताळता येणे गरजेचे आहे. जर प्रवेश लॉबी मार्गाच्या पातळीपेक्षा उंच असल्यास, रॅंप उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. एकापेक्षा जास्त मजले असणा-या इमारतींमध्ये सुलभ जीन्यांच्या सोबत रॅंप आणि एल्वेटर्स उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

रॅंप्स:

वॉकर्स आणि व्हील चेयरचा उपयोग करणा-या व्यक्तींना इमारतीमध्ये प्रवेश किंवा निर्गमन करण्यासाठी रॅंम्प्स अतिशय उपयोगी पडतात. त्यासाठी या रॅम्प्सचा उतार १:१२ पेक्षा कमी नसावा. किमान रुंदी १२० सेमी आणि कमाल लांबी ६ मीटर असणे गरजेचे आहे, त्यानंतर अंदाजे१८० सेमीचा उतार उपलब्ध करुन दिला गेला पाहिजे.रॅंप्सवर हॅंडरेल त्याचप्रमाणे दोन्ही बाजुंनी १० सेमी एवढे उंच कर्ब्ज असणे गरजेचे आहे.

दरवाजे:

सगळे दरवाजे किमान ८०सेमी एवढ्या स्पष्ट रुंदीचे असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांच्यामधुन एक व्हील चेयर आणि वॉकर सहजपणे काढता येऊ शकेल.१५० सेमी * १५० सेमीचे किमान स्पष्ट अंतर दरवाज्याच्या आधी किंवा नंतर उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. दरवाजे किंवा खिडक्या सहजपणे वापरता येतील अशा सामुग्रीने बनलेल्या असणे गरजेचे आहे. दरवाजा उघडण्यासाठी किंवा लॉक करण्यासाठी मनगट किंवा बोटांना फिरवण्याची आवश्यकता भासु नये. लीवर प्रकारचे हॅंडल्स अधिक उपयोगी ठरतात.

जीने:

ज्या इमारतींमध्ये १५० सेमीचे राईजर्स आणि ३०० सेमीचे ट्रेड्स असल्यास वयस्क व्यक्तींना ते चढण्या आणि उतरण्यासाठी सुलभ असतात. जीन्यांच्या दोन्ही बाजुंना असलेल्या रेलिंग्जने त्यांना मदत मिळते. वळणावरच्या त्रिकोणी राईजर्सपासुन वाचले पाहिजे. उघड्या राईजर्स किंवा बाहेर आलेल्या भागांमुळे वयस्क लोक पडण्याची शक्यता असते कारण त्यामध्ये त्यांचा पाय किंवा वॉकिंग स्टिक्स अडकण्याची भीती असते. उतरते राईजर्स अधिक चांगले असतात. ट्रेड्स शक्यतो सरकण्यापासुन प्रतिबंध करणारे असावेत किंवा कमीत कमी त्यांच्या किना-यावर सरकण्याला प्रतिबंध करणा-या पट्ट्या लावणे गरजेचे आहे, त्यामुळे सरकण्यापासुन बचाव होईल. ट्रड्स आणि राईजर्सचे रंग वेगळे असले पाहिजे, त्यामुळे दुर्बळ दृष्टिअसलेले वयस्क त्यांना सहजपणे ओळखु शकतील.

रस्ते:

सार्वजनिक मार्गांमध्ये, वॉक वेज ची टोके खाली असणे गरजेचे आहे. हे रस्ते सरळ आणि सपाट असणे त्याचप्रमाणे ते रुंद असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांच्यावर वील चेयर नेली आणली जाऊ शकते. अंतराळांवर ते रुंद असणे गरजेचे आहे, त्यामुळे दुसरी वील चेयर सहजपणे तेथुन जाऊ शकेल. वयस्क व्यक्ती सहजपणे इथे तीथे जाऊ शकतील, इमारतीच्या मार्गांवर आणि कॉरेडोर्स आणि बागांच्या मार्गांवर रेलींग्ज लावणे लाभप्रद ठरु शकते. फरशी आणि पक्क्या रस्त्यांच्या किना-यांवर भिन्न रंगांचा उपयोग केला जाणे गरजेचे आहे, त्यामुळे दुर्बळ दृष्टि असलेले वयस्क लोक त्यांना सहजपणे ओळखु शकतील.

इमारतींचा आराखडा:

इमारतीमध्ये हवेचे योग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. कुठल्याही इमारतीचा आराखडा सोपा आणि सरळ् असणे गरजेचे आहे, त्यामुळॆ वयस्क व्यक्ती सहजपणे त्यांचा मार्ग ओळखु शकतील, कारण बहुतांश वयस्क व्यक्तींची स्मरणशक्ती क्षीण असते. एकत्रित तयार केलेल्या खोल्या आणि बागांमध्ये चुकिच्या पध्दतीने ठेवलेले गालीच्चे आणि पाय-या, त्याचप्रमाणे चुकिच्या ठिकाणी बनवलेल्या बागा आणि स्ट्रीट फ्र्निचर, येण्याजाण्याच्या सहज रस्त्यांवर संकेत पट्ट्यांमुळे वयस्क व्यक्ती धडकण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना इजा होऊ शकते. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये शौचालय इ. सुलभ स्थानांवर निर्माण करणे गरजेचे आहे, कारण वयस्क व्यक्ती मुत्राच्या असंयमाने पिडित असतात..

शौचालय:

इमारतीमध्ये कमीत कमी एक शौचालय माफक प्रमाणात मोठे असले पाहिजे, ज्यामध्ये व्हील चेयर किंवा वॉकर उपयोगकर्ता सहजपणे आत जाऊ शकतील, दरवाजा बंद करु शकतील आणि तसेच ते पाण्या जवळच्या स्थानावर बसु शकतील. व्हील चेयरच्या जाण्या आणि येण्यासाठी १५० सेमी किमान जागे सोबत २.२५ वर्ग मीटर एवढे वळणाचे अंतर असणे आवश्यक आहे. वॉटर क्लोसेट्स, मूत्रालय, वॉश बेसिन आणि शॉवरच्या आसपास जर ग्रॅब बार्स (सर्वसाधारणपणे स्टिलचे असल्यास )लावले जाऊ शकतात, त्यामुळे ते आपली रोजची कामे सहजपणे करु शकतात. शौचालयात सर्व आवश्यक सामुग्री जवळ व्हीलचेयर वर बसलेली व्यक्ती सहजपणे पोहचु शकली पाहिजे. शौचालये आणि स्वयंपाकघराची फरशी न घसरणा-या लाद्यांनी बनलेली असणे आवश्यक आहे. स्नानगृहात रबरी मॅटमुळे घसरण्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते.

प्रकाशव्यवस्था::

प्रत्येक इमारतीमध्ये मुबलकप्रमाणात नैसर्गिक प्रकाश असणे गरजेचे आहे. खिडक्यांवर उत्तमप्रकारे शेड्स लावल्या पाहिजेत कारण सिवसा सुर्याच्या प्रकाशामुळे येणा-या तीव्र झळीपासुन सुरक्षा मिळू शकते. अंधा-या आणि प्रकाश असलेल्या स्थानांवर रात्रीच्या वेळी किमान कॉन्ट्रास्ट असणे गरजेचे आहे, कारणप्रकाशित स्थळांवरुन अंधा-या स्थळांवर किंवा विपरीत स्थळांवर दृष्टिदोष असलेल्या वयस्क व्यक्ती आपल्या डोळ्यांना सहजपणे समायोजीत करु शकत नाहीत. वीजेच्या स्वीच बोर्डांसाठी वेगवेगळ्या रंगांचा उपयोग केल्यामुळे त्यांना ओळखणे वयस्क व्यक्तींना सोपे होते.

स्वच्छता आणि सुरक्षितता:

वयस्क व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती घटते, जर भिंती सरळ असतील, तर त्यांच्यावर कमी प्रमाणात धुळ साठेल , ज्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता कमी होईल. जर भिंती, दरवाजे, खिडक्या आणि फर्निचर इ.च्या कडा गोलाकार असतील , तर वयस्क व्यक्तींना इजा पोहोचण्याचे प्रमाण कमी होईल.

आवाजाची तीव्रता:

बहुतांश वयस्कांना कमी ऐकु येते. खोलीमध्ये आवाजाला शोषणा-या घटकांना वापरल्यामुळे उदा. पडदे, गालिचे, कापडी साजसामान उदा. गाद्या , पडसे इ. भिंतीवर लावले जाणारे सजावटीचे सामान, यांच्या उपयोगामुळे प्रतिध्वनी उत्पन्न होण्यात अडथळा आणला जातो, ज्यामुळे वयस्क व्यक्ती सहजपणे ऐकु शकतात.

सौदर्यविषयक वातावरण:

बाधाविरहित परिसरसासाठी सर्व व्यवस्था करुन देखील, तो सौदर्याच्या दृष्टिकोनातुन विलोभनीय, स्वच्छ आणि योग्य त-हेने सुसज्जित असणे आवश्यक आहे, ज्युआमुळे वृध्द व्यक्तींमध्ये उदासिनतेचे निर्मूलन करण्यासाठी आश्चर्यकारक रित्या यश मिळते.

सारांश:

या गोष्टीला समजणे अतिशय महत्वाचे आहे की, डिजाईनींग आणि अडथळा विरहित परिसराच्या निर्माणासाठी जागा किंवा बांधकाम वाढवणे आवश्यक नसते. जर कुठल्याही रचनेमध्ये बाधाविरहित वास्तुशिल्पाचा समावेश केला, तर त्याचा फायदा सगळ्यांना मिळेल कारण आपण सगळे लोक कधी ना कधीतरी वृध्द होणारच आहोत

  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.