OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

उच्च रक्तदाब

 • सामान्यत: उच्च रक्तदाबाची लक्षणे (एच बी पो लक्षणे)दिसून येत नाहीत, परंतु त्यामुळे निर्माण होणारी जटिलता मात्र दिसून येते. म्हणुन तुमचे डॉक्टर जेव्हा तुम्हाला उच्च रक्तदाब असल्याची बातमी देतात, तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका कारण तो तुम्हाला जाणवत नाही.
 • जेव्हा रक्त हृदय आणि वाहिन्यांमध्ये वाहते, तेव्हा ते वाहिन्यांवर दाब निर्माण करते. तुमच्या रक्तदाबाची वाचने या दाबाचे मापन करतात.
 • रक्तदाबाला दोन संख्यांमध्ये दर्शवले जाते उदा./१२०/८० या मापनाला वयस्क व्यक्तींमधले रक्तदाबाचे सरासरी वाचन मानले जाते. परंतु यापेक्षा कमी जास्त प्रमाणात वाचन आल्यास त्याला अनिवार्यतेने असामान्य समजु नये.
 • १४०/९०च्या वरची मापने उच्च मानली जातात. उच्च रक्तदाबाचे शास्त्रीय नाव हाईपरटेन्शन असे आहे. पारंपारिक सर्वेक्षणाच्या अनुमानाप्रमाणे ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या ४० ते ५० टक्के व्यक्ती हाईपर टेन्शनने ग्रासलेल्या असतात.
 • हा आजार सर्वसामान्य स्वरुपाचा असल्यामुळे, प्रत्येकाने सहा महिन्यांमधुन एकदा बीपी तपासणी करावी.
 • काही स्थितींमध्ये इतर आजारांमुळे हाईपरटेन्शन उदभवू शकते, परंतु उच्च रक्तदाबाने ग्रस्त व्यक्तींची या स्थितीतील संख्या नगण्य स्वरुपाची असते. या प्रकारच्या हाईपर टेन्शन ला सेकंडरी हाईपरटेन्शन संबोधले जाते, ज्याला मूळ समस्येवर उपचार करुन दूर केले जाऊ शकते.
 • हाईपर टेन्शनच्या बहुतांश स्थितींमध्ये याचे कुठलेही विशिष्ठ कारण नसते, त्यामुळे त्यावर उपचार केले जाऊ शकत नाहीत, परंतु सततच्या उपचाराने यावर नियंत्रण आणता येऊ शकते.
 • उच्च रक्तदाबाची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही कारणे म्हणजे: कौटुंबिक इतिहास, धूम्रपान, निर्देशित वजनापेक्षा जास्त वजन, अल्कोहोल सेवन, मीठाचे जास्त प्रमाणात सेवन, कमी प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियमचे सेवन.
 • तणावाखाली राहणा-या व्यक्तींच्या बाबतीत हाईपर टेन्शन बरेचदा आढळून येते. मानसिक दबाब आणि अति शारीरीक कार्यांमुळे रक्तदाब वाढतो.
 • उच्च रक्तदाबाचा उपचार आयुष्यभर घ्यावा लागतो, परंतु औषधाच्या मात्रेला कमी जास्त प्रमाणात केले जाऊ शकते. काही लोकांची अशी समजुत असते की एकदा बी पीची पातळी सामान्यपेक्षा खाली आली की त्यानंतर उपचाराची गरज भासत नाही.
 • सौम्य हाईपरटेन्शनसाठी डॉक्टर तुम्हाला वजन कमी करण्याचा, कमी प्रमाणात मीठ खाण्याचा, जास्त प्रमाणात व्यायाम करण्याचा सल्ला देतात. आपल्या दैनंदिन सवयींमध्ये या बदलांना समाविष्ट करुन तुम्ही तुमचा रक्तदाब कमी करु शकता. जेव्हा तुम्हाला रक्तदाब कमी करण्यासाठी औषधाची गरज भासत नाही, तेव्हा देखील या बदलांची आवश्यकता भासते. या बदलांमुळे तुमच्यावर औषधांचा उत्तम परिणाम होतो.
 • तुमचे डॉक्टर तुम्हाला रक्त दाबासाठी विविध प्रकारची औषधे देतात. जर तुमच्यासाठी दिर्घकालीन औषधोपचार निर्देशित केला आहे तर उदास होऊ नये. जेव्हा तुमचा रक्तदाब नियंत्रित होतो तेव्हा काही कालाने तुम्ही औषधाची मात्रा कमी करु शकता, परंतु तुम्हाला नेहमी उपचाराची आवश्यकता असते
 • रक्तदाबासाठी अनेक प्रकारची औषधे असतात. सामान्यत: उपलब्ध असणारी औषधे शिल्लक राहणार्‍या मीठाचे आणि पाण्याचे प्रमाण कमी करतात. अशी औषधे अरुंद रक्तवाहिन्या उघडतात (बिटा ब्लॉकर्स, एसीई इन्व्हीबीटर्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स)
 • इतर औषधांच्या प्रमाणे रक्तदाबाच्या औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. ज्यामध्ये अशक्तपणा, थकवा, पायमध्ये ओढ लागणे, दुर्बलता किंवा नंपुसकत्व, हात पाय गार पडणे, झोपेशी निगडित समस्या, हृदयाचे ठोके मंदावणे किंवा वाढणे, त्वचेवर ओरखडे, बेचवपणा, नैराश्य, कोरडा खोकला, टाचेला सुज येणे, डोके दुखी भोवळ, मलावरोध इ. चा समावेश होतो.तुम्हाला ही लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. यापेक्षा जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
 • कदाचित तुम्हाला आजारी असल्या सारखे वाटत नसले तरी उच्च रक्त दाब एक गंभीर समस्या आहे आणि तिचा उपचार करणे महत्वाचे आहे.
 • बीपीला औषधांच्या मदतीने कमी करत येते. परंतु नियमीत औषधे न घेतल्यास ते वाढण्याची शक्यता असते. आणि त्याचा उपचार करणे महत्वाचे आहे.
 • औषधे एक ठरलेल्या वेळी घ्यावे उदा. सकाळी किंवा संध्याकाळी ब्रश केल्यावर
 • वजन कमी करणे, मर्यादित स्वरुपात मीठ आणि अल्कोहोलचे सेवन करणे व्यायाम करणे हितावह असले तरी डॉक्टराच्या शिफारशी नंतरच ते औषधंचा पर्याय बनू शकतात.
 • उच्च रक्तदाब गंभीर स्वरुपाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरतो. ज्यामध्ये स्ट्रोक, हृदयरोग, वृक्कांचे कार्य बंद पडणे याचा समावेश होतो. योग्य ते उपचार घेउन तुम्ही जोखमी पासुन बचाव करु शकता. बीपी तपासणी नंतर उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यावर तुमच्या डॉक्टरांच्या सुचनांचे निष्ठापूर्वक पालन करणे आवश्यक आहे.
  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.