OLD AGE SOLUTIONS

Portal on Technology Initiative for Disabled and Elderly
An Initiative of Ministry of Science & Technology (Govt. of India)
Brought to you by All India Institute of Medical Sciences

शारिरीक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

पोषण

वृध्द लोकांसाठी लक्षात घेणयासारख्या पोषणात्मक बाबी

कुठल्याही व्यक्तीला उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, सर्वसामान्य गरजा आयुष्यभर लागत असतात, परंतु विकासाच्या पौष्टिकतेसंबंधीत टिकून राहत नाहीत. रुग्णता, शल्य चिकित्सा किंवा हाड मोडल्यानंतर चांगल्या सकस अन्नग्रहणामुळे शीघ्र रोग उपचार संभवतात, आणि दिर्घायु जीवना़च्या सोबत सामान्य रुपात समग्र गुणावत्तेत सुधार देखील शक्य होतो. अशी अपेक्षा केली जाते की, ५१ वर्षाची व्यक्तीच्या पौष्टिकतेच्या आवश्यकता ६०, ७०, ८० व ९० वर्षाच्या व्यक्तंपेक्षा वेगळ्या असतात. दुर्दैवाने आणखीन सटिक वयोगटांच्या शिफारशीं आणि आवश्यकतांचे वर्गिकरण करण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु, कुठल्याही वयोवृध्द व्यक्तीसाठी आहाराशी निगडित शिफारशी अनुचित ठरु शकतात, कारण वयस्क लोकांवर केलेल्या पौष्टिकता अभ्यासावरुन असे दिसून आले आहे की या शिफारशी आधारित नसून युवा वयस्कांवर केलेल्या अभ्यासांवरुन साधारणत: घेण्यात आल्या आहेत आणि त्या निरोगी व्यक्तींच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असतात, त्याच प्रमाणे त्यांच्यातील दुर्धर रोग व औषधोपचारांच्या प्रभावांचा विचार केला जात नाही. वाढणा-या वयाचा संबंध नेहमी पात शरीर वस्तुमानावर (मांसपेशी आणि हाडे) होणा-या कमतरतेमध्ये आणि शरीराच्या चरबीच्या गुणोत्तरात होणा-या वाढीमुळे रेस्टिंग एनर्जी खर्चात (आर ई ईमध्ये ) घट होते, यामुळे ऊर्जेची गरज लक्षणिय रित्या कमी होते. वाढत्या वयासोबत हाडे आणि सांध्यातील विकृती, शरीराची ठेवण अस्थिर होणे, हृदय विकार सारख्या रोगांच्या अस्तित्वामुळे शारीरीक हालचाली कमी होऊ लागतात. म्हणुन आर ईई मध्ये घट आणि शारीरीक हालचालींची कमतरता यांच्या मिलाफाने ऊर्जेची आवश्यकता कमी होते. परंतु हे सर्वसाधारणपणे आढळते की, हा बदल वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या वेळी होतो, आणि कॅलरी संबंधी आवशयकतांसाठी कालानुक्रमे वय हे सुयोग्य सुचक मानता येऊ शकणार नाही.


निरोगी परिपक्वतेसाठी आहाराशी निगडित निती

वयोवृध्द जनसंख्येला तीन भागात विभाजीत केले जाऊ शकते- कार्यशील वयोवृध्द, दुर्बल वयोवृध्द आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त वयोवृध्द व्यक्ती. यामध्ये प्रत्येक गटाची पौष्टिकतेच्या बद्दल वेगवेगळी आवश्यकता असते. या वयस्क लोकांच्या मार्फत घेतला जाणारा आहार अनेक घटकांमुळे प्रभावित होऊ शकतो: वय, लिंग राहण्याची स्थिती, मानसिक आणि शारिरिक स्थिती ,त्यांना औषधांची आणि सामाजिक मदतीची गरज भासू शकते

निरोगी तरुण पिढीच्या तुलनेत कार्यशील वयस्कांच्या पौष्टिकतेच्या गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता असण्याची शक्यता नसते. कॅल्शियम, फॉलीएट व जस्ताचा स्तर राखुन ठेवलेल्या स्तरांपेक्षा कमी असतो, त्याप्रमाणे त्याला दुध आणि दुग्धजन्य पदार्थांनी प्राप्त केले जाऊ शकते. फॉलीएट हिरव्या पालेभाज्या आणि फळांमध्ये आढळते त्याचप्रमाणे जस्त मांस, मासे आणि अख्ख्या धान्यात आढळते.

दुर्बळ वयस्क व्यक्तींमध्ये बाकी लोकसंख्येच्या तुलनेत पौष्टिकतेसंबंधी गरजा भिन्न असण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे हे लोक किमान पोषणाने पिडित असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. दुर्बळ लोकांसाठी पौष्टिकतेच्या निगडित जटिलतांमध्ये भूक कमी लागणे, कमी आहार घेणे, अनैच्छिकपणे वजनात घट होणेत्याचप्रमाणे सैक्रोपिनीया (मांसपेशींच्या वस्तुमानात आणि बलामध्ये क्रमानुसार घट होणे, ही घट वय वाढण्यासोबत सुरु राहते) इ. चा समावेश होतो. .

हृदय विकार आणि उच्च रक्तदाब यासारख्या दुर्धर आजारांनी वयस्क लोकांमध्ये रोगावर नियंत्रण आणण्याची गरज विशेष स्वरुपात असू शकते. उदाहरणार्थ लोणी, क्रिम , खोबरेल तेल इ.ना कमी करणे गरजेचे आहे, आणि तंतुमय आहार उदा. अख्खे धान्य, डाळी, फळे आणि भाज्यांना वाढवले पाहिजे, त्याचप्रमाणे निरोगी अवस्थेतील वजन राखुन ठेवले पाहिजे.

उच्च रक्तदाब नियंत्रीत करण्यासाठी असे सूचविले जाते की वजन आणि मीठाला कमी केले पाहिजे, कॅल्शियमयुक्त आहार, फळे आणि भाज्यांचे ग्रहण वाढविले पाहिजे.
प्रत्येक गटामधुन भिन्न भिन्न सुरक्षात्मक अन्नपदार्थांना घेऊन योग्य प्रकारच्या संतुलित आहाराचे अनेक सकारात्मक प्रभाव असतील, त्याप्रमाणे यामुळे मानसिक आणि शारीरीक हित मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकते. यामुळे शरीराला आपले काम करण्यासाठी सर्व पौष्टिक तत्वांची उपलब्धता शक्य होते, यामुळे रोगाने ग्रस्त होण्यास वेळ लागेल व चांगले आरोग्य टिकवून ठेवता येईल.

कॅन्सर रोगात आहार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. फाईटो रसायन युक्त फळे आणि भाज्या जास्त खाणे आणि अति चरबीपासुन बचाव करणे यामुळे कॅन्सरपासुन सुरक्षितता मिळते.


  Copyright 2015-AIIMS. All Rights reserved Visitor No. - Website Hit Counter Powered by VMC Management Consulting Pvt. Ltd.